Skip to main content

सिनेमे

लेखक कॉमी यांनी शुक्रवार, 25/03/2022 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.) गुड टाईम (२०१७) कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते. त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे. या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही. खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय. (प्रौढ प्रेक्षकांसाठीच !) ८/१०

वाचने 58557
प्रतिक्रिया 193

प्रतिक्रिया

The Wicker Man पाहिला. मिडसोमर आणि ह्याच्या कथेत खूप साम्य वाटले. एक पुराणमतवादी ख्रिश्चन पोलीस इन्स्पेक्टर एका हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी समरआयल म्हणून छोट्याश्या बेटावर जातो. ते बेट हे संपूर्ण एका लॉर्ड समरआयलच्या मालकीचे असते. बेटावरील लोकं त्याच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत नसतात. हरवलेली मुलगी ज्या बाईंची मुलगी असते ती सुद्धा ही कोण मुलगी माहीत नाही असे म्हणत असते. पण त्या पोलिसाला काहीतरी काळेबेरे आहे असे वाटत असते. पुढे त्याला हे पण समजते की त्या बेटावरील लोक पेगन धर्म पाळत असतात, आणि त्याच्या दृष्टीतून "अश्लील" गोष्टी करत असतात. पुढे रहस्य उलगडते. सर ख्रिस्तोफर ली लॉर्ड समरआयलच्या भूमिकेत आहेत. लॉर्ड ऑफ द रिंगज मध्ये सारुमान असणारे ली त्यांच्या गंभीर आवाजाने ओळखता येतात.

Anatomy of a fall पाहिला. फ्रेंच सिनेमा आहे. एका माणसाचा घरात वरच्या मजल्यावरून पडून मृत्यु होतो. काही कारणांमुळे त्याच्या बायकोवर संशयाची सुई वळते. तिथे असणारा एकमेव साक्षीदार म्हणजे त्या दोघांचा लहान आंधळा मुलगा असतो. (त्याचे आंधळे असणे कथेत फार काही योगदान देत नाही, हे खटकले.) कोणतेही नाते कॉम्प्लेक्स असते, आणि त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठी संपूर्णतः नात्याची ओळख होणे गरजेचे आहे. त्यातल्या एखाद्या तुकड्याला उचलून तुम्ही जज करू शकत नाही हा मुद्दा सिनेमात मांडला आहे. कोर्ट रूम ड्रामा आहे. मुख्य अभिनेत्रीने खूप मस्त अभिनय केला आहे.

In reply to by कॉमी

Anatomy of a fall बघतोय.दोन तीन पॉज करुन ठेवलाय. तपास सुरुय. सुरुवातीचा संथपणा म्हणा की माझा मुड म्हणा अजून चित्रपट पूर्ण होईना. :( एलदा सलग पाहीनच. -दिलीप बिरुटे

धोपट मार्गा सोडु नको... कॉलेजमध्ये डाय हार्ड ४.० पाहिला होता. आधीचे तीन नव्हते पाहिले. सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊन ट्रॅफिक आणि गर्दीत भर घालायची इच्छा नव्हती. गुरुवारी पहिले तीन आणि शुक्रवारी चौथा पाहिला. तोपर्यंत ऍक्शनचा ओव्हरडोस झाल्याने पाचवा टाळला. ही यादी. शेवटचा पाहिला नाही. Die Hard (1988) Die Hard 2 (1990) Die Hard with a Vengeance (1995) Live Free or Die Hard (2007) A Good Day to Die Hard (2013) ता. क. (भारतात १२०-१४० रुपये भाड्याने एक चित्रपट उपलब्ध आहे. आणि ४००-६०० रुपयांना विकत मिळतो. प्राईम, ऍपल टिव्ही आणि युट्यूबवर आहे.)

इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स बघितला. हा १९७८ सालचा सिनेमा आहे, मूळ १९५६ सालच्या ह्याच नावाच्या सिनेमाचा रिमेक. हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या एका बाईंना अचानक आपला नवरा वेगळाच वागतो आहे असे वाटू लागते. इतका वेगळा की हा आपला नवरा नाहीच ह्याची तिला खात्री पटते. ती हेल्थ डिपार्टमेंट मधल्या तिच्या मित्राला ह्याबद्दल सांगते, आणि तो तिला एका सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जातो. तिथे तिला समजते की अशी इतरही लोकं असतात ज्यांना आपल्या जवळचे एकदम विचित्र झालेत असे वाटत असते. आणि ही सगळी "वेगळी" लोकं अगदी संशयास्पद असतात. ही खरेतर अनोळखी असलेली लोकं एकमेकांशी बोलत असतात, त्यांचे काहीतरी संगनमत चालले असते. प्राईम व्हिडिओ वर आहे. भारी सिनेमा आहे. सुरुवातीच्या भागात पॅरानॉइया मस्त दाखवला आहे. रोजमेरिज बेबी हा सुद्धा असाच सिनेमा होता ज्यात मुख्य पात्राला काहीतरी भयंकर कट चालला आहे असा सुगावा लागला असतो पण इतरांच्या वागणुकीमुळे ते पात्र आणि प्रेक्षक म्हणून आपणही शेवटपर्यंत शंकाग्रस्त राहतो की हा अतार्किक पॅरानॉइया आहे की खरेच काही गंभीर कारस्थान आहे.

