Skip to main content

चंद्रयान-२

लेखक उन्मेष दिक्षीत यांनी मंगळवार, 23/07/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा माझा 'चंद्र' या टॉपिक वर दुसरा लेख. नो, आय डोंट हॅव कॉपिराईट ऑन दॅट. किंवा माझा त्यात असा काही विशेष इंटरेस्ट ही नाही. कारण म्हणजे 'चंद्रयान २' 'झेपावले' आहे. आणखी एक उड्डाण यशस्वी झालं आहे. चंद्रावर काय संशोधन करणार आहे ते मला माहीत नाही. माझा प्रश्न आहे, कि आपल्या देशात, जिथं बेसिक प्रश्न आहेत (अजुन तरी) त्या देशाला चंद्र मोहीमेची सध्या काय गरज आहे ? म्हणजे थोड्क्यात जे ९७८ कोटी रु जे खर्च झालेत, त्याचे एक्सॅक्ट रिटर्न्स काय आणि कुणाला मिळणार आहेत ? स्वतापुरता विचार करायचा म्हटला, तर याचा मला काय फायदा झालाय ? जिथं सायंटीफीक ब्रेन ची खरच गरज आहे, जिथं पैशांची खरच गरज आहे , तिथं या दोन्ही गोष्टिंचा वापर न करता, असल्या गोष्टींमधे दोन्ही का वापरल्या (वाया घालवल्या) जातायत ? माझ्यामते हे खरं ब्रेन ड्रेन आहे. 'स्पेस रिसर्च' प्रोग्रॅम कॅन मोस्ट्ली बी कन्सीडर्ड ओन्ली अ‍ॅज अ हॉबी, अँड नथींग मोर ..! आता हे असले "शौक' आपल्या देशाला सध्यातरी (त्याची खरच गरज आहे का ही गोष्ट वेगळी ) किंवा आता बेसीक प्रश्न सुटले आहेत, आणि आता काय करायचा टाइमपास अशी वेळ येण्याआधी परवडण्यासारखे आहेत का ? स्पेस प्रोग्रॅम मधे भारत जर नसेल, तर काय बिघडणार आहे ? बाकीचे जे देश नाही आहेत, ते काय बंद पडलेत का ? आता, 'इस्रो' ची आणखी एक सर्वीस आहे, सॅटेलाईट लाँचींग. ज्यामधे २६९ सॅटेलाइट्स लाँच झालेत वेगवेगळ्या देशांचे. त्या प्रगत देशांनीही स्वतः खर्च न करता 'इस्रो' ची सर्वीस वापरुन 'कॉस्ट कटिंग' केलंय. तर आता 'इस्रो' ला त्यामधुन बराच आर्थिक फायदा झाला असेल आणि त्यातुन या मोहीमा केल्या असतील तर माहीत नाही. कारण 'इस्रो' ने मग काय करावे मग हा त्यांचा प्रश्न आहे. मग, गो चंद्रयान (२) ! - उन्मेष

वाचने 35198
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

म्हटले, चंदामामा अब दूर के नही , चंदामामा अब टूर के ! त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे. ईट इज जस्ट टाइमपास ज्याच्यावर ९७८ करोड चंद्रयान-२ ला आणि ६०० करोड यावेळी !

In reply to by उन्मेष दिक्षीत

PSLV आणि SURYA ICBM, minimal credible deterrence, second strike capability mad ( mutually assured destruction) The Indian Regional Navigation Satellite System (IRNSS), with an operational name of NavIC (acronym for Navigation with Indian Constellation; याबाबत थोडं वाचन करून घ्या. पहा डोळे उघडतात का? नाही तरी चालू द्या आत्मकुंथन

In reply to by सुबोध खरे

इट इज अबाउट सॅटेलाइट्स आणि डिफेन्स. त्याचा इथे काय संबंध ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

हंगाशी आता Dual-Use Technologies Dual-Use of Missile and Space Technologies आणि Global Positioning System Technology and Third World Missiles हे पण वाचून घ्या

In reply to by अहिरावण

असा थोडा थोडा अभ्यास देऊ नका असा थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी मला काही दशके लागली. त्यांना काही दिवस तरी लागतील ना? तोवर मी पण थोडा अभ्यास करून घेतो.

In reply to by सुबोध खरे

आय वील गेट बॅक

In reply to by उन्मेष दिक्षीत

>>>त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे. उत्तम ! चला मोदींनंतर कोण हा प्रश्न सुटला ! अभिनंदन !!

In reply to by उन्मेष दिक्षीत

ईट इज जस्ट टाइमपास ज्याच्यावर ९७८ करोड चंद्रयान-२ ला आणि ६०० करोड यावेळी ! ३५ हजार कोटी रुपयांची S - ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली भारताने रशियाकडून कशासाठी विकत घेतली? किंवा ५५ हजार कोटी रुपये खर्च करून २७२ सुखोई विमाने कशासाठी विकत घेतली? आणि आता तीच विमाने अद्ययावत करण्यासाठी ३५ हजार कोटी IAF's Rs 35,000-crore plan to upgrade Su-30 fighter fleet एवढे पैसे कशाला खर्च केले? दिवाळी ची रॉकेट उडवण्यासाठी एवढा खर्च म्हणजे अतीच झाले. या पैशात किती शाळा कॉलेजे रुग्णालये बांधता आली असती असा प्रश्न कुणी का विचारत नाही? चांद्रयान वर फुकटचा खर्च करणारे श्री मोदी याना काही अक्कलच नाही. On 12 November 2007, representatives of the Roscosmos and ISRO signed an agreement for the two agencies to work together on the Chandrayaan-1's follow-up project, Chandrayaan-2.[18][19] ISRO would have the prime responsibility for the orbiter, rover and the launch by GSLV, while Roscosmos was to provide the lander.[20] The Indian government approved the mission in a meeting of the Union Cabinet, held on 18 September 2008 and chaired by Prime Minister Manmohan Singh हायला डॉ मनमोहन सिंह पण मूर्खच असावेत. त्यांनी चांद्रयान -२ ला मंजुरीचा दिली नसती तर ९७० कोटी वाचले असते आणि चांद्रयान ३ चा प्रश्नच आला नसता( ६१५ कोटी). ( आठव्या हेन्री ने लग्नच केले नसते तर नववा हेन्री जन्मालाच आला नसता)

In reply to by उन्मेष दिक्षीत

त्यामुळे मोदी आणि मी यांनाच फक्त चंद्रयान मोहीमेचा उद्देश कळलेला आहे.
-- एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स का काय म्हणतात ते असणारे एकमेव मिपाकर म्हणजे संक्षी सरजी. कुठे आहात तुम्ही सरजी ? तुम्ही असताना जी मौज मिपावर होती, ती आता नाही. आजच सकाळी मी बोटात बोट गुंफून निर्देहत्वाचा तडित अनुभव घेतलाय. त्यातून टाईमपास नव्हे तर 'कालातीत' होण्याचा अनुभव मिळतो.

In reply to by उन्मेष दिक्षीत

९७८ करोड चंद्रयान-२ ला चला मनमोहन सिंगांना पकडू यात आणि जबाब विचारू कारण याची सुरवात २०१४ च्या आधी झाली असावी ना ?

ते ही वाचले आता मी काय म्हणतो ते नीट वाचा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर कशाला जायला हवे ?