युटीएस UTS app वापरून तिकीट.
रेल्वेच्या युटीएस UTS appचा वापर करून online unreserved तिकीट.
याबद्दल ऐकून होतो की चालत्या गाडीतून तिकीट काढता येत नाही. पण काल हा प्रयोग केला. यशस्वी.
.
.
या app चा बरेच प्रवासी वापर करून रेल्वेचं अनारक्षित तिकीट काढतात. रेल्वे तिकीट खिडकीपासून सहा मीटरस दूर असतानाच तिकीट निघू शकते. म्हणजे स्टेशनच्या बाहेरूनच. याचा अर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्याअगोदर तुमच्याकडे रेल्वे तिकीट हवे.
.
.
काल (२०२४_०१_१३) पुण्याकडून इंटरसिटी ट्रेनने(१२१२८) ठाण्याला उतरुन परत कल्याणला (उलट) जायचे होते. (गाडी कल्याणला थांबत नाही.)म्हणजे बॅगा संभाळत ठाणे स्टेशनला बाहेर पडून तिकिट खिडकीवरून कल्याण तिकिट काढून परत आत यायला हवे. पण समजा UTS App वापरून गाडीत असतानाच ठाणे ते कल्याण तिकिट काढता आले तर गाडीतून उतरल्यावर लगेच उलट दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास शक्य होता. तो प्रयोग केला आणि तिकीट निघाले. मोठा खटाटोप वाचला. म्हणजे एखाद्या स्टेशनला उतरून दुसऱ्या मार्गावरची एखादी गाडी आहे तर ती पकडून प्रवास करायचा झाल्यास याचा उपयोग आहे.
.
.
[ UTS Android app ची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile
हे app फोनमध्ये डाउनलोड करून तेरा वर्षे वयाच्या कुणालाही सुरू करून वापरता येते. फोन नंबर, नाव, पासवर्ड नोंद करून वापरता येते. फोनमध्ये जीपीएस GPS Location असणे गरजेचे आहे. तसेच तिकिट खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंट फक्त रेल्वेच्या R WALLET ने किंवा freecharge/paytm/mobikwik यातूनच करता येते. इतर payments getway , नेट बँकिंग
पर्याय नाहीत. यांचे UPI payment साठी जीएसटी लागत नाही पण वॉलेटमधून payment केल्यास मार्च २०२३ पासून जीएसटी लागू आहे.जीपीएस असण्याची सक्ती मात्र जाचक/अनावश्यक वाटली. हे app वापरायचे कसे याबद्दल यूट्यूबवर बरेच विडिओ सापडतील.
.
.
यातून साधी लोकल ट्रेन, त्यातील फर्स्ट क्लास किंवा एसीचे, पॅसेंजर किंवा सुपरफास्ट मेल एक्सप्रेस गाडीचे तिकिट निघते.
.
.
तिकिटांची वैधता -१) लोकल ट्रेन साठी मुंबईत तिकिट काढल्यापासून एक तासात वैध. Valid. शिवाय समजा तुमच्याकडे १०:०५ वेळ छापलेले तिकिट आहे तर ज्या गाडीची वेळ त्या स्टेशनला १०:०५ नंतर असेल त्या गाडीत चढू शकतात. एखाद्या गाडीची वेळ (departure) अगोदरची आहे पण ती लेट (late) झाल्याने १०:०५ नंतर आली तर त्यात हे तिकीट चालणार नाही. खरं म्हणजे खिडकीवर तिकीट काढल्यावर आपण असा प्रवास करतो परंतू अगदी नियमांच्या भाषेत बोलायचं तर ते तिकीट चालणार नसते. तिकीट तपासनीस काही करत नसतात ही बाब वेगळी.
२) मेल एक्स्प्रेसचे तिकीट काढलेल्या वेळापासून तीन तासांत किंवा जी ट्रेन अगोदर येते त्यासाठी वापरावे लागते.
.
.
कोणतेही unreserved तिकीट कोणत्याही/त्याच तारखेचं ठराविक वेळ टाकून काढता येण्याची सोय झाली तर खूपच फायदा होईल. जीपीएसही नकोच. फोनचा वापर फारसा न करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुणी त्यांच्या फोनमधून अगोदरच तिकीट काढून देऊ शकतील.
.
.
आपला अनुभव, सूचना, सुधारणा, दुरुस्ती अवश्य लिहा. काहींना हा लेख पाल्हाळ वाटू शकतो त्यांनी दुर्लक्ष करावे ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
9577
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती बद्दल धन्यवाद....
उपयुक्त अनुभव.
गाडीत असतानाच ठाणे ते कल्याण तिकिट काढता आले
शक्य झाले. गाडी कल्याणच्या
In reply to गाडीत असतानाच ठाणे ते कल्याण तिकिट काढता आले by वेडा बेडूक
App मधून जीपीएसची अट काढून टाकायला हवी.
In reply to शक्य झाले. गाडी कल्याणच्या by कंजूस
विनातिकीट नाही.
In reply to App मधून जीपीएसची अट काढून टाकायला हवी. by वेडा बेडूक
QR code ने तिकीट काढ्लं का?
In reply to विनातिकीट नाही. by कंजूस
नाही. QR code नाही.
In reply to QR code ने तिकीट काढ्लं का? by वेडा बेडूक
जीपीएस कशाला ठेवता?
In reply to नाही. QR code नाही. by कंजूस
गाडीच्या स्टेशनच्या
In reply to जीपीएस कशाला ठेवता? by वेडा बेडूक
नमस्कार
In reply to विनातिकीट नाही. by कंजूस
अँडवान्स तिकीट अनारक्षित
In reply to नमस्कार by अनिरुद्ध प
" त्यामुळेच तुम्ही ट्रेन मधून
In reply to App मधून जीपीएसची अट काढून टाकायला हवी. by वेडा बेडूक
कदाचित हे वापरून कुठूनही
डेव्हलपर ऑप्शन वापरायचे आहे.
In reply to कदाचित हे वापरून कुठूनही by मनो
एक युक्ती कामात आली
रेल्वे स्टेशन QR कोड लिस्ट
In reply to एक युक्ती कामात आली by गोरगावलेकर