वर ऊल्लेखलेले गेट आऊट नी ओल्डबाॅय पाहीले. गेटआऊट खरंच मास्टरपीस आहे. ओल्डबोय चं प्रतिशोध घेण्याचं कारण अंगावर काटा आणणारं आहे.

12 th fail आणि Three of Us नदोन्ही सिनेमे वेगळे आणि आवडले. खरं तर दोन्ही सिनेमांवर तपशिलवार लिहायला पाहिजे असं वाटलं. एकीकडे युपीएससी एमपीएस्सी च्या विद्यार्थ्यांची धडपडीची कथा तर, दुसरी नितांत सुंदर अशी गझल. कोंकणातील सुंदर परिसर आणि पाय-यांवरुन निथळणा-या पाण्याप्रमाणे हळुवारपणे खोलवर आठवणी उतरत, निथळत जाव्यात तसा नितांत सुंदर सिनेमा. मजा आली. कलास. -दिलीप बिरुटे

कुणीतरी अकरावा समुद्र (ओशन इलेवन) सिनेमा पहायला लावला होता. अतिशय खराब सिनेमा निघाला. वेळ बुडाला. श्वाशंक रिडीम्पशन तुरूंगाचा सिनेमा अप्रतिम होता.

रोजचा बसमध्ये येण्या जाण्याचा वेळ सत्कारणी लागेल. प्राईम - आँखो देखी २०१४ (दिग. रजत कपूर, अभि. संजय मिश्रा) Drama पन्नाशीतला एक गृहस्थ. एक घटना घडते, आणि तो ठरवतो की फक्त आपल्या डोळ्यांना दिसेल तेच खरे मानायचे. लोक आधी त्याला वेड्यात काढतात, मग त्याचे अनुयायी बनतात. रघू रोमिओ २००४ (दिग. रजत कपूर, अभि. विजय राज) Dark Comedy कोठे पाहायला मिळेल, ते अजून कळले नाही. एक बारमध्ये काम करणारा वेटर. बारमध्ये काम करणारी एक मुलगी. टिव्ही मालिकांमध्ये काम करणारी एक अभिनेत्री. त्या मुलीला वेटर आवडतो. वेटरला अभिनेत्री आवडते. वेटर अभिनेत्रीचे अपहरण करून त्या मुलीच्या घरी ठेवतो. तिच्या मागे असलेले गुंड. प्राईम मिथ्या २००८ (दिग. रजत कपूर, अभि. रणवीर शौरी, नसीरुद्दीन शाह) Dark Comedy एक डॉन. एक बॉलिवूड मध्ये एक्स्ट्रा अभिनेता जो डॉनसारखा दिसतो. विरोधी गँग खऱ्या डॉनच्या जागी एक्स्ट्राला बसवते. पण एका अपघाताने तो डॉनचे कुटुंब आणि शत्रू स्वतःचे समजायला लागतो. खरं काय, खोटं काय... कसं ओळखणार...

In reply to by तुषार काळभोर

आँखो देखी पाहिला .... ठाकठीक वाटला .. शेवटाला ग्रेट बिट फीलिंग आलं नाही ! धन्यु तुषार काळभोर !

@काॅमी, गेट आऊट सिनेमा पाहीला, आवडला, पण पहील्या सीनचा अर्थ लागत नाहीये. कुणाला तरी गाडीत कोंबून किडनॅप एक जण जातो. त्या सिनचा नी ऊर्वरीत सिनेमाचा संबंधं काय??

इंग्रजी सिनेमे कुठे ओटीटीवर असले तर पाहता येत नाहीत. पण ते कोणत्या कादंबरीवर आधारित आहेत हे कळल्यास बरे होईल. पुस्तकं मिळण्याची शक्यता असते. गेट आउट बद्दल उत्सुकता वाढली आहे. ..... सिनेमासाठी घोड्यांना हाताळण्याचे, घोडे पुरवण्याचे काम करत असते याबद्दल. असाच एक सिनेमा माझ्या लहानपणी आला होता तो पाहायला मिळाला नाही. काही रानटी घोडे पकडून आणणारे असतात. त्यातला एक घोडा गायब होतो त्यास पुन्हा थोड्या दिवसांनी पकडून आणल्यावर गायब होतो. मग मात्र त्यास पकडल्यावर पाळत ठेवतात. एक लहान मुलगा रात्री कुंपणाबाहेर येऊन शिट्टी मारतो तेव्हा हा त्याचा घोडा कुंपणावरून उडी मारतो आणि तो मुलगा घोड्यावर बसून जातो असा सिनेमा होता.

