पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बाकीच्या अधिकार्यांचे मत बदलण्याआधीच 'ऑपरेशन पाकिस्तान' अंतर्गत ब्रिटिश विमाने दिल्लीला पाठवण्यात आली नी त्यांना ऊचलन्यात आले.
ब्रिटीश भारतातील सुमारे पंधरा हजार कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते. नव्या पाकिस्तानच्या हातात रोख रक्कमही नव्हती. भारताकडून वाटणी नंतर येणारा पैसा काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी वापरला जाऊ नये म्हणून काही काळ रोखून धरण्यात आला होता. पाकिस्तानची जी काही आर्थिक ताकद होती ती पूर्व पाकिस्तानात होती. तेथे ताग उद्योग होते. त्यांची प्रक्रिया करणारे कारखानेही भारतात गेले, परंतु पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानला आर्थीक बाबतीत बऱ्याच प्रमाणात सांभाळले.
या बंगालींनी पाकिस्तानला नक्कीच सांभाळले, पण त्यांचाही जीव आतून गुदमरायला लागला होता, ते पाकिस्तानच्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक होते, पण सिंहासन कराचीत होते. त्यांच्यात आणि पश्चिम पाकिस्तानमधला एकमेव बंध होता तो धर्माचा. हा धागा भक्कम होता, पण भाषेच्या बाबतीत तो तूटला. मोहम्मद अली जिना यांचा असा विश्वास होता की संपूर्ण देश एकत्र करण्यासाठी एक भाषा आवश्यक आहे, ती उर्दू असावी. स्वातंत्र्यानंतर ते एकदाच ढाक्याला गेले होते, आणि फक्त ऊर्दू हीच भाषा असेल असे सांगून परत आले.
बंगालात बंगाली चालेल, उर्दू नाही, या मुद्द्यावर बंगाली ठाम होते. खरे तर जिना किंवा लियाकत अली खान हे दोघेही पाकिस्तान क्षेत्रातले नव्हते. तिथली भाषा आणि संस्कृती त्यांना तितकीच अनोळखी होती जितकी ती बिहार-उत्तर प्रदेशातून आलेल्या मुस्लिमांना होती. ते पंजाबी, बंगाली किंवा सिंधी कसे बोलू शकनार होते? गुजरातचे असूनही ते गुजराती बोलण्यात गडबड करायचे. त्यांचे शिक्षण इंग्रजीत झाले होते आणि ते उर्दूही इंग्रजी शैलीत बोलत. त्यांचे एक भाषण तीस वर्षे पाकिस्तानात दररोज प्रसारित केले जायचे, ज्यात ते म्हणत,“तुम्ही सर्वजण आपापल्या मंदिरात जाण्यासाठी मोकळे आहात. तुम्ही सर्वजण आपापल्या मशिदीत जाण्यास मोकळे आहात. तुम्ही सर्व कोणत्याही प्रार्थनास्थळी जाण्यास मोकळे आहात.”
(1977 मध्ये कोणीतरी हे भाषण गायब केले आणि प्रसारण बंद झाले. आता ते YouTube वर उपलब्ध आहे.)
जिना यांच्या मृत्यूनंतर आणि लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानला हाताळण्यास सक्षम कोणीही उरले नाही. बंगाली ख्वाजा निजामुद्दीन यांना पुढील पंतप्रधान बनवण्यात आले. आता आपली मागणी मान्य होईल असे बंगालींना वाटले. पण त्यांनीही बंगालमध्ये जाऊन उर्दू हीच भाषा राहणार असल्याचे सांगितले. पंजाबी, सिंधी, बलोच, काश्मिरी, पख्तुन कसे तरी उर्दूला तयार (?) झाले, पण बंगालसाठी हा मुद्दा पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची ठिणगी ठरला. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी शेख मुजीब-उर-रहमान या विद्यार्थ्याला तुरुंगात पाठवण्यात आले. 21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाक्यातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात आठ विद्यार्थी हुतात्मा झाल्याने बंगाल पेटला. पंतप्रधान निजामुद्दीन यांना हटवून आणखी एक बंगाली मोहम्मद अली बोगरा यांना पंतप्रधान करण्यात आले. परिस्थिती पाहून त्यांनी लष्करप्रमुख अयुब खान यांना संरक्षणमंत्री केले. अशाप्रकारे तेथील राजकारणात रेड कार्पेट अंथरून पाकिस्तानी लष्कराचे स्वागत करण्यात आले.
