*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४*
*कट्टर भाजप समर्थक* :
यांना देशातल्या प्रत्येक राज्यातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक गावातला प्रत्येक ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचाच हवा असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप समर्थक आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपपासून थोडासा लांब गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला प्रतिकूल अशी बनली तर काय करायचं ? तशी वेळच येऊ नये म्हणून हे मुसळधार पाऊस जसा पडतो तसं भाजप , राममंदिर , संघ , नरेंद्र मोदी हे चार प्रकारचे बाण सतत मारत राहतात.
*अतिजेष्ठ* :
नोकरीतून निवृत्त होऊन साधारणपणे दहा पंधरा वर्षे झालेली असतात. घरात बसून करायचं काय? बायकोला कटकट नको असते. नातवंडे , मुले आपापल्या व्यापात असतात. मग करायचं काय म्हणून हे लोक कुठलातरी व्हाट्सअप ग्रुप पकडतात. शांतपणे वाचन चालू असतं. कधी कुठे काही आपला अनुभव उपयोगी पडतो असं वाटत असलं तर ते लिहितात सुद्धा. पण विरंगुळा म्हणून पकडलेला व्हाट्सअप ग्रुप त्यांना फार काळ सोसवत नाही. कारण स्क्रीनचा उजेड , टाईप करणे ही खिंड त्यांना फार काळ लढवता येत नाही. मग वैतागून ते अचानक सोडून जातात.
*कायमचे वाचक* :
कायमचे वाचक हे कुठल्याही ग्रुपात शिरल्यानंतर पहिल्या क्षणापासून ते त्या ग्रुपात असेपर्यंत केवळ वाचकच राहतात. आपणही माणूस आहोत , आपले आज जे काही वय आहे त्या वयात येईपर्यंत आपणही उघड्या डोळ्यांनी हे जग बघितलेलं आहे , काहीतरी अनुभव घेतलेला आहे , आपल्याकडच्या एखाद्या चांगल्या माहितीचा कोणाला तरी काहीतरी उपयोग होऊ शकतो , अनुभवाचा उपयोग होऊ शकतो वगैरे शूद्र विचार यांच्या मनालाही शिवत नाहीत. आपल्याला परमेश्वराने या व्हाट्सअप ग्रुपवर दाखल केलेलं आहे ते फक्त वाचण्यासाठीच. आपण या ग्रुपची शान आहोत , आपण वाचतो आहोत म्हणूनच या ग्रुपवर कोणीतरी काहीतरी लिहिते आहे. आपण जर या ग्रुपमधून बाहेर गेलो तर मग यांचं लिहिलेलं वाचणार कोण? असा काहीतरी भ्रम होऊन लिहिणाऱ्यांना उपकृत करण्याच्या उद्देशाने हे तिथे शांतपणे महिनोंमहिने , वर्षानुवर्षे फक्त वाचत राहतात.
*देवाची तिजोरी* :
देवाची तिजोरी गटातल्या लोकांकडे दैवी शक्ती भरपूर असते. देवीदेवतांचे व्हिडिओ , फोटो , गाणी हा सगळा माल बक्कळ असतो. कुठून तरी आलेले हे देवादिकांचे फोटो , व्हिडिओ किंवा ते कमी पडले तर शेअरचॅट वरून उतरवून घेतलेले व्हिडिओज हे फॉरवर्ड करत राहतात. देवाची तिजोरी ; भक्तीचाच ठेवा ; तुम्हाला द्यायलाच हवा असं म्हणून या भक्तीसागराचा व्हॉल्व ते पूर्णपणे ओपन करतात. हे मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकच असतात.यांच्या दैवी व्हिडिओ , फोटोजना बरेच भक्त दोन हातांनी वंदन केलेली इमोजी पाठवून भक्तीभाव दाटून आल्याची पावतीही देतात.
*कुतूहलाचे किडे* :
यांना व्हाट्सअपवरची बरीच फीचर्स नवीन असल्याने यांच्या आतले कुतूहल चाळवले जाते. मग हे कधी ग्रुप कॉल सुरू करतात तर कधी व्हिडिओ कॉल सुरू करतात. Admin ने ग्रुप परमिशन सेट केलेल्या नसतील तर हे एडमिन ओन्ली म्हणजे नक्की काय असतं ते वापरून बघतात. जमतील तेवढी फिचर्स वापरून त्या ग्रुपचे खेळणे करून आपलं बालसुलभ कुतूहल शमवू बघतात. मग त्यानंतर admin त्यांना ओरडतो किंवा मनातल्या मनात शिव्या घालत त्यांनी केलेली सेटिंग पूर्ववत करत बसतो.
