वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे
प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे
आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे
धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे
जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे
दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे
नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे
मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत
इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13091
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मृत्युपत्
ह्म्म...
ह्म्म्म्म..
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म.. by llपुण्याचे पेशवेll
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म by पर्नल नेने मराठे
खरं आहे..
मृत्युपत्
In reply to खरं आहे.. by शाल्मली
बोचणारी वेदना!
ह्म्म चांगली कविता!
कवितेचा
धन्यवाद.