बाकी काही असो. कम्युनिस्ट काही उपयोगाचे नसले तरी ते मिपाकरांना एकत्र मात्र आणतातच.
नेहमी प्रमाणे मेथांब्याने धागा टाकून पलायन केलेले दिसते.
खिचडी खायला गेला की काय?
नेहमी प्रमाणे मेथांब्याने धागा टाकून पलायन केलेले दिसते.
खोटं बोल पण ठासुन बोल हि निती दिसते तुमची.
खिचडी खायला गेला की काय?
तुमच्यासारखे आम्ही शिरा-पुरी, श्रीखंड-पुरी वाले नाही साहेब. आम्हां गरीबांकडे मुगाची खिचडीच असणार. तुम्ही मारा मजा पुर्वजांच्या संपत्तीवर.
अहो कार्यकर्ते ,
कुठल्या कम्युनिस्टाने अशी अडचणीत आणणार्या प्रश्नाला सरळ उत्तरे दिली आहेत का?
उलट त्याने वर काळेला दिलेल्या उत्तरात बघा कसा जातिय विद्वेष ठासून भरलाय.... वर आणि हा त्यालाच शिकवतोय की "खोटे बोल पण ठासून बोल" ..... कैच्यकै...
जातियवाद कोण आणि कसा जपतय/पसरवतय याचे उत्तम उदाहरण....
सगळे कम्युनिस्ट असेच काहो मेथांबा?
(धारी)आंबोळी
तुमच्यासारखे आम्ही शिरा-पुरी, श्रीखंड-पुरी वाले नाही साहेब. आम्हां गरीबांकडे मुगाची खिचडीच असणार. तुम्ही मारा मजा पुर्वजांच्या संपत्तीवर.
पूर्ण सहमत...
याला कारण कोण? हाच माझा मुद्दा आहे
तुम्ही ज्यांना आपले मानता त्यांनीच तर ५० वर्षे सत्ता संभाळली ना... मग तुम्हीच असे म्हणावे?
बघा बरे तुम्ही निवडलेल्या सरकारला सांगून....
तुम्ही का श्रीखंड पुरी खायची नाही?
ते ठीक आहे हो.
आहे मी शिरा- पुरी, श्रीखंडवाला ,
आहे मी पुर्वजांच्या संपत्तीवर मजा मारणारा .
पण मी सामन्यांना पावाच्या रांगेत उभे करुन, बायकोच्या वस्त्र खरेदीसाठी कार पाठवणारा पॉलिट ब्युरो सदस्य नक्कीच नाही.
पण तुम्ही माझी खिचडीची पाकृ वाचलीत का? त्यापैकी किती लोक तुम्हाला विश्वास ठेवण्यालायक वाटतात?
१) तिसरी आघाडी ही आघाडी नसून बिघाडी आहे. देशाच्या राजकीय स्वास्थ्याला ती हानिकारक आहे. २) शरद यादव म्हणतात त्याप्रमाणे तिसरी आघाडी संघटन म्हणजे "मेंढकों को तौलना" आहे. बेडकांना जसे तराजुत तोलायला घेतले आणि वजनाचे संतुलन करण्यासाठी २ बेडूक आत टाकले तर आतले चार बाहेर उड्या टाकतात तसे तिसर्या आघाडीतील सर्व पक्षीयांचे एकत्र येणे होय. ३) ह्या उत्तराचा मूळ हेतु आपल्याला दुखावणे हा नसून आपल्याला स्वप्नरंजनातून बाहेर काढणे आहे हा आहे.
आपण माझ्या नावाची शैली (नावाचा शेवट आंबा शब्दाने) चोरल्याने मी इथे लिहिणारच नव्हतो पण केवळ राहावत नाही म्हणून लिहितो.
ज्या पक्षाची स्थापनाच भारतविरोध आणि चीनचे समर्थन यावर झाली आहे अशा नीच आणि हलकट कम्युनिस्टांचा समावेश केंद्र सरकारमध्ये होणे हे मोठे संकटच असेल.यांच्या देशविरोधी कारवाया ’एकापेक्षा एक’ आहेत.मिपावर मी मागे लिहिलेला प्रतिसाद इथेही तितकाच लागू आहे तेव्हा त्याचा काही भाग परत इथे चिकटवत आहे.
१) याच पक्षाने १९६२ च्या युध्दानंतर बिनदिक्कतपणे चीनचे समर्थन केले.
२) याच पक्षाचे नेते आणि नुकत्याच दिवंगत झालेल्या अहिल्या रांगणेकर यांचे बंधू बी.टी.रणदिवे यांनी विभाजनपूर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते असताना १९४८ साली नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारत देशाच्या सरकारविरूध्द ’हे स्वातंत्र्य खोटे आहे’ असे म्हणत हे सरकार उलथवून लावा असा नारा दिला होता. रणदिव्यांनीच भारत सरकार हे साम्राज्यवाद्यांच्या हातातले बाहुले असून सशस्त्र क्रांतीनेच ते उलथवून लावले पाहिजे असे म्हटले.
३) याच पक्षाच्या पूर्वसुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १९४२ च्या चलेजाव चळवळीत रशियाच्या सांगण्यावरून भाग घेतला नव्हता .