*शुभेच्छुक* :
इतरवेळी चर्चेत कधीही भाग न घेणारे , काही माहिती न देणारे हे लोक सणावाराला मात्र आवर्जून शुभेच्छा देतात. त्या पण अक्षरी नव्हे. कुठून तरी चित्र/फोटोरुपी बॅनर घेऊन येतात. नव्या वर्षाचे स्वागत असो , हनुमान जयंती असो , राम नवमी असो , गुढीपाडवा असो , दसरा , दिवाळी असो. त्या सणाच्या दिवशी येतातच. यांच्या आधी कोणी शुभेच्छा दिलेल्या असल्या तरी त्या आपण दिलेल्या नसल्याने दुसऱ्याचे पोस्टर आपले कसे समजायचे? असा विचार करून हे स्वतःकडचे तसेच शुभेच्छा असणारे पोस्टर चिटकवून जातात.
:) :) :)
वाचने
8346
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं. विरंगुळा.
आमचे दोन पैसे
पुल उवाच
In reply to आमचे दोन पैसे by सर टोबी
खरंय
In reply to आमचे दोन पैसे by सर टोबी
फूलवाले राहिले. सकाळी सकाळी
वपुंचे कोट्स पुलं च्या नावावर
In reply to फूलवाले राहिले. सकाळी सकाळी by गवि
परवा माझाच एक मिपावरचा लेख
In reply to वपुंचे कोट्स पुलं च्या नावावर by विजुभाऊ
घेतोस की नाही
In reply to फूलवाले राहिले. सकाळी सकाळी by गवि
कळले नाही..
In reply to घेतोस की नाही by उपयोजक
हा हा !
१ मिनिटांनचा व्हिडिओ पाहायचं
In reply to हा हा ! by Bhakti
कायप्पावर भक्तगणांची मांदियाळी.....
हे राहिले -
तुम्हाला कोण / काय हवे आहे
In reply to हे राहिले - by वामन देशमुख
पुरावा द्या म्हटले तर पळ काढतात.
In reply to हे राहिले - by वामन देशमुख
अवांतर
*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*
In reply to अवांतर by वामन देशमुख
*असं व्हाट्सऍपवर लिहितात.*तुम्हाला लेखकाची किर्ती माहित नाही का? :=)अजून काही १
आतल्या गाठीचे
In reply to अजून काही १ by सर टोबी
जेष्ठांचा समुह....
हा हा हा ... खुसखुशीत ! मस्त
लेख छान आहे. ग्रुपमधील बरेच
चकटफू शुभेच्छक
आमच्या मित्राने व्हाट्स अॅपवरून हे टाकायला सांगितल्याने
आणि त्यांना आताशा
In reply to आमच्या मित्राने व्हाट्स अॅपवरून हे टाकायला सांगितल्याने by घायाळ
यात एक ऍड करू इच्छितो,
)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात
In reply to यात एक ऍड करू इच्छितो, by खटपट्या
)मराठी बोला चळवळ ग्रुप - यात सद्य परिस्थिती लक्षात न घेता उगाच आमका हिंदीत बोलला म्हणून रोज सकाळी बांग द्यायची,सद्य परिस्थीती काय आहे??? आणी राज्यभाषेची मागणी करणं म्हणजे बांग देणं?? मराठी भैय्ये हे प्रकरन खरंच इंटरेस्टींग आहे हे तुमच्याकडे पाहून कळतं. :)लेकी बोले सुने लागे,
In reply to )मराठी बोला चळवळ ग्रुप - यात by अमरेंद्र बाहुबली
हॅ हॅ हॅ
In reply to लेकी बोले सुने लागे, by खटपट्या
हम्म यामुळे
In reply to यात एक ऍड करू इच्छितो, by खटपट्या
आले आले,
In reply to हम्म यामुळे by उपयोजक
मराठी भाषा शुद्धीकरण ग्रुप -
इतका त्रास होत होता तर सोडून द्यायचा ना ग्रुप? ;)
In reply to मराठी भाषा शुद्धीकरण ग्रुप - by खटपट्या
कोण थांबलय, शीघ्रकोपी :)
In reply to इतका त्रास होत होता तर सोडून द्यायचा ना ग्रुप? ;) by उपयोजक