अमेरिकेलाही तेच हवे होते.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7064
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचत आहे ...
ते सर्व पाकिस्तान सोडून
In reply to वाचत आहे ... by मुक्त विहारि
छान लेखमाला
सर विरोध हिंदी ला नाही, तर
In reply to छान लेखमाला by धर्मराजमुटके
महाराष्ट्रात मराठीच बोलली
In reply to सर विरोध हिंदी ला नाही, तर by अमरेंद्र बाहुबली
काहीही. तसॅ असतं तर अख्खा
In reply to महाराष्ट्रात मराठीच बोलली by प्रसाद गोडबोले
जवळपास अख्खा युरोप ख्रिश्चन
In reply to काहीही. तसॅ असतं तर अख्खा by अमरेंद्र बाहुबली
हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच
In reply to जवळपास अख्खा युरोप ख्रिश्चन by प्रसाद गोडबोले
हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्याला वाईट ! असो. जय जगत !हे द्न्यान हिंदी भाषाकांना द्या. महाराष्ट्रात येऊनही हिंदी मे बोलो म्हणून मराठी भाषकांवर दादागीरी करतात. स्थानीर भाषआ शिका नाहीतर आपापल्या राज्यात जाऊन पाणीपुरी विका म्हणावं.तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत
In reply to हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच by अमरेंद्र बाहुबली
मी उगाच वितंडवाद करत नाहीये .
In reply to तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत by प्रसाद गोडबोले
जय जगत.
मी उगाच वितंडवाद करत नाहीये .
In reply to तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत by प्रसाद गोडबोले
जय जगत.
तसं असतं तर बंगालात फक्त
In reply to मी उगाच वितंडवाद करत नाहीये . by प्रसाद गोडबोले
मग ह्याच तर्काने -
In reply to तसं असतं तर बंगालात फक्त by अमरेंद्र बाहुबली
हमदर्द
जिन्हांची एकूलती एक मूलगी
In reply to हमदर्द by सर टोबी
ये बेचारा काम के बोझ का मारा…
In reply to हमदर्द by सर टोबी
जनसंघ
In reply to हमदर्द by सर टोबी
हे बहुतेक बरोबर नाहि आहे.
In reply to हमदर्द by सर टोबी
हा भागही छान!
थोडसं अवांतर
> पाकिस्तानचा भारताबरोबर
In reply to थोडसं अवांतर by सर टोबी
Us dollar च्या संदर्भात
In reply to > पाकिस्तानचा भारताबरोबर by मनो
पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात.समजले नाही.व्हिडिओ बनवताना भारतात तेल
In reply to Us dollar च्या संदर्भात by कंजूस
पाकिस्तानी मनुष्य इथे भारतात
In reply to व्हिडिओ बनवताना भारतात तेल by मनो
त्यांचे चलनही रुपयाच आहे,
In reply to पाकिस्तानी मनुष्य इथे भारतात by कंजूस
नवीन विषय घेतला एका तरुण
आताच्या निवडणूक निकालाबाबत
अवांतर : हिंदी म्हणजे काय
+१
In reply to अवांतर : हिंदी म्हणजे काय by नठ्यारा
+२
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
अ.बा. तुम्ही तुमची निरीक्षणे
चांगली चालु आहे मालिका!!
अबा चांगले लिहीता.
धन्यवाद. पण मा फक्त भाषांतर
In reply to अबा चांगले लिहीता. by कर्नलतपस्वी
वाचत आहे ...