एक सिनेमा खूप आधी बघीतला होता पण आता नाव आठवत नाहीये. कुणास माहित असल्यास सांगावे. सिनेमा सलादिन च्या क्रुसेडच्या कालखंडातला. एका छोट्या किल्ल्यावर सलादिन च्या सैन्यानं केलेलं आक्रमण एक गोरा सैनिक किल्ल्यातल्या लोकांना घेऊन परतवून लावतो. युद्धाचं शूटींग अप्रतीम आहे! बाबांनी एक सिनेमा सुचवला होता मागे, १९७७ चा "द कार". सुपरनॅचरल हॉरर. मी नाही पाहिला अजून पण भारी होता म्हणतात.

In reply to by आंद्रे वडापाव

धन्स! :-)

सॅमबहादूर पाहिला. आवडला. विकी कौशलने भूमिका उत्तम वठवली आहे. मधले एक गाणे खूप आवडले. युद्ध कसे जिंकले, स्त्रॅटेजी दाखवणे ह्यावर आणखी भर द्यायला हवा होता असे वाटले.

In reply to by कॉमी

भारतीय युध्दपट मी पाहत नाही, अतिशय पांचट असतात. मागे कुणीतरी खफवर शेरशहा पहायला लावला होता, अतिशय भंगार सिनेमा होता, हिरो दात काढत भर युध्दात भिंतीआडून पाकिस्तानी सैन्याशी गप्पा मारत असतो, मशीनगन समोरून दुसर्या सैनीकाला ओढत नेतो तरीही कुणालाच गोळी लागत नाही, असले अत्याचार मले सैन नै होत. तो शहेनशहा सजेस्ट करनारा मिपाकर सापडला तर त्याच्यावर मी केस ठोकणार आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Reality based युद्धपट पाहायचा असेल तर the downfall YouTube वरती आहे https://m.youtube.com/watch?v=YzSMFWKCHhg हिटलरचा रोल अप्रतिम केला आहे. त्याच्या क्लिप्स अनेक जागी memes म्हणून वापरतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

+ सहमत ,, एकतर प्रेम कहाणी तरी घुसडलेली असते किंवा अतिरजीत तरी बर फार कमी वेळा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा संस्थेचे नाव घेतले जाते ( अब्रुनुकसानी चा दावा लागू नये म्हणून कदाचित ) मग काहीतरी काल्पनिक नाव दिले जाते मग मजा निघून जाते , सत्य घटनेवर चित्रपट आहे समजा आणि त्यात राज्याचा मुख्यमंत्री दाखवयायचाय तर काल्पनिक राज्य कशाला? खरे नाव घ्या ना खरे तर भारतीय समाजजीवना/ राजकारणात / आर्थिक वयहारात इतका माल मसाला आहे कि जास्त वास्तव पूर्ण कलाकृती बनवता येईल ( अर्थात गेली काही वर्षात बाजरी ( कमर्शियल ) चित्रपटात वास्तविकता आलेली आहे नाहीच असे नाही ( पूर्वी हिरो इन्स्पेक्टर असला तरी लांब केस ठेऊन अस्ययाचा , मुंबई चाय उन्हळ्यात सुद्धा सूट घालून )

In reply to by कॉमी

स्ट्रॅटेजी दाखवतांना रॉ ची मेहनत देखील दाखवावी लागली असती. तसं केलं तर तो स्वतःच एक स्वतंत्र चित्रपट होईल. म्हणून तसं केलं नसावं.

'शंभरावं स्थळ' हा लघुपट युट्यूब पाहिला. एखाद्या मुलाकडून नकार आला तर तावातावात ओळखदेख नसताना त्याच्या घरी जाऊन नकाराचे स्पष्टीकरण विचारायला कोणी मुलगी जाईल हेच पटत नाही. "नाही म्हंटले तर नाही म्हंटले, गेलास उडत, मी दुसरा पाहीन" अशीच सर्वसाधारण मानसिकता असते. त्यामुळे लघुपट इतर बाबतीत चांगला असला तरी तार्किकदृष्ट्या मला पटला नाही. कलाकारांनी काम छानच केले आहे.

In reply to by सौन्दर्य

स्पष्टीकरण विचारायला कोणी मुलगी जाईल हेच पटत नाही.
सिनेमा / फिल्मस मध्ये अशा सिनेलिबर्टी दिसतातच (पण असं म्हणतात की अशी घटना कुठंतरी घडलेली असते / किंवा घडण्याची शक्यता असते)

ईट फोलोस पाहीला. इतका काही खास वाटला नाही. मिस्ट्री सोल्व झाली असती तर चांगला वाटला असता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सॉल्व असे होणार नव्हतेच ना. जे मागे लागले आहे ते पुन्हा कधी ना कधी येणार हेच तर खरी भीती आहे. जे काही सोल्यूषन आहे ते तात्पुरते आहे. ती अनामिक गूढ शक्ती आहे ती तुम्ही कितीही जागा बदलल्या तरी अविरतपणे पाठलाग करत राहील.

