जमलाय का मेनू
आली लहर केली बेसनवड्याची काळ्या रश्याची आमटी,कुस्कारायला भाकरी, भुर्रकायला कढी,तोंडी लावायला गुज्जू भरवानी मिरची लोणचे, झणझणीत कांदा काकडी ऐवजी घरात होते किवी..
बेसनवड्याची आमटी
पहिल्यांदा ५ चमचे बेसन,३चमचे ज्वारीचे पीठ घेतले.त्याच लसूण आले हिरवी मिरची जिरे यांचे वाटण घातले.मीठ, हळद, तीळ, हिंग घालून कोमट पाण्यात घट्ट मळले.थोडा वेळ बाजूला ठेवले.
काळ्या रस्सा करायला
धने, तमालपत्र भाजून घेतले.कांदा , खोबरं गॅसवर जाळी ठेवत खरपुस भाजुन घेतले.मिक्सरहून वाटण बारीक केले.
नंतर बेसनवड्या लाटून घेतल्या.हलकेच तळून घेतल्या.फोडणी केल्यावर बारीक केलेले मसाले वाटण परतून घेतले.कोमट पाणी त्यात घातले उकळी आल्यावर तळलेल्या बेसनवड्या त्यात सोडल्या.५-८ मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद केला.
- भक्ती
वाचने
16717
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
वारलो !
वारलो !
म्हणजे काय हो रावण?
In reply to वारलो ! by अहिरावण
म्हणजे काय हो रावण?
>>म्हणजे काय हो रावण?
In reply to म्हणजे काय हो रावण? by Bhakti
>>म्हणजे काय हो रावण?
अहिरावण. रावण वेगळा अहिरावण वेगळा.
वारलो - मिपावर हा वाकप्रचार आपणासं माहित नाही. जुन्या पाककृती शोधा.
अधिक माहिती https://misalpav.com/node/6472
ओह, बरं अहिरावण आणि महिरावण
In reply to >>म्हणजे काय हो रावण? by अहिरावण
ओह, बरं अहिरावण आणि महिरावण म्हणजे काय? खुप दिवसांपासुन विचारायचे होते.
अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही
In reply to ओह, बरं अहिरावण आणि महिरावण by Bhakti
अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे भाऊ होते.
सहमत
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
सहमत
अहिरावण आणि महिरावणानी राम
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
अहिरावण आणि महिरावणानी राम आणि लक्श्मणाला किडनॅप करून नेले होते रॅनसम साठी .
अहिरावण आणि महिरावणानी राम
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
अहिरावण आणि महिरावणानी राम आणि लक्श्मणाला किडनॅप करून नेले होते रॅनसम साठी .
+१०८
In reply to वारलो ! by अहिरावण
मीपण!
मीपण!
In reply to +१०८ by वामन देशमुख
म्हणजे,
मीपण वारलो!
चविष्ट जेवण.
चविष्ट जेवण.
आमच्याकडे ' गोळ्यांची आमटी ' किंवा 'गोळ्यांची कढी ' होते. गुजरातमध्ये ' गोटानी कढी '
हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत.
धन्यवाद काका!
In reply to चविष्ट जेवण. by कंजूस
हे असले पदार्थ हॉटेलवाले कधीच देत नाहीत.
काय सांगता!
' रविवारचा मेनू ' तत्सम प्रकारचा प्रोजेक्ट सुट्टीच्या दिवशी अस़ मनात येतंय, बघूया!
मस्तच भक्ती तै,
डोळ्यानी खाल्ले,तोंडाला कधी मिळेल......
धन्यवाद! नक्की योग येईल :)
In reply to मस्तच भक्ती तै, by कर्नलतपस्वी
धन्यवाद!
नक्की योग येईल :)
+१०८
In reply to मस्तच भक्ती तै, by कर्नलतपस्वी
मीपण!
झकास ,.... एक नंबर !
झकास ,.... एक नंबर !
