मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजचा मेनू -१

Bhakti · · पाककृती
A जमलाय का मेनू आली लहर केली बेसनवड्याची काळ्या रश्याची आमटी,कुस्कारायला भाकरी, भुर्रकायला कढी,तोंडी लावायला गुज्जू भरवानी मिरची लोणचे, झणझणीत कांदा काकडी ऐवजी घरात होते किवी.. बेसनवड्याची आमटी पहिल्यांदा ५ चमचे बेसन,३चमचे ज्वारीचे पीठ घेतले.त्याच लसूण आले हिरवी मिरची जिरे यांचे वाटण घातले.मीठ, हळद, तीळ, हिंग घालून कोमट पाण्यात घट्ट मळले.थोडा वेळ बाजूला ठेवले. काळ्या रस्सा करायला धने, तमालपत्र भाजून घेतले.कांदा , खोबरं गॅसवर जाळी ठेवत खरपुस भाजुन घेतले.मिक्सरहून वाटण बारीक केले. नंतर बेसनवड्या लाटून घेतल्या.हलकेच तळून घेतल्या.फोडणी केल्यावर बारीक केलेले मसाले वाटण परतून घेतले.कोमट पाणी त्यात घातले उकळी आल्यावर तळलेल्या बेसनवड्या त्यात सोडल्या.५-८ मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद केला. - भक्ती

वाचने 16569 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by Bhakti

अहिरावण Sat, 10/28/2023 - 14:32
>>म्हणजे काय हो रावण? अहिरावण. रावण वेगळा अहिरावण वेगळा. वारलो - मिपावर हा वाकप्रचार आपणासं माहित नाही. जुन्या पाककृती शोधा. अधिक माहिती https://misalpav.com/node/6472

कंजूस Sat, 10/28/2023 - 18:58
चविष्ट जेवण. आमच्याकडे ' गोळ्यांची आमटी ' किंवा 'गोळ्यांची कढी ' होते. गुजरातमध्ये ' गोटानी कढी ' हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 10/28/2023 - 19:34
हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत. काय सांगता! ' रविवारचा मेनू ' तत्सम प्रकारचा प्रोजेक्ट सुट्टीच्या दिवशी अस़ मनात येतंय, बघूया!

जुइ Sat, 10/28/2023 - 23:44
वा! झक्कासं पाकृ. हिवाळ्यात करायला हवी!

वामन देशमुख Sun, 10/29/2023 - 13:42
मेनू आवडला. कधी करून पाहीन. --- एक शंका: तमालपत्र प्रत्यक्ष खाण्यासाठी वापरतात का? आम्ही केवळ सुगंधासाठी / स्वादासाठी खड्या मसाल्याचा एक भाग म्हणून तमालपत्र (दालचिनी, मिरे, इलायची, लवंगा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता असं) नंतर टाकून देण्यासाठी म्हणून वापरतो.

In reply to by वामन देशमुख

मुक्त विहारि Mon, 10/30/2023 - 18:07
टाकून न देता, पथ्य नसेल तर, खाल्लेत तर उत्तम... शिवाय, असे पदार्थ आपण, तसे कमी प्रमाणातच वापरतो..

Bhakti Mon, 10/30/2023 - 10:41
सर्वांना _/\_ तमालपत्र मसाल्यात कुटतांना आणि इतरवेळी फ्लेवरसाठी वापरतात,तमालपत्र भात शिजवतांना टाकायचा चांगला स्वाद येतो.अर्थात या सगळ्या गोष्टी स्वादासाठीच वापरतात.बाकी खायचच असेल तर मसाला नाहीतर काढा करावा यांचा.

In reply to by प्रचेतस

Bhakti Mon, 10/30/2023 - 21:35
नाही ‌. मी पण आधी पाटोडीच लिहिले होते पण बेसन भाजून शिजवून पाटावर वा तत्सम फ्लैट सरफेसवर थापून बनवतात ती authentic पाटोडी/पाटवडी असं शोधताना समजले :)

पर्णिका Tue, 10/31/2023 - 22:12
मेन्यू आवडला ! :) सध्या आमच्याकडे पोलर कोल्ड फ्रण्टमुळे तापमान बरेच खाली आले आहे. बेसनवड्याची आमटी छान वाटेल या वातावरणांत... एक शंका आहे बेसनवड्या तळून ना घेता वाफवून घेतल्या तर चालतील का ?