हॉरर, सायको थ्रिलर, साय-फाय यांच्या वाटेला मी सहसा जात नाही. मला साध्या हल्क्या-फुलक्या, कॉमेडी, सामाजिक ड्रामा किंवा बायोग्राफिकल मूवीज जास्त आवडतात. माझ्या all time favourite movies (before 2000) It Happened One Night (1934) Casablanca (1942) It's a Wonderful Life (1946) Lean on Me (1989) My Cousin Vinny (1992) A Few Good Men (1992) Groundhog Day (1993) The Shawshank Redemption (1994) Courage Under Fire (1996) Life Is Beautiful (1997) You've Got Mail (1998)

District 9 साऊथ आफ्रिकेत जोहानसबर्ग वर एके दिवस एक अवाढव्य स्पेसशिप येते. ते काही वर्ष तसेच राहते, त्याची दारे उघडत नाहीत. शेवटी माणसच वर शिपपर्यंत जाऊन दार फोडून आत जातात. तिथे लक्षावधी खंगलेले एलियन असतात. त्यांना खाली आणले जाते. तिथे त्यांना quarantine करण्यात येते. काही वर्षांत तिथे एलियन्सचा घेट्टो तयार होतो - डिस्ट्रिक्ट ९. वीस वर्षे जातात, आणि आता लोकल लोकं आणि प्रॉन्स असे नाव पडलेले एलियन, ह्यांच्यात भांडणं चालू झाली असतात. त्यामुळे सरकार एलियनना जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात असते. त्यासाठी सर्व्हे करायला एक टीम डिस्ट्रिक्ट ९ मध्ये गेली असते. तिथे त्यातल्या एका माणसाचा योगायोगाने महत्त्वाच्या एलियन टेक्नॉलॉजीशी संबंध येतो, आणि त्या माणसाचे आयुष्य बदलते. उत्तम ॲक्शन पट. चांगली करमणूक झाली. Hulu वर आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हुलू वर दिसला नाही, पण चक्क युट्यूबवर कोणीतरी हिंदीत टाकलेला दिसतोय. गुगल केल्यावर सापडेल.

In reply to by कॉमी

+१ अतिशय मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत इस्क्वेअर मध्ये पाहिला होता. तेव्हा सायन्स फिक्शन पाहण्याच्या उद्देश्याने गेलो होतो. टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर. २०१० च्या दशकात फाउंड फुटेज प्रकारे चित्रित केलेल्या चित्रपटांची लाट आली होती.

In reply to by तुषार काळभोर

टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर.
अगदी. अपार्टहेडचे स्पष्ट रूपक आहे. अमेरिकेच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स वर पण टिप्पणी आहे म्हणता येईल.

ड्यून २ ड्यून २ बघितला. सिनेमॅटिक मास्टरपीस. खरेतर ड्यून कादंबरी पडद्यासाठी अवघड आहे. पाहिला सिनेमा किंचित धिमा होता, कारण पहिल्या पुस्तकातले सगळे मटेरियल कव्हर करायला दोन सिनेमे लागणार होते. पहिल्या सिनेमात पार्श्वभूमी तयार केली गेली. ह्या सिनेमात मिथक सुरू होते. ड्यून मालिकेची प्रमुख थीम आहे - संपूर्ण लोकसंख्येला पेटवू शकणारा नेता खूप हानिकारक ठरू शकतो. ही कल्पना विस्ताराने मांडण्यासाठी इस्लामशी समांतर असा काल्पनिक धर्म आणि त्या धर्माचा मसिहा पॉल अर्टेडीस उर्फ मु'आदीब आणि त्याच्या वंशजांची जीवनकथा ह्या मालिकेत येते. अतिशय थरारक सिनेमा. पहिला बघितला नसेल तर पहिला बघून मग हा आवर्जून बघणे सुद्धा वर्थ इट आहे हेमावैम. आता ड्यून मसायाची वाट बघणे आले. (पुढचा भाग.)

सध्या "शोगुन" ही मध्य युगीन जपानच्या काल्पनिक धर्तीवर आधारित मालिका बघतोय... ३ रा एपिसोड आलाय ... ३ ऱ्या एपिसोड मध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनातील (आग्र्याहून सुटका, पन्हाळगडचा वेढा ) याच्याशी कमालीचे साम्य असलेले, प्रसंग आढळले ...

