लेखक मी-दिपाली यांनी मंगळवार, 19/09/2023 00:22 या दिवशी प्रकाशित केले. ॥ श्रीगणेश स्तवन ॥ जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु॥ तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे सुमुख तुझे स्मरता अवघे खल, पापविचार, दशा हरती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥१॥ मुनिजनपूजित वेदपुरस्कृत लौकिक सर्व दिशांत वसे चरण शुभंकर पंकज कोमल लीन जिथे मम शीश असे गजवदना तव आशिष मंगल दुःख निवारण ते करती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥२॥ भवभयहारक दुष्टनिवारक अंकुशधारक रुद्रसुता शुभगुणकानन तू करुणाघन तूच महोदर विश्वपिता कलियुग हे घनघोर धरेवर घे अवतार गुणाधिपती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥३॥ स्वरसुमने नित अर्पियली तुज नादप्रतिष्ठित छंदपती अवतरती स्तवनात निरागस भक्तिसुधारसयुक्त श्रुती निसदिन जे भजती प्रथमेश्वर, ते भवसागर हा तरती वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥४॥ ( वृत्त - हंसगती ) ©® दीपाली ठाकूर वाचने 6489 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया गणपतीबप्पा मोरया ज्ञानोबाचे पैजार मंगळवार, 19/09/2023 07:06 या नादमय गणेशस्तवनाने गलेमाची दणदणीत सुरूवात झाली, मस्त.... आवडले... पैजारबुवा, सुंदर स्तवन.... कर्नलतपस्वी मंगळवार, 19/09/2023 09:21 सुरवात सुंदर केलीत. छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 19/09/2023 18:28 उत्तम रचना आणि गलेमाची उत्तम सुरुवात. -दिलीप बिरुटे सुंदर अहिरावण मंगळवार, 19/09/2023 19:11 कसं लोकांना जमतं एवढं सुंदर लिहायला !! सुरेख रचना. प्रचेतस बुधवार, 20/09/2023 08:14 सुरेख रचना. जबरदस्त! चांदणे संदीप बुधवार, 20/09/2023 15:24 सुंदर रचना. नादमय गणेशस्तवन अ ति शय आवडले. एक मोठ्ठी प्रिंट काढून लावून ठेवतो ऑफिसात समोर. सं - दी - प छान.. स्नेहा.K. शुक्रवार, 22/09/2023 12:10 छान लिहिले आहे! सुंदर नादमय रचना. चौथा कोनाडा शुक्रवार, 22/09/2023 17:39 सुंदर नादमय रचना. गणेशस्तवन आवडले ! चाल लावली असेल, पार्श्वसंगीत दिले असेल तर नक्की इथे टाका !
गणपतीबप्पा मोरया ज्ञानोबाचे पैजार मंगळवार, 19/09/2023 07:06 या नादमय गणेशस्तवनाने गलेमाची दणदणीत सुरूवात झाली, मस्त.... आवडले... पैजारबुवा,
छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 19/09/2023 18:28 उत्तम रचना आणि गलेमाची उत्तम सुरुवात. -दिलीप बिरुटे
जबरदस्त! चांदणे संदीप बुधवार, 20/09/2023 15:24 सुंदर रचना. नादमय गणेशस्तवन अ ति शय आवडले. एक मोठ्ठी प्रिंट काढून लावून ठेवतो ऑफिसात समोर. सं - दी - प
सुंदर नादमय रचना. चौथा कोनाडा शुक्रवार, 22/09/2023 17:39 सुंदर नादमय रचना. गणेशस्तवन आवडले ! चाल लावली असेल, पार्श्वसंगीत दिले असेल तर नक्की इथे टाका !
प्रतिक्रिया
गणपतीबप्पा मोरया
सुंदर स्तवन....
छान.
सुंदर
सुरेख रचना.
जबरदस्त!
छान..
सुंदर नादमय रचना.