कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी..
=============================================================
किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत..
कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात..
विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात..
इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे..
उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले तारे..
अमृतलहरीत मजेत होते गलबत भरकटलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
इश्श..राहिली गालावरती त्याच्या माझी टिकली.
मीच लाजुनि नंतर हसुनि हळुच पापणी मिटली.
ध्यान गडबडीत तसेच ..अरे देवा.. कामावरती गेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..
+कानडाऊ योगेशु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9888
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
बेक्कार!
खयाली पुलाव आहेत हो अण्णा! :)
In reply to बेक्कार! by चांदणे संदीप
किंचित सुधारणा
In reply to खयाली पुलाव आहेत हो अण्णा! :) by कानडाऊ योगेशु
क्या बात क्या बात क्या बात...
अरे वा!!
धन्यवाद संदिपभौ, गविभौ आणि
वा... वा, क्या बात !
वाह!
हा .... हा .... हा .... !
In reply to वाह! by Bhakti
इथे पुरणपोळीला प्रथम
In reply to वाह! by Bhakti
हायला....
भले बहाद्दर कर्नलसाहेब!
In reply to हायला.... by कर्नलतपस्वी
सिक्सर!!
In reply to हायला.... by कर्नलतपस्वी
श्रावण मास सरे हर्ष भरे
संक्लिद्य
जबरा
कविता आवडली
कोड लँग्वेज?
In reply to कविता आवडली by वामन देशमुख
सलाम!
वा !
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.
चौथा बर्नर काय, पक्षकार काय,
In reply to पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले. by धर्मराजमुटके
@गवि भौ....
In reply to चौथा बर्नर काय, पक्षकार काय, by गवि
तीन बर्नरचा नाही तर कमीत कमी
In reply to पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले. by धर्मराजमुटके
@धमराज मुकटे! काय कल्पना
In reply to पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले. by धर्मराजमुटके
आवडली :=)
गॅसवरील दुध, हे दुर्मिळ
आमचेही वास्तव किचन
कविता भारीए...
शृंगार-रसातली आधुनिक रचना प्रशंसनीय.
फारच आवडली कविता आणि नायिकेची