गॉडझिला-मायनस वन बघितला. जबरी आहे. Toho ही जापनीज कंपनी गॉडझिला, काँग इत्यादी पात्रांची मालक आहे. त्यांनी हॉलिवूडला (मॉनस्टरव्हर्स साठी) सिनेमांची परवानगी दिली आहे तरी त्यांचे स्वतःचे सिनेमे सुद्धा येत असतात. शिन गॉडझिला आणि २०२३ चा गॉडझिला मायनस वन हे टोहोचे मॉडर्न गॉडझिला सिनेमे आहेत. हॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा कथेवर जास्त भर देणारे सिनेमे आहेत. मायनस वन - दुसऱ्या विश्वयुद्धातल्या पराभवानंतर जपान अनेक बाबीत देशाच्या इतिहासातील सर्वात खालील पातळीवर होता - शून्य पातळीवर. ह्याच परिस्थितीत गॉडझिला टोकियो वर चालून येतो - म्हणून गॉडझिला मायनस वन. शिकिशिमा हा एक तरुण कामिकाझे पायलट असतो - शत्रूच्या जहाजावर धडकून विस्फोटात ठार होणे ही त्याची ऑफिशियल जबाबदारी असते. तो शेवटच्या क्षणी मागे फिरून एका बेटावर उतरतो. तिथे असलेले जपानी सैन्य कर्मचारी त्याच्याकडे आपले कर्तव्य चुकवणारा म्हणून बघत असतात. खोल समुद्रात राहणारे मासे मृतावस्थेत मोठ्या प्रमाणावर त्या बेटाच्या आसपास तरंगू लागतात आणि ह्या कॉलिंग कार्डच्या पाठोपाठ खुद्द गॉडझिला अवतरतो. मोक्याच्या वेळेस गॉडझिलाकडे बघून विमानातला शिकिशिमा स्तब्ध होतो, आणि त्याच्यासमोर बेटावरील जवळपास सगळे गॉडझिलाकडून मारले जातात. युद्ध संपते. शिकिशिमा बॉम्बिंग मध्ये उद्ध्वस्त टोकियोत परत येतो. घर, आई वडील - काही शिल्लक नसते. "सरव्हायव्हर्स गिल्ट"ने त्याची मनस्थिती विदीर्ण असते. आपण ड्युटी चुकवणारे कामिकाझे पायलट आहोत, आपल्या मुळे अनेक लोकं गॉडझिलाकडून मारली गेली हे विचार त्याला पोखरत असतात. निव्वळ योगायोगाने त्याला एका परिवाराची जबाबदारी मिळते, आणि तो युद्धात अमेरिका आणि जपानने समुद्रात पेरलेल्या अगणित सुरुंगांना शोधून निष्फळ करण्याची धोकादायक नोकरी घेतो. नवीन कामात आणि घरात थोडी स्थिरता येत असते तोच त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खोल समुद्रात गॉडझिलाशी संपर्क होतो. गॉडझिला टोकियो वर चालून येणार हे समजल्यावर शिकिशिमाचा भूतकाळ परत त्याला छळू लागतो. व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर मिळालेला. खरेतर व्हिज्युअली सिनेमाचे कमी बजेट जाणवते पण कुठेही वावगे वाटत नाही. कथेतली पात्रं मस्त लिहिली आहेत. पाहण्यासारखा सिनेमा. (बघण्यासाठी दोन पर्याय - अमेझॉन प्राईम vpn करून जपान. किंवा पायरसी. तिसरा पर्याय सध्या उपलब्ध नाही.)

लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक मानसिक थकवणा-या काळानंतर निवांतपणे नेटफ्लिक्सवर 'लापता लेडीज' सुंदर सिनेमा बघितला. चित्रपट मनोरंजन करतो आणि एक चांगला संदेशही देतो. अभिनेत्यांचा अभिनय, कथा, छायाचित्रण सुरेख. आवडला सिनेमा. नेटफ्लिक्सवर 'हिरामंडी' चा भाग एक संपवला. भव्य दिव्य सेट, छायाचित्रण, नृत्य, आणि स्वातंत्र्य संग्रामाची कथेचा पाया रचणारी सुरुवात उत्सकता लागली आहे. दुस-या भागाला सुरुवात केली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद..

In reply to by गवि

>>>खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद.. सहमत आहे. एकदा निकाल लागला की या काळातील अनुभवाविषयी आवश्यक ती काळजी घेत लेख लिहावा अशी विनंती.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिरामंडीच्या तिस-या भागापर्यंत पोहचलो. सालं कंटाळा येऊ लागलाय. बघतो अजून पुढे काय होतं ते...... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकादे जबाबदारीचे आणि कष्टाचे काम व्यवस्थितपणे पार पाडणे ही मोठीच समाधानाची बाब असते. त्याबद्दल अभिनंदन. या अनुभवावर नक्की लिहावे ही विनंती. तुमचे लेख बरेच दिवसात वाचायला मिळालेले नाहीत.