तोंपासु !
ओहो!
वा! झक्कासं पाकृ. हिवाळ्यात करायला हवी!
मस्त ..
थंडीत असं गरमागरम जेवण छानच वाटेल!
सर्वांना धन्यवाद _/\_
सर्वांना धन्यवाद _/\_
छान साधा, सोपा, सुटसुटित मेनु
छान साधा, सोपा, सुटसुटित मेनु 👍
मेनू आवडला.
मेनू आवडला.
कधी करून पाहीन.
---
एक शंका: तमालपत्र प्रत्यक्ष खाण्यासाठी वापरतात का?
आम्ही केवळ सुगंधासाठी / स्वादासाठी खड्या मसाल्याचा एक भाग म्हणून तमालपत्र (दालचिनी, मिरे, इलायची, लवंगा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता असं) नंतर टाकून देण्यासाठी म्हणून वापरतो.
तमालपत्र आणि इतर मसाल्याचे पदार्थ...
In reply to मेनू आवडला. by वामन देशमुख
टाकून न देता, पथ्य नसेल तर, खाल्लेत तर उत्तम...
शिवाय, असे पदार्थ आपण, तसे कमी प्रमाणातच वापरतो..
सर्वांना _/\_
सर्वांना _/\_
तमालपत्र मसाल्यात कुटतांना आणि इतरवेळी फ्लेवरसाठी वापरतात,तमालपत्र भात शिजवतांना टाकायचा चांगला स्वाद येतो.अर्थात या सगळ्या गोष्टी स्वादासाठीच वापरतात.बाकी खायचच असेल तर मसाला नाहीतर काढा करावा यांचा.
स्वादासाठीच वापरतात.
In reply to सर्वांना _/\_ by Bhakti
थोडे विषयांतर..
मिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि मसाला वेलदोडे ... हे थोड्या प्रमाणात खाल्ले तरी चालतात.
वाह छान फोटो, गोळ्यांच्या
वाह छान फोटो, गोळ्यांच्या ऐवजी वड्यांची आमटी करून बघणार आता एकदा.
बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का
बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का?
नाही .
In reply to बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का by प्रचेतस
नाही .
मी पण आधी पाटोडीच लिहिले होते पण बेसन भाजून शिजवून पाटावर वा तत्सम फ्लैट सरफेसवर थापून बनवतात ती authentic पाटोडी/पाटवडी असं शोधताना समजले :)
मेन्यू आवडला ! :)
मेन्यू आवडला ! :)
सध्या आमच्याकडे पोलर कोल्ड फ्रण्टमुळे तापमान बरेच खाली आले आहे. बेसनवड्याची आमटी छान वाटेल या वातावरणांत... एक शंका आहे बेसनवड्या तळून ना घेता वाफवून घेतल्या तर चालतील का ?
हो वाफवून घेतल्या तरी चालेल
In reply to मेन्यू आवडला ! :) by पर्णिका
हो वाफवून घेतल्या तरी चालेल.अगदी न तळता न वाफवता आमटीला उकळली की तशाच कच्च्या सोडल्या तरी चालेल.नीट शिजल्या की तिन्ही प्रकारात त्या वरती तरंगून येतात ,तेव्हा उकळी बंद करा.
धन्यवाद भक्ती !
In reply to हो वाफवून घेतल्या तरी चालेल by Bhakti
धन्यवाद भक्ती !
हो मी वाफ़वूनच घेतल्या, जरा व्हेरिएशन म्हणजे कोथिंबीर, खोबरं, खसखस वगैरेंचे सारण भरून रॅव्हिओलीसारख्या वड्या केल्या... अफाट चवीची आमटी झाली. फुलके, वाफाळता भात, आमटी, Tzatziki आणि Lentil Chips असा मस्त बेत झाला.