४) याच पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांचे म्हणणे आहे की वाढते भारत-अमेरिका संबंध चीनच्या विरोधात आहेत म्हणून त्यास यांचा विरोध आहे. बघा चीनचे हितसंबंध राखायची किती तळमळ लागून गेली आहे यांना. माओ-डेंग यांच्या आत्म्यांना अगदी गहिवरून आले असेल ही मुक्ताफळे ऐकून!
या असल्या कुजकट विचारसरणीची गरज भारतात नसून चीनमध्येच आहे आणि ज्या दिवशी या कम्युनिस्टांना त्यांच्या देशात हाकलले जाईल तो दिवस भारतासाठी एक सोन्याचा दिवस असेल. सरकार अगदी काँग्रेसचे आली तरी परवडले.काहीही झाले तरी हे भारतीय राजकारणातील ’तृतीयपंथीय’ नकोत. यासाठी विवेकानंदांच्या आणि राजा राममोहन रॉय यांच्या बंगालने पुढाकार घ्यायची गरज आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
क्लिंटनशी १००% सहमत.
बरं त्यातून खिचडी खायची वेळ दुर्दैवाने आलीच तरीही गरीब कम्युनिस्टांकडे पैसे असतील का घोडेबाजारासाठी?
मला या असल्या धाग्यांची/चर्चांची गरजच कळत नाही. शिजलेलं आहेच (खिचडी असो वा श्रीखंड-पुरी), निवेपर्यंत दम धरा, सगळं समजेलच!!
जय लोकशाही.
वरील आक्षेपांचे उत्तर कॉ. मेथांबा अथवा कॉ. विकी (त्यांना सांगून थकलो) अथवा कालिंदीबाई देतील. तरीही थोडे माझ्या माहिती/अनुमानानुसारः
भारतीय कम्युनिस्टांच्या चुका, खरे तर घोडचुकाच, झाल्या हे अगदी मान्य आहे. वर दर्शवलेल्या अनेक घटनांमध्ये ह्या पक्षांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्रविरोधी होती त्यामुळे तिचे समर्थन करता येणे अशक्य आहे. तरीही नुसती आगपाखड न करता काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. पहिली ही की स्वात्यंत्र संग्रामाच्या वेळी कम्युनिस्टांनी जी भूमिका घेतली त्यामागे त्यांची तात्विक भूमिका कारणीभूत होती. जागतिक कष्टकरी एक ज्या मार्गे होतील तो पत्करणे हा त्यामागे उद्देश होता. त्याची सुरूवात (कामगार क्रांतिच्या स्वरूपात) रशियात झालेली होती, तेथे कम्युनिस्ट राजवट रूजलीही. तेव्हा ते दर्शवतील तो मार्ग आपल्या जागतिकीकरणाच्या (तेही एक जागतिकीकरणच!) उद्दिष्टांना समर्पक आहे, असे मानून येथील कम्युनिस्टांनी ती भूमिका घेतली होती. त्याला त्यांनी रशियाच्या सांगण्यावरून निव्वळ केले असे म्हणणे थोडे विपर्यस्त आहे, असे मला वाटते.
चीनच्या युद्धाच्या वेळी जे झाले त्यात पुन्हा चीन हा आपल्या का. जा. च्या उद्दिष्टाकडे नेण्यास सहाय्य करील असे वाटून त्यांना पाठिंबा देणारा एक गट त्या पार्टीत निर्माण झाला (मा. क. प.) चीनने हे युद्ध केलेच का, ह्याविषयी चीन-अभ्यासकांचे (उदा. एडगर स्नो ह्या विख्यात चीन-अभ्यासकाचे) म्हणणे असे की भारत व चीन ह्यांना विभागणारी जी रेषा भारताने मान्य केली ती चीन्यांना मान्य नव्हतीच, कारण त्यांच्या मते तिथे १९१२- ४८ ह्या काळात जी अंदाधुंद सुरू होती, त्यावेळी तत्कालिन ब्रिटीश भारताने (हिंदूस्थानने) त्यांच्यावर लादली होती. ह्यात अर्थात इतके काही सरळ नसावे, आपल्या आजूबाजूच्या सर्वच राष्ट्रांशी चीनचे असे वाद अखंड सुरूच असतात. तेव्हा परत कन्युनिस्ट ही 'तत्वनिष्ठ' भूमिका पत्करू लागले!
आता अगदी अलिकडेही नेपाळात प्रचंड निवडून आल्यावर तिथे कारत (का येचुरी) का गेले होते? भारताच्या एक राष्ट्र म्हणून केकेल्या सर्वच लढ्यात ह्यांची भूमिका राष्ट्रविरोधी कशी, हे अगदी नेमके प्रश्न आहेत.
पण म्हणून "ज्या दिवशी या कम्युनिस्टांना त्यांच्या देशात हाकलले जाईल तो दिवस भारतासाठी एक सोन्याचा दिवस असेल'. हेच जर करावयाचे असेल तर अलिकडच्या इतर अनेक गैर-कम्युनिस्ट नेत्यांनी काय काय दिवे लावले आहेत ते थोडक्यात पाहूया. एका तथाकथित राष्ट्रप्रेमी वगैरे पार्टीचा प्रमुख नेता पाकिस्तानात जाऊन आल्यावर त्याला बॅ. जीनांबद्दल साक्षात्कार होतो, आणि तो त्यांचे गोडवे गाऊ लागतो. हाच तथाकथित कणखर, पोलादी पुरूष आमचा गृह मंत्री असतांना त्यांचा एक वरिष्ठ सहकारी स्वतः पैसे व तुरूंगातील राजकीय गुन्हेगार घेऊन अफगाणिस्तानात गेला, तेथे त्या सहकार्याने अतिरेक्यांच्या समोर गुढघे टेकले, ती कथा फार जुनी नाही. त्यांचे काय करायचे?
