आमची प्रेरणा क्रांति ह्यांची ही कविता. ही कविता वाचून संध्याकाळचे माझ्या मनातले रुप नकळत लिहिले गेले.
तेज रवी क्षीण होत,वायु मंद ही सुटत
करण्या सांज स्वागता , मीच झांज वाजवली!
तुळशीपुढे लागे दिवा, मग प्रसादाचा मेवा
भारण्या घर सुरांनी, मीच झांज वाजवली!
शुभंकरोतिचे बोल, लक्ष्मीचा असेच काल
सुवासिक तोच धूप, मीच झांज वाजवली!
परवचा गुंजे नाद, दे आज्जी भजन साद
लहानगे कडेवरि , मीच झांज वाजवली!
मंजुळसा तोचि नाद, घालि अंतर्मना साद
साथ देण्या आरतीला , मीच झांज वाजवली!
जोड दिन आणि रात, भक्तिमय आसमंत
मिळवण्या देवाशिष ,मीच झांज वाजवली!
सांज देइल संस्कार, भक्तीचाच पुरस्कार
शत्रुबुद्धी विनाशाय, मीच झांज वाजवली!
Taxonomy upgrade extras
वाचने
3759
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! अतिशय
नाना,
In reply to वा ! अतिशय by अवलिया
काळी शाई
In reply to नाना, by नितिन थत्ते
काळी शाई
In reply to काळी शाई by कपिल काळे
बरे, बरे,
In reply to काळी शाई by नितिन थत्ते
अहो ती
In reply to बरे, बरे, by कपिल काळे
अभिप्राय
In reply to नाना, by नितिन थत्ते
शुभंकरोती...
कपिल,
आवडली. 'मी
छान!
हेच म्हणते..
In reply to छान! by राघव
सर्वांच्य
कपिलराव,
मंगल..
स्वाती
छान आहे
सांज देइल