Skip to main content

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०२३

लेखक बाबुराव यांनी रविवार, 08/10/2023 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा. वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा. गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
TeamsMatWonLostTiedNRPtsNRR
India (Q) 9 9 0 0 0 18 2.57
South Africa (Q) 9 7 2 0 0 14 1.261
Australia (Q) 9 7 2 0 0 14 0.841
New Zealand (Q) 9 5 4 0 0 10 0.743
Pakistan (E) 9 4 5 0 0 8 -0.199
Afghanistan (E) 9 4 5 0 0 8 -0.336
England (E) 9 3 6 0 0 6 -0.572
Bangladesh (E) 9 2 7 0 0 4 -1.087
Sri Lanka (E) 9 2 7 0 0 4 -1.419
Netherlands (E) 9 2 7 0 0 4 -1.825

वाचने 30251
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by तुषार काळभोर

३२ ओवर्स मध्ये २२०/२ असताना न्यूझीलंडला बऱ्यापैकी संधी होती. दव न पडल्याने आणि चेंडू हवेत मूव्ह होणं बंद झाल्याने 18 षटकात 180 असं अवघड पण प्रयत्न करता येईल असं टार्गेट होतं. पण शमीने दोन विकेट घेतल्या आणि तो प्रयत्न अवघड होईल, याची तजवीज केली. पुढे फिलिप्स आऊट झाला आणि सगळं संपलं. 70-80 च्या दशकात वेस्टइंडीजच्या फास्ट बॉलर चौकडीचा जो दरारा होता तसा या वर्ल्डकप मध्ये बुमरा, शमी आणि सिराज या भारतीय तिकडीचा आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण २१२ असा सामान्य स्कोर करता आला. नेहमीप्रमाणे चोकर्स हे बिरूद सार्थ करतात की काय आता?

उपांत्यफेरीचा पहिला सामना भारत आणि न्युझीलंड हाही रंगतदार तर चोकर्स म्हणून प्रसिद्द असलेले अफ्रिका आणि ऑष्ट्रेलिया यांचाही सामना छानच झाला. न्युझीलंडबरोबर खेळतांना भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली इथेच आपल्या विजयाने पाया रचायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे सुरुवात रोहीटने धुवाधार सुरुवात केली. २९ चेंडुत ४७ धावा, शुभमन ६५ मधे ७९, कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु दे तुझं टुकुटुकु ) श्रेयस तर जब्रा खेळला ७० मधे १०५ आणि के एल रावल्या २० मधे ३९ सगळेच चांगले खेळले पण अजून वीस तीस धावा वाढल्या असत्या जर कोहल्या शतकाजवळ आल्यावर टुकुटुकु नसता खेळला तर, ५० षटकात ३९७ चांगला स्कोर होता. न्युझीलंड एक सज्जन आणि शिस्तीवाली टीम. पहिल्या दोन विकेट्स ३९ धावांवर गेल्या तेव्हा आपण रीलॅक्स झालेलो. पण २०० धावा झाल्या तरी विकेट्स पडेना देवाचा धावा करावा लागलेला. मैदानावरील प्रेक्षकांचा आणि आपला आवाज म्यूट झाला होता. तिसरी आणि चौथी विकेट पडली २२० धावांवर आणि मग पुढे 'शमीने' केलेली अफलातून गोलंदाजी त्याच्या सात विकेट्सने आपण फायनलला पोहचलो आपण निश्चिंत झालो. आपण जिंकल्याचा आनंद आहे, तसा न्युझीलंड हरल्याचे दु़;ख आहेच. ऑष्ट्रेलिया आणि अफ्रिकेच्या सामन्यात सुरुवातीपासुनच फलंदाजी घेवून अफ्रिकेने माना टाकायला सुरुवात केली. चोकर्स म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अफ्रिकेनं आपलं काम सार्थ केलं. 212/10 (49.4 Overs) हा काही सामना जिंकवणारा स्कोर नव्हता. पण, पुढे जिद्दीने अफ्रिकेने सामना खेचायचा प्रयत्न केला अजून दोन एक विकेट्स लवकर मिळवल्या असत्या तर कदाचित अफ्रिका जिंकलीही असती. क्रिकेट अनिच्छिताओ का खेल म्हणून प्रसिद्ध त्यामुले जर तर क्रिकेटमधे चालत नाही. तर, २०२३ विश्वचषक क्रिकेट अंतिम सामना भारत आणि ऑष्ट्रेलियात रविवारी होतोय. मला तर, अफ्रिका न्युझीलंड आणि इतर संघापेक्षा भारतीयभारतीय संघ चोकर्स वाटतो, अजिबात विश्वासू टीम वाटत नाही. न्युझीलंडने आपला घसा कोरडा पाडला होता. आपला संघ लै भारी वगैरे मान्य तरीही भारतीय संघाला विजयी होण्यासाठी शुभेच्छा. रंगतदार सामना बघायला मिळावा. एवढे बोलून उपांत्यफेरीचं मनोगत पूर्ण करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु दे तुझं टुकुटुकु )
कोल्याचे हे स्वार्थी शतक होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शतक होण्याच्या जस्ट आगोदर आणि नंतर यातील त्याच्या फटकेबाजीतला फरक नेहमीच ढळढळीत असतो. त्याच्या टॅलेंटबद्दल कोणताच वाद नाही. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे चक दे इंडिया चित्रपटातल्या कोमल चौताला आणि प्रीती सबरवाल यांची आठवण होतेच. इथे सुदैवाने अटीतटीची वेळ नव्हती. एकेक बॉल तितकासा किंमती नव्हता. खरे तर कोणताच बॉल स्वस्त नसतो. पण असो.

In reply to by गवि

अय्यर मूळे ३५० चे ३९८ झाले. ३५० च्या आसपास चा स्कोअर त्यांनी आरामात केला असता.

यंदाचा भारतीय संघ एकदम परफेक्ट वाटते.शमी,जडेजा,सिराज आणि फलंदाजांची मोठी फळी.आजही ८०% पारडं आपलंच जड आहे फक्त २०% मनोवृत्ती नुसार ओस्ट्रेलियाचे फायनलचे रेकॉर्ड पाहून थोडं डामाडौल आहे . अर्थात यंदाची ओस्ट्रेलिया तो 'दरारक' संघ वाटतच नाही. भारतीय संघाला विजयासाठी खुप खुप शुभेच्छा!!

भारत आणि ऑष्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी तयार झाले आहेत. आपणही तयार झालेलो आहोत. दुपारी सामन्यादरम्यान अधुन-मधुन इकडे दळन टाकू. भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक विजेता २०२३ होण्यासाठी शुभेच्छा. जुडेगा इंडिया तो जितेगा भारत. -दिलीप बिरुटे

तीनशे प्लस तरी धावा व्हाव्यात. आता रावल्या आणि जड्डू टीकून आहेत १७० -०४ in ३४. ४ -दिलीप बिरुटे