✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निरोपाच्या क्षणी . . …

स — सौन्दर्य, Fri, 07/28/2023 - 20:07
निरोपाच्या क्षणी . . … निरोपाच्या क्षणी अश्रू डोळ्यातील चटका लावून गेले, मन कातर, हळवे हळवे करून गेले. म्हणालो, “वेडे, ह्या जन्मी जरी जमले नाही तरी पुढच्या जन्मी नक्कीच जमवू. हातात हात घालून चालू, एकच कॉफी मागवून, ऊष्टी ऊष्टी पिवू, चंद्राच्या साक्षीने बिलगून वाळूत पाऊल खुणा ऊमटवू, पावसात भिजू, ऊन्हात तापू. मिठीत एकमेकांच्या जगाला विसरू टाकू. चल पुसून टाक ते अश्रू, का चातकासारखे पिऊ ?” ………….. ……………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. “हात वेड्या, अरे आनंदाश्रू आहेत ते, चल, सुटले एकदाची” …………………….. …………………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. …………………….. “तिच्यामारी”

प्रतिक्रिया द्या
3296 वाचन

💬 प्रतिसाद (7)

हायला....

कर्नलतपस्वी
Fri, 07/28/2023 - 22:04 नवीन
एकदम यु टर्न..... थोडे पुढे जाऊन त्यानेही सुस्कारा सोडला असेल. आवडली.
  • Log in or register to post comments

ही ही ही!!

चलत मुसाफिर
Sat, 07/29/2023 - 10:04 नवीन
मजेदार. हे माझ्या 'निरोप' या कवितेचे आशयात्मक विडंबन आहे असे मी आनंदाने गृहीत धरतो. शुभेच्छा. :) निरोप https://www.misalpav.com/node/51437
  • Log in or register to post comments

चलत मुसाफिर भाऊ.

सौन्दर्य
Mon, 07/31/2023 - 18:45 नवीन
क्षमा करा, मी तुमची 'निरोप' ही कविता आधी वाचली नव्हती, तुम्ही लिंक पाठवली म्हणून आत्ताच वाचली. छानच लिहिली आहे तुम्ही ती कविता. तुमची कविता आधी न वाचल्यामुळे 'विडंबन' नव्हते केले. हा फक्त एक योगायोग आहे. खरं म्हणजे हल्ली फेसबुकच्या रिल्सवर अनेक ब्रेकअपचे व्हिडियो पाहिले त्यावरून ही कविता सुचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

धन्यवाद

चलत मुसाफिर
Tue, 08/01/2023 - 07:59 नवीन
सौंदर्य (भाऊ/ ताई?), असेच नियमित लिहीत रहा. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

मी भाऊ आहे.

सौन्दर्य
Tue, 08/01/2023 - 18:24 नवीन
मी भाऊ आहे. मला कल्पना आहे की ह्या नावावरून गैरसमज होऊ शकतो. मुख्यते दक्षिण भारतात हे नाव स्त्रियांचेच असते. माझ्या नावावरून झालेले गोंधळ मी एका लेखात मांडले होते. जमले तर तो लेख मिपावर पोस्ट करीन म्हणतो. आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

छान !

चौथा कोनाडा
Mon, 07/31/2023 - 21:23 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

वा,

हेमंतकुमार
Tue, 08/01/2023 - 06:48 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा