Skip to main content

सुप्रिया वि सुनेत्रा

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 16/02/2024 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी, बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-… घ्या कविता.... पवार वि पवार बारामती त सुप्रिया वि सुनेत्रा, आव्हान हे बारामती शरदचंद्रा।। नणंद विरुद्ध भावजय, कोणाचा होणार जय?? घराघरातलं हे महाभारत, वोटसाठी आवाज मारत!! वर्षानुवर्षाची सुरक्षीत सीट, अजीत सुरुंग लावणार धीट।। एकरात केली करोडोची वांगी, भाजपनीती का ठेचण्या नांगी।। क्यों की लोहा लोहे को काटता, गूढनीती 'शाह' आणि मात का !! राजा शरदचंद्र बारामती, ताजा अजीत-तंत्र करामती।। उभा उमेदवार राष्ट्रवादी अजीत, आता पहायचे कुणाची जीत।। "देवेंद्र क्या करेगा अकेला ", बघा घरी संघर्ष उभा केला।। प्रश्न जनादेशाच्या तृतिय नेत्रा, ठरवेल सुप्रिया कि सुनेत्रा ।।

वाचने 10094
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

कुल

ही कविता संपादक मंडळाने तात्काळ ऊडवावी. ह्यात भाजपच्या नेत्यांची लाल केलीय तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका केलीय. प्यूअर अंधभक्तीयुक्त कविताय.

In reply to by अहिरावण

मजा घ्यायची तर दोघांवर टिका करा, आपल्या आवडत्या पक्षाची ना नेत्याची लाल म्हणू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असे कसे शक्य आहे अबा.... चला सुरुवात तुम्ही करा.... करा नेहरु, गांधींवर टीका... आणि दाखवा कशी दोघांवर टीका करता येते ते !!

समयोतीचित रचना. मला तर "देवेंद्र" हायलाईतलट ची रचना वाटते.

आमास्नी सु.सु. म्हायती व्हत्या. तेंच्या इरुद्दबी सु. X सु. ह्यो बिगर'सु.'वर अन्याव हाये. हितंबी आरक्षण पायजेल.

लढाई कशीही होऊ द्यात. जागा तर पवार घरातच राहील. कार्यकर्ते घोषणा देऊन आणि सतरंज्या उचलून मरतील. उद्या सुप्रिया आणि सुनेत्रा गोड होतील.

संपादक मंडळ कुठंय ?? हा धागा बोर्ड वर कसा?? आताच मी ह्याचं विडंबन लिहीलं तर नी त्यात भाजप नेत्यांवर टिका केली तर चालनार आहे का???

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरेरे !! आम्ही गोमयाने स्वच्छ सारवलेल्या देवघरात ध्यान करतो आणि रामरक्षा म्हणतो !! इतकं प्रसन्न वाटतं की वा !!