काल संध्याकाळी फिरता फिरता चौपाटीवर गेलो. (मुळामुठेच्या काठाला आजकाल चौपाटी म्हणायची फॅशन आहे पुण्यात) सहज लक्ष गेले आणी एक परिचीत चेहरा दिसला, जवळ गेलो आणी पाहिले तर काय आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. "पण तुला सांगितला कोणी होता शहाणपणा ? चांगले खरडा खरडी खेळत होतास, विडंबन करत होतास... हे भलतेच शहाणपण कुठुन सुचले तुला?"
मी हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या बरोब्बर तो दचकला.
"नाना अरे मी आहे परा" मी म्हणालो.
"मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला." नाना
मामला गंभीर आहे हे ओळखुन आम्ही नानाला घेउन बळेबळेच पाणवठ्यावर दाखल झालो. चौपाटीवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे बघुन झाल्यावर आणी २ पेग पोटात गेल्यावर नाना जरा रंगात आला.
"साला आख्खी दुनिया मला बेरकी म्हणुन ओळखते पण तो मास्तर मलाच चुना लावुन गेला. काय घोडे मारले होते मी त्याचे काय माहित?"
नाना उद्विग्नपणे म्हणाला.
"नाना, नाना अरे असे झाले तरी काय?" मी विचारले.
"मेराच चुक्या जो मैने 'मास्तर तुम्हारा चुक्याच' लेख लिहिला. त्या बेरकी गुर्जींनी बरोब्बर बदला घेतला :( पाहुण्याच्या हातुन साप मारला त्यानी." नाना वदला.
"नाना नाना शांत हो" मी रिपिटची ऑर्डर देत म्हणालो.
"शांत ? तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. च्यायला लोक त्यांचे महामुर्ख प्रॉब्लेम घेउन धावणार ह्या मास्तरकडे, उपाय सुचवणार तो, मी फक्त लिहायचे काम करणार आणी ह्या सगळ्याचा मोबदला काय ? तर लोक मला खव आणी व्यनीतुन झोडणार. एक ताई मला छपरी समुपदेशक म्हणाल्या,तु विकृत मनोवृत्तीचा आहेस असेही काही जण म्हणाले " :(
"तुला का गुर्जींना ?" माझी शंका.
"मला मला मला ! च्यायला 'जेणो काम तेणो साजे दुजा करे सो पछताये' म्हणतातना ते अगदी खरे आहे. हे सगळे करुन नामा निराळे आणी वर खव मध्ये येउन खीखीखी करत बसले."
"नाना तरी मी तुला सांगत होतो, असंगाशी संग आणी प्राणाशी गाठ."
"च्यायला पाध्ये तर आनंदाने नाचत असतील हे बघुन" नानाचे दु:ख बाहेर आले.
"पण मी काय म्हणतो नाना, हे मास्तरनी मुद्दाम केले ह्याला 'पुरावा' काय?"
शुद्धीत आलो तेंव्हा मख्खपणे एक वेटर हातात बिल घेउन उभा होता, माझ्या डोक्यातुन आणी डाव्या दाढेतुन चांगलीच कळ येत होती आणी नानाची खुर्ची रिकामी होती.
"अहो माझा मित्र अर्धे पैसे देणार होता हो, कुठे गेला तो ?" मी इकडे तिकडे पाहात म्हणालो.
"तो अर्धे बिल देणार होता ह्याला पुरावा काय?" वेटर शांतपणे म्हणाला.
वाचने
7128
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
कडक!!!
+१,
In reply to कडक!!! by घाटावरचे भट
कॄपया इतर
In reply to +१, by छोटा डॉन
+२
In reply to +१, by छोटा डॉन
नाना
उपर एक
पराचा
हुच्च
हाहाहा!
(विषय दिलेला नाही)
____________________________
आ व रा रे
परा ला आजकाल खुपच पर फुटले आहेत.
जबरा...!!
परा
वा वा वा!! -
एक नंबर
+१ जबरदस्त!
In reply to एक नंबर by आनंदयात्री
+२
In reply to +१ जबरदस्त! by प्राजु
आवराच...
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) एकदम
In reply to एक नंबर by आनंदयात्री
(चौपाटीवरच
In reply to एक नंबर by आनंदयात्री
हा हा हा ..
हाहाहाहाहाहा....
धन्यवाद
मस्त
धमाल!
हसवण्यासा
In reply to धमाल! by क्रान्ति
हा हा हा!!
आणि
In reply to हा हा हा!! by चतुरंग
व्वा !
लै लै भारी!
+१
(डावा
:)
टॉप्स!
आरं काय चाललाय राव ?