भक्ती आणि अबा धन्स. -दिलीप बिरुटे

'सोसायटी ऑफ द स्नो' रग्बी संघातील खेळाडू आणि मित्राचं विमान निर्जन बर्फाळ उंचपर्वत रांगात कोसळतं महिन्या-दोन महिन्यातील भावना आणि जगण्याचा संघर्ष सुरु होतो. अडकले आणि शेवटी सुटले असे सिनेमे आवडतात सिनेमा मधे संथ वाटतो, कंटाळा येतो. पण सूटका होईपर्यन्त पर्यन्त पाहावे लागते. :/ -दिलीप

सध्या मार्वल स्टुडिओचे सिनेमे पाहतोय. म्हणजे आधी सगळे असे काही पहिले नव्हते. एक-दोनच पहिले होते. आणि अपत्ये, भाचरे-भाचऱ्या, पुतणे-पुतण्या वगैरे लोक त्याबद्धल जी चर्चा करतात त्यात मला पुरेशी माहिती नसल्यामुळे काहीसे बाजूला पडल्यासारखे होत होते. हवे तर FOMO म्हणा! पण सध्या थोडा वेळ आहे म्हणून पंधरा दिवसांपासून जसा वेळ मिळेल तसे पाहतोय. पाच-सात पाहून झालेत. त्यांतली मला सर्वात आवडलेली व्यक्तिरेखा म्हणजे टोनी स्टार्क. रच्याक, ते सिनेमे पाहण्याचा हा क्रम बरोबर आहे का? Chronological as per Story Lines
  1. Captain America: The First Avenger (1940s)
  2. Captain Marvel (1990s) (Mid-credit scene takes place after Avengers: Infinity War)
  3. Iron Man (2008)
  4. Iron Man 2 (2010)
  5. The Incredible Hulk (2010)
  6. Thor (2011)
  7. The Avengers (2012)
  8. Iron Man 3 (2012)
  9. Thor: The Dark World (2013)
  10. Captain America: The Winter Soldier (2014)
  11. Guardians of the Galaxy (2014)
  12. Guardians of the Galaxy Vol. 2 (2014)
  13. Avengers: Age of Ultron (2015)
  14. Ant-Man (2015)
  15. Captain America: Civil War (2016)
  16. Black Widow (2023) (Events take place after Captain America: Civil War)
  17. Black Panther (2016)
  18. Spider-Man: Homecoming (2016)
  19. Doctor Strange (2016-2017)
  20. Thor: Ragnarok (2017)
  21. Ant-Man and The Wasp (2017) (Post-credit scene occurs during Avengers: Infinity War)
  22. Avengers: Infinity War (2018)
  23. Avengers: Endgame (2018-2023)
  24. Spider-Man: Far From Home (2024)
क्रम चुकलेला असल्यास किंवा काही राहून गेलेले असल्यास सुधारणा करून द्यावी ही विनंती.