दुसरे एक यादवकुलीन उत्तर भारतीय नेते तर सदैव पाकिस्तान्ची बाजू घेऊनच बोलत असतात. त्यांचे काय करायचे?
आणि अलिकडे आमचे तडफदार, पंतप्रधानपदाची स्वप्ने पहाणारे शेतकरी वगैरे नेते तर नोव्हेंबरची घटना पूर्ण विसरून 'पुरोहित वगैरेंना अटक झाल्यावर देशात काहीही गैर झालेले नाही' अशा अर्थाचे विधान करत आहेत. त्यांचे काय करायचे?
ही 'त्यांना इथे तिथे पाठवून द्या' असल्या नेत्यांची जंत्री फार मोठी आहे. आणि त्यांना निवडून देणार्या जनतेचेच काय करायचे? हा मुख्य प्रश्न आहे.
दुसरे एक यादवकुलीन उत्तर भारतीय नेते तर सदैव पाकिस्तान्ची बाजू घेऊनच बोलत असतात. त्यांचे काय करायचे?
त्याच एक मेंढरु मुंबैत पण हाय! एकदिस डोइजड व्हयील ते! पात रा.
-संदीप.
काय'द्याच बोला.
महेश भट, शबाना आझमी यासारख्या लोकांची भारतात गरज नसून त्यांना पाकिस्तानात पाठवून द्यावे असे म्हणणे किंवा कम्युनिस्टांना चीनमध्ये पाठवावे (हाकलावे) असे म्हणणे हे उद्विग्नतेतून जन्माला आलेले असते. लगेच कोणी त्यांना हाकलायला निघत नाही आणि कोणाही भारतीय नागरीकाला असे हाकलता येत नाही आणि येणारही नाही.तेव्हा असे उद्गार उद्वीग्नतेतून जन्माला येतात याची नोंद घ्यावी.
आमची अपेक्षा एकच की कोणत्याही गोष्टीवर भूमिका नक्की करताना भारताचे हितसंबंध हाच एक मापदंड ठेवावा इतर कोणताही नाही. आणि अशा अपेक्षेत काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही. अमेरिकेशी संबंध वाढवून भारताचे नुकसान होईल असे वाटत असेल तर त्याला जरूर विरोध करा.काही हरकत नाही.लोकशाहीत तो प्रत्येकाला अधिकार आहे.पण असे संबंध चीनच्या विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोध करणे कसे समर्थनीय ठरेल?तीच गोष्ट चीन युध्दाच्या बाबतीत.तुम्ही भारतातील राजकिय पक्ष आहात.चीनचे हितसंबंध जपायचा संबंधच काय?तेव्हा कम्युनिस्ट मंडळी चीनचे भारतातील हस्तक आहेत असे म्हटले तर त्यात काय चुकले?
महंमद अफझलला फाशी न देऊन काही समाजघटकांची मते आपल्याला मिळतील असे कदाचित दिल्लीतील सत्ताधारी मंडळींना वाटत असावे.तसेच पाकिस्तानला २००० कोटी रुपये द्यायची मागणी करून अशीच मतांची झोळी भरेल असे मुलायम सिंहांसारख्यांना वाटत असावे.त्याच मांदियाळीत लालकृष्ण आडवाणींचा समावेश झाला आणि जीनांचे कौतूक करून आपल्याला मते मिळतील असे त्यांना वाटले असेल तर ती मोठी वाईट गोष्ट आहे. जीना प्रकरणानंतर मी आडवाणींचा समर्थक राहू शकलो नाही. पण त्यांनी कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना पाकिस्तानचे हितसंबंध लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे असे ऐकिवात नाही. त्यामुळे आडवाणींचे जीना प्रकरण आणि कम्युनिस्टांनी निर्लज्जपणे वेळोवेळी चीनला अनुकूल भूमिका घेणे यात फरक आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
प्रदीपजी,
हाच तथाकथित कणखर, पोलादी पुरूष आमचा गृह मंत्री असतांना त्यांचा एक वरिष्ठ सहकारी स्वतः पैसे व तुरूंगातील राजकीय गुन्हेगार घेऊन अफगाणिस्तानात गेला, तेथे त्या सहकार्याने अतिरेक्यांच्या समोर गुढघे टेकले, ती कथा फार जुनी नाही. त्यांचे काय करायचे?
