Skip to main content

घटना नोंद आणि चर्चा

पाभे की बात क्र. ९

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 30/05/2026 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात क्र. ९

जनगणना २०२६-२७ साठी सरकारने साहित्य दिलंय ते बघितलं का?

टोपी लहान मुलांच्या डोक्याची, मोठ्या शिक्षकांच्या डोक्यावर बसत नाही. पिशवी पहिल्या दिवशीच चेन तुटते. शार्पनर पेन्सिलला टोक लावायच्या आतच तुटतो. पेन आणि मार्कर उठतच नाहीत.  एरीयाच्या झेरॉक्स एकच मिळेल. आपसात झेरॉक्स करून घ्या. कार्यक्षेत्र २० किमी दूर असेल. दोन क्षेत्र असेल तर त्यात ६, ८ किमी अंतर असेल. सगळं सामान अशा अतिशय उत्कृष्ट दर्जाचं.
----------------------------------------------------------------
मितरों,

“माझ्या प्रिय देशवासीयांनो,

अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 20/07/2023 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३ (महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पावसाच्या दुर्घटनांसाठी चर्चा धागा.) हल्ली काही वर्षांत पावसाळा सात जूनला सुरू होत नाही आणि मग एक जुलैच्या आसपास मान्सूनचे ढग गोळा होतात. पाऊस एक तर वेळेवर येत नाही आणि मग चिडून आल्यासारखा कोसळतो. मागच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रचंड पाऊस अगदी थोड्या तासांत कोसळून पूर आले. तेवढे पाणी जलद नदीमधून वाहून जात नाही आणि शहरांतील सखल भागांत घुसते. तेच झाले आणि दिल्ली यमुनेच्या पाण्यात बुडून आहे. पाणीच पाणी चहूकडे आणि पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली. कारण पाणी शुद्धीकरण संयंत्रे बुडाली आहेत.