'लंपन' सोनी लीव् वर आठ भागातली मराठी मालिका. 'लंपन' माझ्या पिढीला माहिती नाहीच. 'वनवास, शारदा, पंखा आणि झुंबर हे चारही कथासंग्रह अभ्यासक्रमात शिकवायला नव्हते म्हणून वाचले नव्हते. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या 'लंपनच्या गोष्टी' छोट्या पडद्यावर आल्या आहेत. लंपन बघायला सुरुवात केली आणि 'म्याड' झाल्यासारखा हसत बसलो. आपलं हे वाचायचं राहून गेलं. सध्या पुस्तक वाचायची सवय राहिली नाही, हे शाळेतील दप्तरात भरलेल्या 'शहात्तर गोष्टी' सारखं पुन्हा पुन्हा स्वत:शी बोलत राहिलो. 'लंपन' प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र, आई-वडिलांचे घर सोडून बेळगावाकडील रम्य निसर्ग परिसरात आजी-आजोबाकडे शिकायला आलेला. आजोबा पुरातत्त्व विभागाचे संशोधक. काठी घेऊन तड-तड़ करीत नातवामागे एकशे बेचाळीस वेळा धावणारी प्रेमळ आजी. मोठाले आणि काण्या डोळ्याचा भयंकर वाटणारा पण प्रेमळ नोकर बाबूराव. शाळा, संगीत, शाळेतील दोस्त आणि सुमी-त्रा त्याचे म्हणून पाहिले तरी हजार वेळा तो प्रसंग आपलाच घडतोय असे वाटणारे आपल्यातला लंपन. 'लंपनचं' भावविश्व, त्याचं मनोगत,त्याचा निरागसपणा, आई-वडिलांच्या आठवणी- प्रेम, नदी, फुलपाखरू, कौलारु घर, कंदील आणि निरागस नदीकाठावर बसलेला दात बाहेर आलेला दहा-बारा वर्षाचा स्वत:शी बडबड करणारा लंपन. 'सोनी लीव' वर दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी लंपनचं भावविश्व आतिशय सुदंर उभं केलं आहे आपण 'म्याड' झाल्यासारखे सारखं सलग पाहात राहतो. लंपनची भूमिका करणा-या मिहीर गोडबोले आपलं मन 'एकोणतीस हजार' वेळा जिंकून घेतो. मालिका संपता-संपता लंपनच्या मैत्रिणीसारखे आपण 'हजारवेळा' व्याकुळ होतो. प्रकाश संत यांचा 'लंपन' एकदा जरी बघितला तरी, पुस्तक न वाचताही 'शंभर वेळे'चा आनंद नक्की मिळतो. लंपन नक्की पाहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुपचं सुंदर रसग्रहण केले आहे! आज पाहिली ही सिरीज.. #लंपन मनातल्या निरागस बडबडीची साखळी बांधणारा प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र.आईपासून दूर आल्यामुळे किंचित हिरमुसलेला पण आजी,आजोबा,सुमि-त्रा ,ढीगभर दांडगे मित्र,गावतले चार दोन घरोबा यात आपल्यासाठी आनंदाच्या गोष्टी साकारत राहतो. अगदी पहिल्याच भागात मार्जार अवतार हे बोक्याच्या खुसखुशीत वर्णन ऐकून मेंदूची प्लास्टिसिटी खाडकन जोडली गेली आणि वनवास कादंबरी फार पूर्वी वाचली होती हे आठवलं. कारवारी मराठी भाषेतला गोडवा,पोषाखतला जुनसर दिखामदारपणा, बारवेत फुललेली कमळे गुंडेमठाचा घनदाट रस्ता, शाळेतला घंटेच्या तालावरचा दंगा सारं काही मनाला गारवा देणारा आहे.लंपनच्या निमित्ताने घरात २१२२१ वेळा फिसकन,गडबडा हसलो आहोत. अगदीच 'म्याड' झाल्यानंतर नववारीतली आजीची आठवण येऊन गावकडे जायचा बैलगाडीचा प्रवास पुन्हा डोळ्यासमोरून तराळून गेला.तुम्हांला खोटं वाटेल पण माझी लेक (वय ९) यातल्या मधूर गीतांनीही भुरळून गेली आणि "काय सुंदर गाणं आहे" अशी दाद सहज देऊन गेली.लेकीला असं काहीतरी ओरग्यानिक देण्याची सतत धडपड असते. मालगुडी डेज कधीही लावून ते मी करत असते.आता लंपनही गवसला आहे.पुढच्या सीजनच्या प्रतिक्षेत... -भक्ती

रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा पाहायला सुरुवात केली तेव्हा चकचकीत उडता पंजाबी हिरो ,मिष्टी सुंदर हिरोईन,मध्येच त्यांच्या आजी आजोबांची जुनी अधुरी प्रेम कहाणी, दोन्ही कुटुंबांचा हिरो हिरोईनच्या प्रेमाला विरोध टिपीकल प्लोट वाटला.यावर चांगली जिलेबी टाकणार होते रिव्ह्यूचा. पण जेव्हा हिरोईन हिरो एकमेकांच्या घरी राहून एक प्रयोग करायचा ठरवतात.तेव्हा खुप इंटरेस्टिंग होतो सिनेमा.एकदम फ्रेश स्टोरी एक पुरुष म्हणून तो नृत्य करू शकत नाही? पुरूष स्त्रीयांना बायको' tag मधून मोकळीक कधी देणार?असे आणि खुप प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात सिनेमा पुढे सरकत जातो.मस्त होत जातो सिनेमा,करण जोहर खरंच कधी अफलातूनपणे विचारात पाडतो. अरजित सिंगच्या वे कमलेया गाण्याने ह्रदयात जागा मिळवली आहे. वे कमलेया, मेरे नादान दिल दो नैनों के पेचीदा सौ गलियाँ रे इनमें खो कर तू मिलता है कहाँ तुझको अम्बर से पिंजरे ज़्यादा प्यारे उड़जा केहने से सुनता भी तू है कहाँ गल सुणले आ..

In reply to by Bhakti

ता क.अभिमानाची गोष्ट ही की ,यातल्या कथक गाण्यातले काही नृत्य भाग माझ्या मैत्रिणीच्या बहिणीने जास्वंदीने तिच्या गुरूसह बसवले आहेत :)

लापता लेडीज किरण राव दिग्दर्शिका आहे, म्हणून बघावा कि नाही या संभ्रमात होतो, पण दुसरा कुठला पर्याय न सुचल्याने, - लापता लेडीज चित्रपट बघितला. २००१ च्या काळातील २ स्त्रियांची कथा, चुकामुक होऊन वेगळ्या ठिकाणी पोचल्या मुळे तयार झालेली परिस्थिती अतिशय सुंदर प्रकारे दाखवली आहे. २ वेगवेगळे रुपातले पुरुष आणि त्यांचे विचार, वेगळ्या प्रकारचे वुमन एम्पावरमेंट, चांगले आणि वाईट मिळणारे लोक आणि अनुभव, संशयास्पद हालचालीतून होणारे छोटेसे रहस्य, आणि त्या रहस्याचा मन प्रफुल्लित करणारा उलगडा ! रवी किशन आणि छाया कदम हे दोनच ओळखीचे कलाकार, आणि बाकीच्यांनी सुद्धा छान वास्तविक अभिनय केला. एक शांत सुंदर हळू हळू हसवत, मध्ये मध्ये मनाला डिवचत असा आवडलेला चित्रपट.