ज्या चुका झाल्या असतील त्याला जरूर शिव्या द्या. पण नाईलाजाने झक मारून घ्याव्या लागलेल्या आणि सर्व पक्षीय बैठकीत (यात काँग्रेस आणि तुमचा सगळे डावे होते) सम्मत झालेल्या निर्णयावरून फक्त एखाद्यालाच नपूंसक ठरवायचे हे बरोबर नाही. एवढा जर हा निर्णय चुकिचा वाटतोय तर त्याच वेळी का नाही बोंबललात? पण त्यावेळी कसे बोंबलणार? कारण जी लोकं त्या विमानात अडकली होती त्यांच्या नातेवाईकानी येउन चपलेले बडवले असते ना एकेकाला. अता मामला थंड झालाय म्हणोन त्यातले फक्त अर्धसत्य सांगत कोल्हेकुई सुरु आहे. चालूदे...
१००च्या वर लोक त्या विमानात अडकले होते. तुम्ही स्वता: किंवा तुमचा जवळचा कोणी तेथी अडकला असता तर मला नाही वाटत तुम्ही वरील मुक्ताफळे उधळली असती. किंवा एकदा सुटून आल्यावर स्वत:ची टिमकी वाजवायला उधळलीही असती. तुमचा काही भरोसा नाही.
अझर मसूदला झालेली फाशीची शिक्षा अमलात आणावी असा दबाव सत्ताधारी आघाडीत असून डाव्यानी आणल्याचे कधी ४ वर्षात दिसले नाही.
आंबोळी
या सर्वपक्षीय बैठकीविषयी एक गोष्ट मला तेव्हाही खटकली होतीच आणि आताही खटकते. प्रणव मुखर्जींनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की योग्य तो निर्णय घेतल्यास काँग्रेस पक्ष त्याला समर्थन देईल.आता योग्य तो निर्णय काँग्रेस पक्षाच्या मते कोणता हे त्यांनी का सांगितले नाही?याचे कारण म्हणजे तसे स्पष्ट न केल्याने दोन्ही बाजूंनी बोलायला काँग्रेस पक्ष बोलायला मोकळा झाला.सरकारने अतिरेकी सोडले नसते तर याच पक्षाने सरकारने १५० विमान प्रवाशांचा बळी दिला अशी हाकाटी करायला मोकळा झाला असता.आणि आता अतिरेक्यांना सोडल्याबद्दल आकाशपाताळ एक करत आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
सरकारने अतिरेकी सोडले नसते तर याच पक्षाने सरकारने १५० विमान प्रवाशांचा बळी दिला अशी हाकाटी करायला मोकळा झाला असता
सहमत्.त्यावेळी लाल भाई किंवा पांढरे सत्तेवर असते तरी त्यानीही अतिरेक्याना सोडण्याचाच निर्णय घेतला असता.माझ्यामते ह्यास कुठला पक्ष जबाबदार नसून आपली मानसिकता कारणीभूत आहे. कंदाहारच्या वेळी प्रवाशांच्या नातेवाईकानी एवढा दबाव आणला की सगळेच बिथरले.लाल भाई किंवा पांढर्यानी तेव्हा 'हे चूक आहे' असे म्हंटल्याचे तरी मला आठवत नाही.
काही वर्षापुर्वी अतिरेक्यानी एका रशियन शाळेचा ताबा घेतला होता. पुतिन ह्यानी कुठल्याही विरोधास न जुमानता सैन्य घुसवले.अनेक लहान मुले ठार होणार हे माहित असूनही. २०० च्या वर लहान मुले त्यात ठार झाली होती.
पाश्चिमात्य देशात प्रथम राष्ट्र आणि नियम. लोक भावना,लोकक्षोभ नंतर.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
मेथांबारावांशी सहमत..
सध्या मी कम्युनिझम ची गोळी घेऊन तिसरी आघाडी निर्माण करायची स्वप्ने पहात आहे ........
(धर्माच्या गोळी पेक्षा स्ट्राँग अशी कमुनिष्ठपणाची गोळी घेतलेला.)
लाल पेशवा
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
खरोखर ज्या दिवशी हा कम्युनिझम जगातुन संपेल तो दिवस शुभ दिवस असेल. प्रदीप जी वर जे म्हणता त्याप्रमाणे डावे कधीच तत्वनिष्ठा बाळगणारे म्हणुन ओळखले जात नाहीत. सतत पायात पाय घालुन पाडणे हाच एक उद्योग ते आजपर्यत करत आले. म्हणुन तर सोमनाथ चटर्जीना शेवटी उपरती झाली व त्यानी डाव्याची साथ सोडुनदिली.म्हणे कामगार व शेतकर्याचा ह्याना कळवळा आहे. मग प.बंगाल मध्ये शेतकरी ह्याच्या विरोधात का आहेत? केरळ अजुनही औद्योगिक दृष्ट्या मागास का आहे?हे तिसरे आजपर्यत बंगाल मध्ये बंदुकीच्या जोरावर निवडणुका जिंकत आले आहेत.सामान्य लोकांचा भारतात ह्याना कुठेच पाठिंबा नाही आहे. तसा जर पाठिंबा असता तर आज हे लोक सत्तेत असते.कम्युनिस्टाचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही व लोकाचा ह्याच्यावर.
जगातील एक एक कम्युनिस्टाचे गड ढासळत आहेत्.आता फक्त चीन च्या रुपाने शेवटचा गड बाकी आहे. तिथे देखिल लष्कराच्या बळावर लोकशाहीचे आंदोलन दडपले जात आहे.परंतु येत्या आठ दहा वर्षात चीन चे देखिल रशियाप्रमाणे विघटन होणार. त्यावेळी भारतातील ह्या लाल लांडग्याना अक्कल येईल.महाराष्ट्रातील जनतेने ह्या कम्युनिस्टाना त्याची जागा दाखवुन दिलीच आहे.एकवेळ जातियवादी पक्ष परवडले पण हे डावे नकोत अशी सर्वत्र भावना आहे.
