मालक भाडेकरू कायदे आणि प्रश्न
कायद्याविषयी बरेच प्रश्न असतात. विविध विषयांचे वेगळे कायदे. मालक भाडेकरू संबंधित वाद विवाद,खटले हे Maharashtra rent control act यातील कलमांनुसार सोडवले जातात.
एखादा मनुष्य घर बांधतो आणि काही कारणामुळे तो तिथे राहात नाही किंवा राहतो पण त्याकडे आधिकची जागा असते ती तो भाड्याने देतो. नंतर कधीतरी ती भाड्याने दिलेली जागा त्यास परत हवी असते. ती तो भाडेकरूस (तोंडी) मागतो. पण भाडेकरू जागा सोडायला तयार होत नाही. मग मालक कोर्टात जाऊन ताबा (recovery of possession) घेण्यासाठी वकीलामार्फत खटला लावतो. पुढे काय होते? किती वेळेत निर्णय लागून जागा परत मिळते? का मिळतच नाही? तर मालकाच्या बाजूने आणि विरुध्द म्हणजे भाडेकरूच्या बाजूने कायद्याची कोणती कलमे आहेत यावर निर्णय होण्यास वेळ लागतो. किंवा निकाल मालकाच्या बाजूनेही कोर्टात लागला तरीसुद्धा अंमलबजावणी होत नाही कारण भाडेकरू दाद मागण्यासाठी वरच्या कोर्टात जातो.
कायदा कुणाची बाजू घेतो याबाबत न्यायाधीश श्री एम. सी. छागला यांनी एकदा मत व्यक्त केले होते की - "भाडेकरू कायद्याचा हेतू हा की प्रामाणिक भाडेकरूच्या हक्काचे रक्षण करणे त्याच बरोबर साध्याभोळ्या मालकाचेही नुकसान न करणे."
जागा भागड्याने देताना तो व्यवहार कागदोपत्री करून त्याची नोंद करणे आवश्यक आहे. अटी,नियम स्पष्ट लिहिलेले असावेत.
मालकी (owner) आणि ताबा (possession)याचे दोन वेगळे अर्थ असतात. जागेच्या मालकाने एका कराराने जागेचा (यथोचित आणि ठराविक) वापर करण्याचा हक्क तात्पुरता आणि विवक्षित वेळेपुरता भाडेकरूस दिलेला असतो. त्या अटी बाद झाल्यावर ती जागा मालकास परत करायची असते.
मालक जेव्हा जागा(ताबा) परत मागतो तेव्हा कायद्याच्या विविध कलमांनुसार तो ती परत मागत असतो. किंवा दिलेला करारच ठरलेली तारीख उलटल्याने संपलेला असतो. किंवा करारात दिलेल्या नियमांचे उल्लंघन झालेले असते. तर ते कसे याचे पुरावे मालकानेच सादर करायचे असतात.
ज्या अस्तित्वात असलेल्या कलमांनुसार ताबा मागितलेला असतो त्याचे परीक्षण(verification) न्यायालयात होते आणि निर्णय लवकर लागतो व वरच्या कोर्टातही ग्राह्य धरल्याने जागा रिकामी करण्याचा आदेश निघतो. उदाहरणार्थ १)राहाण्यासाठी दिलेल्या जागेत भाडेकरूने धंधा सुरू केलेला असतो , किंवा २)कोणतेही कारण न देता भाडेकरू जागेस कुलूप ठोकून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ दुसरीकडे जाऊन राहात असतो. अशा स्वरूपांच्या खटल्यात कोर्ट शेजाऱ्यांची साक्ष, इलेक्ट्रीक मीटर रीडींग, प्रत्यक्ष पाहणीतून निर्णय देते.
जेव्हा भाडेकरू कोणत्याच कलमांचे उल्लंघन न करता शांतपणे राहात असतो तेव्हा मात्र ती जागा परत मिळवणे सोपे नसते.
(हा धागा चर्चेसाठी आहे. मी कायद्याचा पदवीधर नाही. कोर्टाचा अवमान न करता,दोषारोप न करता आपली मते आणि विचार मांडावेत.)
वर्गीकरण
वाचने
7197
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचत आहे.
भारतीय न्यायालये, व्यवस्थेबद्दल फारसा आदर नाही.
कोणत्या कलमाखाली ताबा मिळतो
अकरा महिन्याच्या कराराने बरेच
बरोबर.
In reply to अकरा महिन्याच्या कराराने बरेच by भीमराव
घर एकदा भाड्याने दिले कि
रमेश किणी
In reply to घर एकदा भाड्याने दिले कि by सुबोध खरे
हो ना. आमच्या जवळच्या काकूंची
In reply to रमेश किणी by अनिकेत वैद्य
लिव्ह अँड लायसन्स
In reply to घर एकदा भाड्याने दिले कि by सुबोध खरे
जेव्हा भाडेकरू कोणत्याच
आपल्याकडे महाराष्ट्रात भाडे
In reply to जेव्हा भाडेकरू कोणत्याच by चौकस२१२
जागा परतीची कायद्याने ग्राह्य
लिव्ह अँड लायसन्स खाली जर घर
In reply to जागा परतीची कायद्याने ग्राह्य by कंजूस
या करारानुसार घर भाड्याने
In reply to लिव्ह अँड लायसन्स खाली जर घर by सुबोध खरे
नक्की काय म्हणायचेय?
In reply to या करारानुसार घर भाड्याने by चौकस२१२
होय हे तितकेच सुस्पष्ट आहे
In reply to या करारानुसार घर भाड्याने by चौकस२१२
भाडेवाढीवरून दुमत किंवा
हो गवि ... इतर हि मुद्दे आहेत
In reply to भाडेवाढीवरून दुमत किंवा by गवि
भाडेकरू बदल
रोचक विषय आहे