झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे
त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी
स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी
विझणार्या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या
गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2016
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
स्पर्शाने अलवार विस्कटून अवघी चांदणनक्षी- -विरघळेल, त्या विरघळण्याला एक विदेही साक्षीमस्त!हळुवारपणे उलगडत जाणारे अद्भुत काव्यनाट्य
खणखणीत.. ब्रशचे कधी कणखर तर
वाहवा!
मस्त कविता. आवडली.
प्रतिसाद देणार्या
वा!