बंगाल मध्ये कॉग्रेसने ममता बॅनर्जी सोबत केलेली युती अभद्र आहे हे ठरवणारे तुम्ही कोण?त्याचे विचार पटले म्हणुन युती झाली.पण त्यामुळे डाव्याच्या बंगाल मधल्या जागा कमी होतील व सरकार स्थापनेतील त्याचे महत्व कमी होईल ही भीती तुम्हाला वाटत आहे म्हणुन ही युती अभद्र?
शरद पवार किंवा अडवाणी ह्याना त्याच्या चुकीची सजा जनता मतपेटीद्वारे जनता द्यायला लोकशाहीत सक्षम आहे पंरतु कम्युनिस्ट शासनात जनतेला कितपत अधिकार असतात? आज चीन मध्ये लोकशाहीसाठी आंदोलन करणार्यावर रणगाडे चालवले जातात,बंगाल मध्ये सरकार विरुध्द आंदोलन करणार्या शेतकर्यांवर कम्युनिस्ट कार्यकर्ते बंदुकीने हल्ला करतात हे सर्व जगाने पाहिले आहे.त्यापेक्षा पवार व अडवाणी बरेच म्हणावे लागतील. माझ्यामते जे लोक कम्युनिस्टांचे समर्थन करतात तेच खरे लोकशाहीचे विरोधक आहेत. ह्यावेळी जनता त्याना मतपेटीद्वारे त्याची लायकी नक्कीच दाखवुन देईल.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
वृंदा करात ह्यांची राहणी साधी आहे असे तुला म्हणायचे आहे का, कॉ. विकी?
प्रकाश करात जो चष्मा वापरतात त्याची फ्रेम१८ कॅरट गोल्डन आहे.
नंबुद्रीपाद, बुद्धदेव दासगुप्ता, बर्धन, डी राजा, येचुरी ह्यांची मालमत्ता गणली आहेस का? निवडणूक आयोगाच्या साइट वर बघ जरा.
जाउ दे, विदेशी लालभाइंबद्दल , त्यांच्या राहणीमान आणि विचारसरणीबद्दल न बोललेलंच बरं. पुतीन प्रॉपर्टी असा सर्च मार!!
बाकी एकच विचारसरणी म्हणतोस तर ती मेंढरांची सुद्धा असते, मेंढपाळ हाकेल तिकडे ती एका विचाराने जातात!!
तुला काय कळणार रे साम्यवाद.तु उच्चभ्रु माणुस घरी बसुन एसी ची हवा खाऊन बोलणे चांगले की वाईट हे तुझे तुच ठरव.
तु जे मेंढरांबद्दल लिहीले आहेस ते कस खोट ठरते ते मी तुला उदाहरण देऊन सांगु शकतो. मेंढर हे प्राणी आहेत कळप करून राहतात तसेच मानव हाही एक सामाजिक प्राणी आहे आणि तो सुध्दा समुहात राहणे पसंद करतो प्राणी नैसर्गीक प्रेरणांबरहुकुमावर जगतात. त्यांची स्वतःची विचार करण्याची क्षमता मर्यादीत असते .मानवाचे तसे नसते तो विवेकावर स्वतःचे निर्णय घेऊ शकतो.
आणि समुहात राहून देखील स्वतःचे वेगळेपण जपतो समजले काय? कम्युनिष्टांचेही तसेच आहे साम्यवादी विचारप्रणाली घेऊन ते जगतात.
कळावे
कॉ.विकि
कॉ. विकी,
तुमचा प्रतिसाद विलक्षण आवडला.
तुम्ही कपिल काळे यांनी मांडलेल्या कम्युनिस्टांचि साधी विचारसरणी आणि प्रत्यक्ष संपत्ती / मालमत्ता हा मुद्दा इतक्या चतुराईने टाळला की तो मूळात होता असं वाटूच नये.
जणू काही तुम्ही मेंढरांची मानसिकता आणि उत्क्रांती मध्ये मनुष्य व मेंढरांच्या स्थानाचा परस्पर संबंध यावर चर्चा करताय असं वाटलं !! अप्रतिम !!!
मैत्रा, जाउ दे त रे
किमान हा विकी काहीतरी बोलतोय तरी. मेथांबा रण सोडून गेला
ह्यामुळेच हे कम्युनिस्ट सापडले की सगळे हात धुवून घेतात.
विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाही,
कॉ. विकी आणि कॉ मेथांबा,
मला सांगा चीने ने आक्रमण केले तर केंद्र-सत्तेवरील कम्युनिस्ट कय करतील- देशनिष्ठा कि विचारसरणी? कशाला प्रधान्य मिळेल?
खरोखरच कम्युनिस्टांवर तुटून पडायची काही गरज नाही.आपला देश चुलीत गेला तरी चालेल पण चीनचे कल्याण झाले पाहिजे असे अलौकिक आणि निस्वार्थी तत्वज्ञान इतर कोणाचे असेल काय्? बरोबर आहे समाजातील कामगारवर्गाकडे सत्ता गेली नाही तर त्यांना सगळे पिळून काढतील.होऊन जाऊ द्या हाणामारी.फोडा टाळकी. करा सशस्त्र क्रांती.बरोबर गरीबीच्या प्रश्नावर एकच उपाय आहे. समाजातील सगळ्यांना गरीब करणे.नाहीतर श्रीमंत लोक गरीबांना पिळून काढतात की. ठार मारा त्या सगळ्या लेकांना.
आपण बोलता ते अगदी योग्य आहे.कम्युनिस्टांवर अजिबात टिका करू नये आणि त्यांच्यावर अजिबात तुटून पडू नये.
(कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात जाणारा)विल्यम जेफरसन क्लिंटन
इतकी साधी राहणीमान आणि एकच विचारसरणी घेऊन आपले धेय्य साध्य करणार्या ..
राहणीमान साधे असले तरी त्याना लालू,मुलायम्(ज्यानी करोडोनी माया जमवली आहे) हे कसे चालतात? नविन पटनायक आतापर्यत 'जातियवादी' होते .आता ते 'निधर्मी' झाले. बरोबर? :D
९१ साली रशियाचे विघटन झाल्यावर कुठल्याही भारतिय कम्युनिस्ट नेत्याने त्यावर चर्चा करण्याचे टाळले आहे.
काँग्रेस काय्,भाजपा काय किंवा कम्युनिस्ट काय ,सगळ्या पक्षांचीच अन्तर्वस्त्रे आतून बाहेरुन फाटली आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
माझ्या क्लिंटन ह्यांच्या प्रतिसादावर काही प्रतिसाद आले आहेत. त्यातील मला जमेल त्या मुद्द्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
सर्वप्रथम क्लिंटन ह्यांचा अतिशय संयमित प्रतिसाद आवडला. "असे उद्गार उद्वीग्नतेतून जन्माला येतात याची नोंद घ्यावी." हे समजले होते आणी आहे आणि मीही जी काही उदाहरणे दर्शवून 'ह्यांचे काय करायचे?' हे जे म्हणत होतो, तेही तशाच उद्वेगाने. राष्ट्रप्रेम हा अगदी मूलभूत मेट्रिक असावा हे तुमचे म्हणणे अगदी पटते. आणि कम्युनिस्ट ते तसे करत नाहीत ह्याबद्दलही काहीही प्रतिवाद नाही. (पहा: कॉ. मेथांबा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर गप्प, कालिंदीबाई येथे फिरकल्याच नाहीत, व विकी सगळे वाचूनही 'कम्युनिस्टांना झोडपण्यासारखे झाले आहे काय? असे साळसूदपणे विचारताहेत. एकही उत्तर नाही ह्यात आश्चर्य ते कसले?) मीही त्यांचे समर्थन केलेले नाही. पण त्यांनी जे केले तेच छुपेपणाने इतरांनीही कमीजास्त प्रमाणात केले आहे, ते तसे सगळेच करत आहेत, आणि अगदी लघूदृष्टि असलेली मायबाप जनता हे सगळे पचवून घेत आहे. आपली शोकांतिका हीच आहे. आंबोळी ह्यांनी मीच कम्युनिस्ट आहे असे समजून जे काही लिहीले आहे, त्यात १०० वर प्रवासी होते, त्यांची हत्या झाली असती तर... जे लिहीले आहे, ते ह्याच लघुदॄष्टिमुळे. तेव्हा काही शेकडो प्राण गेले असते पण आपण कणखर म्हणून अतिरेक्यांसमोर उभे राहिलो असतो. आपल्या उत्तरोत्तर ढासळत गेलेल्या संरक्षक परिस्थीची ती नांदी होती. ज्याप्रमाणे कुठल्याही खेळात पहिली सलामी महत्वाची असते तसेच हेही होते. तिथे आपण मार खाल्ला. आणि त्यामुंळे पुढे आपण शेकडोच काय, हजारो माणसे गमावून बसलेलो आहोत, बसत आहोत.
मी लिहीले होते :"भारतीय कम्युनिस्टांच्या चुका, खरे तर घोडचुकाच, झाल्या हे अगदी मान्य आहे. वर दर्शवलेल्या अनेक घटनांमध्ये ह्या पक्षांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्रविरोधी होती त्यामुळे तिचे समर्थन करता येणे अशक्य आहे. तरीही नुसती आगपाखड न करता काही गोष्टी लक्षात घ्याव्या:"" वेताळ व आंबोळी ह्या दोघांनी हे नीट वाचलेले दिसत नाही. मी कम्युनिस्ट नाही . अशा तर्हेचे आरोप करण्यापूर्वी माझे इथले इतर लेखन, माझे प्रतिसाद पहावेत. पण डोक्यात नुसती राख घातली की इतका संयम सुचणे अवघड असावे! (माझ्या खरडीत अलिकडेच विकींनी 'तुम्हाला कम्युनिस्टांना झोडपण्याचा मोह होतो' असे लिहीले आहे-- त्याला एक आठवडा जेमतेम उलटला असावा!!!)
मी एव्हढेच जाणतो-- वास्तव काय आहे ते नीट पारखून घ्यावे. आणी त्याला सामोरे जावे, कुठल्याही प्रकारचे स्वप्नरंजन अथवा चुकीच्या माहितीवर गडबडीत आधारलेली गृहिते डोक्यात असणे वाईट.
वेताळः "तिसरे आजपर्यत बंगाल मध्ये बंदुकीच्या जोरावर निवडणुका जिंकत आले आहेत.सामान्य लोकांचा भारतात ह्याना कुठेच पाठिंबा नाही आहे. तसा जर पाठिंबा असता तर आज हे लोक सत्तेत असते.कम्युनिस्टाचा लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही व लोकाचा ह्याच्यावर." ही माहिती कोठून मिळवलीत? एकतर प. बंगालमधे मा. क. प. चे राज्य सुमारे ३० वर्षांहूनही जास्त काळ आहे. ह्या मधल्या काळात अनेक उलथापालथी देशात होऊन गेल्या, केंद्रातील राजवटी अनेकदा बदलल्या. इतकी वर्षे लोकशाही मधील एक घटक बंदुकीच्या, नुसत्या धाकदपटशाच्या जोरावर राज्य करणे शक्य आहे का ह्याचा जरा शांतपणे विचार करा. आणि तसे ते करत होते आणि आहेत, तर कुठच्याही कारणांनी एखाद्या राज्याची राजवट बरखास्त करू शकणारी इतर पक्षीय केंद्रीय सरकारे स्वस्थ बसतील काय? ह्यात काँग्रेसच नव्हे, अगदी मधल्या काळातील भाजपचे सरकारही आले!
तर ते तसे आहे आणि का आहे ह्याचा खरोखरीच शोध घ्यावा. बंगाली लोक त्यांच्या मागे का धावतात? एल. टी. टी. ईंची अजूनही कास धरणार्या पक्षामागे तामिळी जनता का धावते? गेली पन्नास वर्षे धूळधाण करणार्या काँग्रेसमागे महाराष्ट्रातील जनता का असते? ह्या प्रश्नांची सोप्पी उत्तारे नाहीत.
तसेच "[चीनमधे] देखिल लष्कराच्या बळावर लोकशाहीचे आंदोलन दडपले जात आहे.परंतु येत्या आठ दहा वर्षात चीन चे देखिल रशियाप्रमाणे विघटन होणार." एकतर चुकीची माहिती आणि त्यातून स्वप्नरंजन! लोकशाहीचे चार जूनचे तियांमान चौकातील आंदोलन हे विद्यार्थ्यांनी केलेले होते. बलाढ्य देशाच्या यंत्रणेपुढे त्याचे बळ अगदी कमी पडले. आणि ह्याहूनही मुख्य म्हणजे त्यांना देशातील शेतकर्यांची, कामगारांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही, खरे तर अजिबात साथ मिळाली नाही. तेव्हा ते आंदोलन सहजपणे चिरडून टाकणे सरकारला सोपे गेले. आणि अजून एक--- चिनी जनतेची मानसिकता आपणा व इतर अनेक देशांतील (विषेशतः युरोपातील) जनतेप्रमाणे अजिबात नाही. २००० वर्षांहूनही अधिक काळ तेथे एकच राज्य आहे (एकत्रित आहे, आपल्याप्रमाणे छोटी छोटी राज्ये नाहीत), आणि चिनी जनतेस राजा- प्रजा हे प्रमाण सर्वसाधारणपणे मान्य असते. हा त्यांच्या मानसिकतेचा अविभाज्य भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. चीनमधे आज कोसळाकोसळी होणार, उद्या होणार, हे स्वप्नरंजन बरेच पाश्चिमात्य लोक करत असतात. तो केवळ त्यांच्या विशलिस्टचा भाग आहे, त्यात वास्तव शून्य आहे. आजतरी आर्थिक त्सुनामीच्या संदर्भात हेच पाश्चिमात्य चीनकडेच डोळे लाऊन बसलेले आहेत, हेही वास्तव जाणून घ्या.
चीन आपला मित्रवत देश अजिबात नाही. त्यांची एकंदरीत नीति कशी आहे हे आपण अनुभवलेच आहे, आजूबाजूचे इतर देशही अनुभवतातच. पण आता आर्थिक बळाच्या जोरावर ते खूप पुढे आहेत, आणी असलेल्या ह्या बळाचा ते तेल व इतर खनिजे घेण्यासाठी आफ्रिका व अरब देशांशी संधाने बांधून आहेत. ही आपल्या दृष्टिने काळजीची बाब आहे. आपल्या मित्रवत नसलेल्या देशाविषयी तर आपल्याला जास्त वास्तव माहिती करून घ्यायला हवी, नुसती फुटकळ भुरकट माहिती व त्यावर व स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पनांवर आधारलेली स्वप्नरंजने आपल्याला नकोत.
बंगाली लोक त्यांच्या मागे का धावतात? एल. टी. टी. ईंची अजूनही कास धरणार्या पक्षामागे तामिळी जनता का धावते? गेली पन्नास वर्षे धूळधाण करणार्या काँग्रेसमागे महाराष्ट्रातील जनता का असते? ह्या प्रश्नांची सोप्पी उत्तारे नाहीत.
