दोन हजार सालापर्यंत चित्रपटगृहातच जाऊन पाहावे लागत. तिकिटांचे दर कमी असत. चित्रपट पाहणे, हे दुर्मीळ होते त्यामुळे त्याला सामान्य माणसाच्या भावविश्वात मोलाचे स्थान होते. मराठी, हिंदी चित्रपट चित्रपटगृहात खूप पाहिले. हा लेख चित्रपटगृहात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांवर व त्यावेळच्या भावविश्वावर.
Twenty thousand leagues under the sea हा लहानपणचा पहिला चित्रपट पाहायला माझे काका घेऊन गेले होते. युनिव्हर्सल सर्टिफिकेट असल्याने मुलांनी पाहायला हरकत नव्हती. त्यातला ऑक्टोपस हा प्राणी लक्षात आहे. Black stallion हाही चित्रपट नातेवाईकांसह पाहिला होता. खरं म्हणजे, पाहिला नव्हता कारण सुरवात झाल्यावर मला झोप लागली होती. घरी आल्यावर मी नातेवाईकांना ष्टोरी विचारली. काळा घोडा आपल्या मालकाचे प्राण वाचवतो, असे सांगण्यात आले. अजून मोठे झाल्यावर It is a mad mad world पाहायला आम्ही शाळकरी मुले मुले सायकलवरून गेलो होतो. तुफान हसवणारा हा सिनेमा पाहताना थेटरात मुलांचा हल्लागुल्ला सुरु राहिला. स्वतंत्रपणे सायकलवरून जाणं, मध्यंतरात गोळ्या चॉकलेट घेणं हेही तेव्हा जबरदस्तच होतं.
कॉलेजमध्ये गेल्यावर Home Alone पाहिला. चित्रपट तुफान गाजत होता त्यामुळे तिकिटांकरता रांगाच लागलेल्या होत्या. ब्लॅकने तिकीट विक्री सुरु होती. यातल्या बालकलाकाराने सुरेख काम केले आहे. याच सिनेमातल्या एका सीनवरून लक्ष्मीकांत बेर्डेच्या माझा छकुला सिनेमातला सीन तयार केला आहे, याच्याशी वाचक सहमत होतीलच. Jaws- 3, Jurassic Park, Mask, Volcano, Species, Twister, Golden Eye, Indecent Proposal, My fair lady हे सिनेमेही कॉलेजमधे असताना पाहिले. Jaws च्या वेळेस सुरुवातीला बराच काळ मासा येतच नाही. समुद्रकिना-यावरच्या एकवस्त्रांकित मुलामुलींची इंग्लिश पध्दतीची गंमत सुरु राहते. ज्यांच्यासोबत मी गेलो होते, ते उद्गार काढत होते – काय फसवणूक आहे. माशाचा चित्रपट आणि दाखवतात काय! Jurassic Park, Twister, Golden Eye यातली भव्यता पाहायला थेटरच हवे. Basic Instinct हीही त्याच काळातला. या सिनेमाच्या वेळी तीन मुली माझ्या रांगेपुढे एखादी रांग सोडून बसल्या होत्या. उबदार सीन्स सुरु झाल्यावर त्या अस्वस्थ व्हायच्या. अखेर, चित्रपट पूर्ण न पाहता त्यांनी थेटर सोडले. Mummy, Runaway Bride, Deep blue sea हे कॉलेज संपल्यानंतर पाहिले गेले. Mummy मधले किडे, Deep blue sea मधला माशाचा हल्ला विसरता येत नाही. नोकरी लागल्याने हाती थोडेफार पैसे असायचे. घरी पॉकेटमनी मागायची गरज राहिली नव्हती. अजूनही दोन तीन इंग्रजी थेटरमध्ये पाहिले गेले. Thin Red Line हा युध्दावरचा दर्जैदार सिनेमा होता. सैनिक देशासाठी लढत असतात पण त्यांचे माणूस म्हणून असलेले मनोव्यापार हा चित्रपटाचा गाभा होता.
हॉलिवूडने गांभीर्याने सिनेमा बनवलेले असतात व ते भव्य दर्शन आपल्याला केवळ दहा पंधरा रुपयांत होते याची जाणीव सतत होता आली. एक इंग्रजी चित्रपट पाहणे, ही साध्या प्रेक्षकाकरता तर खूप मोठी मिळकत असतेच असते पण अभ्यासकाच्याही हाती एक मोठे भांडार लागते.
पुढे इंटरनेट आले. घरबसल्या अनेक चित्रपट पाहता आले. पैसे वाचवणे, रांगेत उभे राहून आगाऊ तिकिटे काढणे, चित्रपट पाहायाला मिळणार आहे, या आनंदातले व पाहून आल्यानंतरचे आनंदी क्षण आता संपल्यात जमा आहेत
वाचने
6314
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं.
इंग्रजी सिनेमांमधील 'अडकले
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा.
In reply to इंग्रजी सिनेमांमधील 'अडकले by गवि
वयपरत्वे जालजेष्ठांना अशा
In reply to हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक दिवस तर जिलबी मठ्ठा फिक्स
In reply to वयपरत्वे जालजेष्ठांना अशा by गवि
मसाले भाताचे काय?
In reply to एक दिवस तर जिलबी मठ्ठा फिक्स by प्रचेतस
करा करा
In reply to हा हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही 65 चं 69 असं वाचलेलं
In reply to इंग्रजी सिनेमांमधील 'अडकले by गवि
तो जोक महत्प्रयासाने टाळला
In reply to तुम्ही 65 चं 69 असं वाचलेलं by प्रचेतस
आभार
या लेखाच्या निमित्ताने आता
मीही इंग्रजी चित्रपट खूप
साधारण पणे, 83 ते 91 .
In reply to मीही इंग्रजी चित्रपट खूप by कंजूस
पदराच्या सावलीत
का हो काका? बाहुबली, ऊरी,
In reply to पदराच्या सावलीत by कर्नलतपस्वी
आम्ही जुन्या काळातले
प्रत्येक जण आपापल्या काळात
In reply to आम्ही जुन्या काळातले by तिमा
अपवाद म्हणून....
In reply to प्रत्येक जण आपापल्या काळात by अहिरावण
आपला काळ
In reply to प्रत्येक जण आपापल्या काळात by अहिरावण
'आपापला काळ'
छान लेख.
हॅरी पाॅटर ....
In reply to छान लेख. by कॉमी
द लेडी ओफ हीवन पहा. :)
In reply to छान लेख. by कॉमी
का हो, तुमचा आवडता सिनेमा आहे
In reply to द लेडी ओफ हीवन पहा. :) by अमरेंद्र बाहुबली