आजचा मेनू - २ कधी येणार ? :)
वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता
In reply to धन्यवाद भक्ती ! by पर्णिका
वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता :)
म्हणजे मोदकाची आमटीची बहिण आहे तर रॅव्हिओली :)
https://www.misalpav.com/node/49294
अरेच्चा खरंच की मोदकही करू
In reply to वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता by Bhakti
अरेच्चा खरंच की मोदकही करू शकत होते. :) पण माझ्या डोक्यात वड्या आणि फ्रीजमध्ये असलेले बाकर संपवणे हेच समीकरण पक्के होते, म्हणून रॅव्हिओली केल्या.
इथे आणि अन्यत्र देखील अनेकदा
इथे आणि अन्यत्र देखील अनेकदा असे वाचले आहे की अमुक हा पदार्थ हिवाळ्यात करायला छान आहे. या थंडीत आता करून बघणार. किंवा अशा पावसाळ्यात हे सूप करायला उत्तम. पेपरात सुद्धा हिवाळ्यातील पदार्थ, पावसाळ्यातील पदार्थ असे येत असते. हे पदार्थ हिवाळ्यातच जास्त चविष्ट लागतात किंवा काही इतर शास्त्र आहे का त्यामागे ते माहीत नाही. बाकी हिवाळ्यात पौष्टिक वगैरे कारण असेल असे वाटत नाही कारण पौष्टिक तर सदैवच खावे.
फोटो
गूगल ड्राइव्ह वरच्या फोटोची लिंक काही महिन्यांपूर्वी काम करेनाशी झाली. मूळ फोटो ड्राइव्ह वर असेल (जसा Bhakti यांचा आहे) तर ती लिंक थोsडिशी बदलून फोटो पुन्हा देता येतो.
रेशिपी आणि ताट मस्तच.. 👌
लिंक मध्ये काय बदल करायचा?
In reply to फोटो by सुमो
लिंक मध्ये काय बदल करायचा? ड्राईव्हवरून फोटो देण्याची प्रोसेस बऱ्यापैकी विसरले आहे.
एक वर्षापूर्वीची...
In reply to फोटो by सुमो
थाळीचे चित्र बघून आजही तोंडाला पाणी सुटले.
'डिपसिक'(आजचा हाॅट टाॅपिक),ने पदार्थांचे फ्लेवर्स पाठवता आले तर सोन्याहून पिवळे.
मस्त. पाचव्या,मासवड्या आमच्या सारख्या हरकत तृणांवर जगणाऱ्या साठी सामिष भोजनाचा अस्वाद अनुभव देतात. आई,मावश्या बरेच वेळा करायच्या.
पाचव्या=पाटवड्या असे वाचावे.
In reply to एक वर्षापूर्वीची... by कर्नलतपस्वी
मन वढाय वढाय मुळे टंकाळ्याची चुक लक्षातच आली नाही. मन पाटवड्यात च गुंतले.
लिंक मध्ये काय बदल करायचा?
गूगल ड्राइव्हची पब्लिक शेअर्ड लिंक अशी असते.
https://drive.google.com/file/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR/view?usp=drivesdkयामधे d/ नंतर आणि /view च्या आधी जो आकडे आणि अक्षरे यांचा संच असतो ती इमेज Id आपल्यासाठी उपयोगी आहे.
वर दिलेल्या लिंक मधे इमेज Id
1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR ही आहे.
या लिंक मधे इमेज Id टाकायची. 👇
https://lh3.googleusercontent.com/d/इथे इमेज आयडी=s1200?authuser=0
आता लिंक अशी दिसेल.
https://lh3.googleusercontent.com/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR=s1200?authuser=0👆 ही लिंक मिपाच्या फोटो अपलोडर खिडकीत (उगवत्या सूर्याच्या) दिली की झालं. पूर्वपरीक्षण करुन पहा फोटो दिसेल.
हा असा....
टीप: लिंक मधे 's=1200' हा आकडा मोठाच ठेवावा. फोटो जास्त चांगला उमटतो.