१००% सहमत.निवडणूकीत पक्ष का जिंकतात किंवा हरतात ह्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात देता येणार नाहीत. एखाद्याने मतदारसंघात खूप काम केले म्हणजे तो निवडून येइल असे नाही. भ्रश्टाचारी निवडणूक हरतील असेही नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
येथे कम्युनिष्ट विचार लिहीणे परवडणार नाही कारण इथे सगळेच विरोधी आहेत आणि प्रत्येकजण एकमेकाला सामील आहे त्यामुळे कितीही लिहीले तरी आगपाखड करणारे शिवराळ प्रतिसाद येतील
आपण १६ मे पर्यंत वाट पाहू नंतर चित्र आपोआपच स्पष्ट होईल.
आपला
कॉ.विकि
आपण १६ मे पर्यंत वाट पाहू नंतर चित्र आपोआपच स्पष्ट होईल.
आता तुमचा पक्ष का हरला ह्यावर तुमची आणि कॉ. मेथांबा ह्यांची टिप्पणी वाचावयास आम्ही उत्सुक आहोत.
(तशी टिप्पणी करतांना तरी तुमचा नेहमीचा नकारात्मक सूर सोडा. 'आम्ही नाही आलो तरी हरकत नाही, भगवे भा. ज. प. आले नाहीत हे चांगले आहे' वगैरे नको. तुमच्या पक्षाविषयी सांगा).
मूळ कम्युनिझम् आदर्श पण स्वप्नरंजन करणारे आहे, त्यात मानवी स्वभावाचे गुण-दोष लक्षांत घेतलेले नाहीत. त्यामुळे खरा आदर्श कम्युनिझम (मार्क्सला अपेक्षित असलेला) जगांत कुठेच रुजला नाही. पण म्हणून भांडवलशाही हे सगळ्याचे उत्तर आहे असे नव्हे. ते दुसरे टोक आहे.
कम्युनिस्ट विचारसरणीला माझा विरोध असला तरी आजच्या घडीला देखील बाकीच्या पक्षांच्या तुलनेने भारतीय कम्युनिस्ट नेते हे नक्कीच जास्त स्वच्छ आहेत. आणि मुख्य म्हणजे ते जातिधर्माचे घाणेरडे राजकारण करत नाहीत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबद्दल अपशब्द काढणार्यांचा मिपावर जाहीर निषेध,निषेध,निषेध !
मिपा प्रशासनाने याची दखल घ्यावी व अपशद्ब प्रतिसादातून वगळावे अशी नम्र विनंती.
देशाला स्थैर्य, अंतर्गत व सीमा सुरक्षा व विकास याची मोठी गरज आहे. यादृष्टीने पुढची पाच वर्षे फार महत्वाची आहेत. त्यामूळे भाजपा वा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांचे सरकार कमीत कमी कुबड्या घेउन सत्तेवर येणे आवश्यक आहे.
चीन सर्व बाजूने भारताची कोंडी करू पहात आहे, चीनच्या या 'इंडिया कंटेनमेंट' व्यूहरचनेला तोंड देणे हे फार मोठे परराष्ट्र, अर्थ, संरक्षण व गॄह या चारही आघाड्यांवरचे काम असणार आहे.
अशा वेळेला कम्युनिस्ट पक्षासारख्या देशद्रोही आणि चीनचे हस्तक असलेल्या घरभेद्यांना कुठल्याही प्रकारे देशाच्या धोरणांवर प्रभाव टाकायची वा महत्वाची कागदपत्रे हाताळण्याची संधी साधता येणार नाही हे बघायला हवे.
भ्रष्ट, अकार्यक्षम, जातीयवादी असल्याचे आरोप इतर सर्वा पक्षांनाच एकमेकांवर करता येतील, पण या पक्षांच्या आपापसातील भांडणात भारतीय लोकशाहीचा फायदा घेउन, संसदेत घुसून, भारतालाच उध्वस्त करू पहाणार्या कम्युनिस्टांना मात्र पुन्हा शासनात चंचुप्रवेश मिळणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.
प्रतिक्रिया
कोटी झकास !!
+२ एच.बी.
कम्युनिस्टांची मिपाला देणगी!!
ओ
माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
खिचडी
खिचडी. आणी
अहो
हाच माझा मुद्दा आहे
ते ठीक आहे
मेथांबाजी
भारतीय राजकारणातील तृतीयपंथीय नकोत.
+१
+१००
कुणाकुणाला?
दुसरे एक
चीनमध्ये हाकलणे
कोल्हेकुइ
सर्वपक्षीय बैठक
सहमत
तिसरी
त्याला योग्य कारण आहे
अरे
मेथांबारा
>>तिसरी
माझापन
डावा हात डोक्यावर व उजवा हात डुं**वर ठेवुन तिसर्याना लाल सलाम
कॉ.मेथांबा
पण कम्युनिष्टांनी असे केले काय
वृंदा करात
वृंदा करात
कपिल काळे
कॉ.
हाहाहाहा....
जाउ दे त
अगदी योग्य आहे तुमचे म्हणणे
सगळ्यांचीच
प्रतिसाद
सहमत
प्रदीप राव
कॉ. विकी
राजकारण
स्पष्ट मत
निषेध,निषेध,निषेध,
कम्युनिस्टांमुळे
राष्ट्रीय पक्ष सत्तेवर यायला हवा.