In reply to by पर्णिका

Bhakti Wed, 11/01/2023 - 10:20
हो वाफवून घेतल्या तरी चालेल.अगदी न तळता न वाफवता आमटीला उकळली की तशाच कच्च्या सोडल्या तरी चालेल.नीट शिजल्या की तिन्ही प्रकारात त्या वरती तरंगून येतात ,तेव्हा उकळी बंद करा.

In reply to by Bhakti

पर्णिका गुरुवार, 11/02/2023 - 04:07
धन्यवाद भक्ती ! हो मी वाफ़वूनच घेतल्या, जरा व्हेरिएशन म्हणजे कोथिंबीर, खोबरं, खसखस वगैरेंचे सारण भरून रॅव्हिओलीसारख्या वड्या केल्या... अफाट चवीची आमटी झाली. फुलके, वाफाळता भात, आमटी, Tzatziki आणि Lentil Chips असा मस्त बेत झाला. आजचा मेनू - २ कधी येणार ? :)

In reply to by पर्णिका

Bhakti गुरुवार, 11/02/2023 - 09:50
वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता :)
जरा व्हेरिएशन म्हणजे कोथिंबीर, खोबरं, खसखस वगैरेंचे सारण भरून रॅव्हिओलीसारख्या वड्या केल्या
म्हणजे मोदकाची आमटीची बहिण आहे तर रॅव्हिओली :) https://www.misalpav.com/node/49294

In reply to by Bhakti

पर्णिका Mon, 11/06/2023 - 03:48
अरेच्चा खरंच की मोदकही करू शकत होते. :) पण माझ्या डोक्यात वड्या आणि फ्रीजमध्ये असलेले बाकर संपवणे हेच समीकरण पक्के होते, म्हणून रॅव्हिओली केल्या.

गवि Wed, 11/01/2023 - 11:05
इथे आणि अन्यत्र देखील अनेकदा असे वाचले आहे की अमुक हा पदार्थ हिवाळ्यात करायला छान आहे. या थंडीत आता करून बघणार. किंवा अशा पावसाळ्यात हे सूप करायला उत्तम. पेपरात सुद्धा हिवाळ्यातील पदार्थ, पावसाळ्यातील पदार्थ असे येत असते. हे पदार्थ हिवाळ्यातच जास्त चविष्ट लागतात किंवा काही इतर शास्त्र आहे का त्यामागे ते माहीत नाही. बाकी हिवाळ्यात पौष्टिक वगैरे कारण असेल असे वाटत नाही कारण पौष्टिक तर सदैवच खावे.

सुमो गुरुवार, 01/30/2025 - 11:11
गूगल ड्राइव्ह वरच्या फोटोची लिंक काही महिन्यांपूर्वी काम करेनाशी झाली. मूळ फोटो ड्राइव्ह वर असेल (जसा Bhakti यांचा आहे) तर ती लिंक थोsडिशी बदलून फोटो पुन्हा देता येतो. रेशिपी आणि ताट मस्तच.. 👌

In reply to by सुमो

कर्नलतपस्वी गुरुवार, 01/30/2025 - 13:20
थाळीचे चित्र बघून आजही तोंडाला पाणी सुटले. 'डिपसिक'(आजचा हाॅट टाॅपिक),ने पदार्थांचे फ्लेवर्स पाठवता आले तर सोन्याहून पिवळे. मस्त. पाचव्या,मासवड्या आमच्या सारख्या हरकत तृणांवर जगणाऱ्या साठी सामिष भोजनाचा अस्वाद अनुभव देतात. आई,मावश्या बरेच वेळा करायच्या.

सुमो गुरुवार, 01/30/2025 - 13:50
गूगल ड्राइव्हची पब्लिक शेअर्ड लिंक अशी असते. https://drive.google.com/file/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR/view?usp=drivesdk यामधे d/ नंतर आणि /view च्या आधी जो आकडे आणि अक्षरे यांचा संच असतो ती इमेज Id आपल्यासाठी उपयोगी आहे. वर दिलेल्या लिंक मधे इमेज Id 1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR ही आहे. या लिंक मधे इमेज Id टाकायची. 👇 https://lh3.googleusercontent.com/d/इथे इमेज आयडी=s1200?authuser=0 आता लिंक अशी दिसेल. https://lh3.googleusercontent.com/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR=s1200?authuser=0 👆 ही लिंक मिपाच्या फोटो अपलोडर खिडकीत (उगवत्या सूर्याच्या) दिली की झालं. पूर्वपरीक्षण करुन पहा फोटो दिसेल. हा असा.... द टीप: लिंक मधे 's=1200' हा आकडा मोठाच ठेवावा. फोटो जास्त चांगला उमटतो.