Skip to main content

रेव्हेन्यू स्टँप

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 07/05/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्याला पावती देताना घेताना रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. याचे नियम कोणाला माहिती आहेत का? किती रुपयाच्या वरच्या व्यवहारावर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो? कोणत्या प्रकारच्या व्यवहारात? फक्त रोखीने व्यवहार केल्यास की चेकने केल्यावर पण? राज्याराज्यात नियम वेगवेगळे असतात की देशभर एकच? आगाऊ आभार मानीत आहे.

वाचने 4572
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. देशभरात एकच नियम आहे. अजून एक नियमः रेव्हेन्यू स्टँप जीभेवर अर्धा मिनिट ठेवून तिरका, आडवा, कसाही चिकटवावा लागतो.

In reply to by कपिल काळे

रोख किंवा चेक कसल्याही रु ५००० च्या वरील व्यवहाराच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप लावावा लागतो. देशभरात एकच नियम आहे. तेलगी महाशयांच्या कृपेमुळे इथे कर्नाटकात - किमान बंगळुरात तरी - घरभाडे पावती वर वा अन्य व्यवहारांवर रेव्हेन्यू स्टँप लावणे बंधनकारक नाहिये... साध्या कागदावरची सही पण ग्राह्य धरली जाते. स्टँप्स चा भारी तुटवडा की घोटाळ्यामुळे खरा व खोटा स्टॅम्प ओळखण्याचा घोळ माहित नाही कशामुळे पण बंगळुरात तरी रेव्हेन्यू स्टँप वापरला गेलेला मी पाहिला नाही... हा माझा स्वतःचा अनुभव आहे, अन्य कोणाला कसा अनुभव आहे मला माहित नाही... माझी घर भाडे पावती रेव्हेन्यू स्टँप शिवाय अधिकृत भाडेपावती म्हणून इन्कम टॅक्स करिता ग्राह्य धरली गेली आहे. सागर

रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

In reply to by यन्ना _रास्कला

रुपये पाच हजार नव्हे तर पाचशे रुपयांपासूनच्या व्यवहारावर(पावतीवर) एक रुपयांचा रेव्हेन्यू स्टँप लाववा लागतो. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

माहितीबद्दल धन्यवाद खराटा (रंग माझा वेगळा)

रु. ५००/- च्या वरच्या कोनत्या पन व्यवहरासाठी. रु. ५००/- नव्हे... रु. ५०००/- च्या पुढच्या व्यवहारासाठी... ---सुहास

आणि तो रेव्हेन्यू स्टँप हा जुना १० पैशांचा आहे की नवीन एक रुपयाचा हे भिंग लावून तपासावे लागते.

आणि तो रेव्हेन्यू स्टँप स्वत:च्या पैशाने (आता रुपयाने ) विकत घ्यावा लागतो. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

रेव्हेण्यू स्टँप फार सुंदर दिसतो , मला त्यावरची णक्षी आवडते ... मला रेव्हेण्यू श्टँप लै लै आवडतो - टारझन