Skip to main content

यकु

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी रविवार, 27/08/2023 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मनस्वी लिहायचे त्यापैकी एक होता होता म्हणवायचे धजत नाही जे वाट्टेल, ते लिहायचा ! भेटणे न भेटणे वेगळे , पण स्पर्श करून गेला यकु कुठे गेला ? परिक्रमा असो , हलके फुलके लेख असोत , कन्फेशन असो नाही तर आणी काही जे वाट्टेल, ते लिहायचा यकु कुठे गेला ट्रिब्युट - उन्मेष
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3137
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सहमत. अगदी हेच श्रामोंबद्दलही म्हणता येईल.

आपल्या आजुबाजुला अनेक लोक असतात. काही वेगळे, गुढ, अतर्क्य, बोलण्यात, लिहिण्यात, त्याचे वेगळे शब्द-अर्थ कशात तरी गुरफटून गेलेले वेगळेच. एक अधिक एक बरोबर दोन असे होत असूनही यांना एक अधिक एक म्हणजे घ्ंटानाद, त्यातून येणारा अद्भुत नाद, लय. अद्भुत तादात्मय असे काही वाटणारे फार थोर असतीलही पण काहींना समुपदेशनाची, योग्य उपचाराची गरज असते, तो केमिकल लोचा असतो, ती मानसिक गड़बड़ असते असे वाटते. अशी माणसं आपल्या लक्षात येतात पण आपलं दुर्लक्ष होतं. -दिलीप बिरुटे

यकु, श्रावण मोडक, भोचक, तात्या, अविनाश कुलकर्णी, चौकट राजा सर्वच जण सक्रिय आणि चांगले लेखक होते. अजुनही अधून मधून त्यांचे लेखन वाचत असतो. अजून कोण मिपाकर आहेत सध्या हयात नसलेले?

In reply to by गवि

बोका ए आझम, वरुण मोहिते माहिती होते पण विसरलो. मस्तच लिहायचे दोघेही. निपो माहिती नव्हते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अजून कोण मिपाकर आहेत सध्या हयात नसलेले?
जावेत एकदाचे अशी लै जणांची इच्छा असलेले काहीजण आहेत. . कधी खपतेत कुणास ठाऊक? :(