✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साक्षी

अ — अनन्त्_यात्री, Sat, 07/08/2023 - 18:47
झुंजूमुंजूचे नभोनाट्य क्षितिजावर रंगत जावे सूर्यबिंब दवबिंदूंमधले अलगद खुडून घ्यावे त्या बिंदूंची रेष केशरी लवलवती बनवावी मावळतीची चांदणनक्षी तिने हळू डहुळावी स्पर्शाने अलवार विस्कटून अवघी चांदणनक्षी- -विरघळेल, त्या विरघळण्याला एक विदेही साक्षी विझणार्‍या सूर्यास्तबिंदूना पश्चिम क्षितिजी टिपण्या रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या मावळत्या चांदण्या गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील अगणित ह्या चांदण्या तेज शिंपडित क्षितिजाखाली जातील गात विराण्या

प्रतिक्रिया द्या
1990 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मस्त

रंगीला रतन
Fri, 07/28/2023 - 00:00 नवीन
स्पर्शाने अलवार विस्कटून अवघी चांदणनक्षी- -विरघळेल, त्या विरघळण्याला एक विदेही साक्षी मस्त!
  • Log in or register to post comments

हळुवारपणे उलगडत जाणारे अद्भुत काव्यनाट्य

चित्रगुप्त
Fri, 07/28/2023 - 05:47 नवीन
प्रारंभीच क्षितिजावर रंगत जाणारा नभोनाट्याचा विस्तृत पट क्षणार्धात दवबिंदूतल्या इवल्याश्या सूर्यबिंबात परिवर्तित होतो.. पुढे त्या बिंदूची 'लवलवती रेष केशरी' बनून 'चांदणनक्षी- विदेह साक्षी- पश्चिम क्षितिजी विझणारे सूर्यास्तबिंदू ... अशी वळणे घेत शेवटी क्षितिजाखाली विराण्या गात जाणार्‍या चांदण्याच्या रूपात ही अद्भुत कविता हुरहुर लावत संपते. अप्रतिम.
  • Log in or register to post comments

खणखणीत.. ब्रशचे कधी कणखर तर

गवि
Fri, 07/28/2023 - 08:46 नवीन
खणखणीत.. ब्रशचे कधी कणखर तर कधी कौशल्याने नाजूक स्ट्रोक अचूक जागी मारून अतिशय परफेक्ट पेंटिंग बनावे आणि ते आपण पहावे तसा भास झाला. कवी म्हणून कल्पकता उत्कृष्ट आहेच पण शब्द देखील अतिशय चपखल. भाषेवर प्रभुत्व, रचनेत ताल कशात काही चूक काढायला जागाच नाही. :-)
  • Log in or register to post comments

वाहवा!

चांदणे संदीप
Fri, 07/28/2023 - 13:59 नवीन
मस्त रचना. एका साध्या दिवस-रात्र प्रवासाला सुरेख, अलवार शब्दांनी अलंकारिक करून अजून सुंदर बनवून केलेले प्रस्तुतीकरण आवडले. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments

मस्त कविता. आवडली.

विवेकपटाईत
Fri, 07/28/2023 - 14:04 नवीन
मस्त कविता. आवडली.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sun, 07/30/2023 - 13:20 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद
  • Log in or register to post comments

वा!

चलत मुसाफिर
Sun, 07/30/2023 - 14:07 नवीन
सुंदर प्रतिमासृष्टी. कविता आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा