लॉर्ड ऑफ द फ्लाईज
- लेखक विल्यम गोल्डींग
मॉर्डन लायब्ररीने प्रसिद्ध केलेल्या १०० चांगल्या पुस्तकांच्या यादीचे वाचन होईल तसे चालू आहे. काही दिवसांपुर्वी लॉर्ड ऑफ द फ्लाईज आणले आणि वाचायला घेतले. सुरुवातीलाच दोन्-चार पानांनंतर उर्वरीत पुस्तकात काय आहे ह्याची उत्कंठा वाटायला लागते आणि पुस्तक हातातून सोडवत नाही. मध्ये दोन तीन वेळेस दोन तीन पानं सोडुन पुढे जावे वाटले तितकेच, पण बाकी वेग खूपच मस्त. बेटावरील वातावरण, माणसाच्या आतिल माणूस व लपुन बसलेला जनावर ह्यातील लढा, शाळेतल्या मुलांची माणसीक स्तिथी हे सर्व मोठ्या खूबीने मांडले आहे.
न्युयॉर्क टाईम्स ने पुस्तकाचे वर्णन करताना, " Golding's aim to "trace the defect of society back to the defect of human nature" is elegantly pursued in this gripping adventure tale about a group of British schoolboys marooned ona tropical island. असे लिहीले आहे.
साधारण प्लॉट असा आहे की, " काही मुले एका निर्जन बेटावर अडकतात, सोबत कोणी मोठे माणूस नाही, मुलांची वय पण सहा पासून पुढे टिनएजर पर्यंत. राल्फ पासून ष्टोरी सुरु होते आणि त्यावर संपते, तो कथानायक. सोबत पिगी, जॅक ,सॅम न एरिक हे जुळे बंधू. मॉरीस, रॉजर अशी बाकीची मुलं. राल्फमधील नेत्याला पिगीच्या विचांराची जोड लाभते. निर्जन बेटावरुन जर परत इंग्लडला जायचे असेल तर त्या बेटावर जाळ करुन त्याचा धुरा मार्फत येणार्या जाणार्या बोटींचे लक्ष वेधुन घेउन सुटता येईल असे राल्फच्या लक्षात येते. तो मग एका टेकडीवर जाऊन जाळ तयार करायाला सर्वांना प्रवॄत्त करतो. जाळ तयार कसा करावा येथुन सुरुवात. पिगीकडे असणार्या चश्म्याच्या सहाय्याने जाळ तयार केला जातो. अशा अनेक अडचणी येत असतात. मुले लहान असल्यामुळे साहजीकच जंगलात राहणार्या बिस्टची त्यांना रोज रात्री भिती वाटते, त्याने काही मुलांचे माणसीक संतुलन बिघडते. त्यांचा मध्ये असणारा जॅक हा माणसांमधील वाईट प्रवृत्तींना दाखवणारा आहे. त्याला शिकार करायला आवडते व शक्य तितके कमी नियम पाळायला आवडतात. राल्फला सुसंस्कृत माणूस म्हणून राहावे वाटत असते, त्याला शक्य तितक्या लवकर त्या बेटावरुन त्या सर्वांची सुटका करायची असते, तर जॅकला सुटका, सुसंस्कॄतपणाचा विचार वगैरे शिवत नसतो. अदिवासी लोकांसारखी शिकार, चेहर्यावर रंग लावने, मनाला वाट्टेल तसे वागने हे सर्व तो करत असतो. तो रॉजरला हाती घेउन पुढे जाऊन स्वतःची टोळी तयार करतो, ह्या टोळी युद्धात एक दोन मुलांचा त्यात मृत्यू होतो.
त्या बिस्टशी ते कसा लढा देतात, जॅक चे पुढे काय होते, राल्फ सुटतो का? पिगी त्याला कशी मदत करतो? हे मी लिहीत नाही कारण ...
तुम्ही वाचावे अशी अपेक्षा आहे. :)
वाचने
6414
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
होय, मलाही
खरंय..
पुस्तक चांगले आहे.
नाही हो.
In reply to पुस्तक चांगले आहे. by दत्ता काळे
आणि अजून
In reply to पुस्तक चांगले आहे. by दत्ता काळे
होय.
In reply to आणि अजून by मेघना भुस्कुटे
लहानपणी वाचलेलं (जी ए नी
!
In reply to लहानपणी वाचलेलं (जी ए नी by पिनाक
हो.
In reply to ! by शा वि कु
धन्यवाद...
In reply to हो. by राजाभाउ
अनुवादावरून आठवलं.. मध्यंतरी
भा रा भागवत
In reply to अनुवादावरून आठवलं.. मध्यंतरी by राघव
मरठी विकीवर आहे होय.. धन्यवाद
In reply to भा रा भागवत by शा वि कु
खुप लहानपणी शाळेत असतांना वाचले होते