दोन दिवसांपूर्वी ओटीटीवर मराठी ’चुंबक’ सिनेमा बघितला. साहील जाधव, संग्राम देसाई आणि स्वानंद किरकिरे या तिघांचा हा सिनेमा. कथानक साधंसं. स्वानंदचा ’प्रसन्न”चा अभिनय नंबर एक. लॉटरी, फसवा फसवी, प्रामाणिकपणा, भन्नाट जमलंय सर्व. सिनेमा आवडला. -दिलीप बिरुटे

दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे पाहिले. पहिला फोर्ड वि फरारी. केन माईल्स आणि कॅरोल शेलबी ह्या जोडीची गोष्ट आहे. ह्या दोघांनी फोर्डच्या गाडीवर काम करून फरारीस नमवण्याचा कसा प्रयत्न केला ह्यावर सिनेमा आहे. ह्यात मग माईल्सचा विचित्र स्वभाव, फोर्ड मधले ब्युरोक्राटीक अडथळे वैगेरे वैगेरे गोष्टी येतात. ख्रिश्चन बेल आणि मॅट डिमन असून सुद्धा सिनेमा ठीक ठीक वाटला. उगाच खेचला आहे असे काही ठिकाणी वाटले. रश हा दुसरा सिनेमा. ह्यात निकी लौडा म्हणून ऑस्ट्रीयन रेसर आणि जॅक हंट ह्या ब्रिटिश रेसर मधली चुरस दाखवली आहे. अत्यंत calculating असणारा निकी आणि आतातायी जेम्स हंट ह्यांची पात्रे छान रंगवली आहेत. सिनेमा खूप आवडला. एकमेकांविरुद्ध स्पर्धा करताना स्वतःचे प्राण अधिकाधिक धोक्यात घालणाऱ्या हया रेसर्सच्या खऱ्या कथेत ड्रामा ओतप्रोत भरला आहे.

कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ पूर्ण केलाय. अमरेंद्र बाहुबली, हे बघितले नसतील तर नक्की बघा - 1. The departed- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजीत मूवी एक्सप्लेशन पाहिलं आवडलं. मला लिओनार्डो दी कार्पिओ आणी मॅट डेमन ह्याच्यातला फरकच कळत नव्हता त्यामुळे सिनेमा समजत नव्हता. 2. Gone girl- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजी एक्सप्लेशन शोधतोय युट्यूबवर. आज संपवेन. 3. Memento- हा आपला गजनी असल्याचे पहिल्या काही मिनिटातच समजल्याने बंद केला. 4. 12 angry men- हा डालो करून ठेवलाय. 5. Doctor Strangelove (or how I learned to stop worrying and love the bomb)- हिंदीत मिळाला नाही यूट्यूब एक्सपेलनेशन पाहिलं हिंदीत. छान होता. 6. Prisoner- हया नावाचे बरेच सिनेमे होते. २०१३ चा पाहिला लहान मुलीच्या किडनापिंग चा. आवडला. 7. Nightcrawler- डालो केलाय 8. Django unchained- डालो केलाय. 9. The Thing- मस्त सायफाय. आवडला. 10. Rosemary's baby- मस्त मस्त आणी मस्तच. भारी भयपट. हया व्यतिरिक्त द सायलेंस of द लांब्स पाहिला. आवडला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला सिनेमे आवडले हे ऐकून आनंद झाला. गझनी मेमेंटो वरून बेतला असला तरी memento ची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. वरवरची संकल्पना सोडल्यास दोन्ही सिनेमे पूर्ण वेगळेच आहेत. आणखी काही recommendation - The big short Eyes wide shut Spotlight The princess bride The Witch

Fantastic Beasts हा हॅरी पॉटर मालिकेचा प्रीक्वल आहे. १.Fantastic Beasts and Where to Find Them २.Fantastic Beasts: The Crimes of Grindelwald हे दोन भाग पाहिले.तिसरा भाग उद्या पाहते. ३.Fantastic Beasts: The Secrets of Dumbledore आणि मग हॅरी पॉटरचे पारायण करावे लागेल का ,😀 या संस्थळावर सगळी टाईमलाईन सांगितली आहे. https://edrawmind.wondershare.com/movie-tips/fantastic-beasts-timeline….