नराधम
आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२.
त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता.
या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती.
मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली.
सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता
मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे.
असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा.
मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही.
एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे.
एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या.
मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही.
अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती.
या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.
वाचने
29002
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार वाईट वाटले. जिवाला धोका
काय बोलावे.
पत्नीला जबरदस्तीने उपचार न
In reply to काय बोलावे. by कॉमी
कटू आहे .. पण माझ्याही
In reply to पत्नीला जबरदस्तीने उपचार न by कॉमी
स्त्रियांना
डेव्हिल्स अॅडव्होकेट
काहीही बकवास.
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
+०१०७२०२३
In reply to काहीही बकवास. by कॉमी
मी काय म्हणतो... हिंदुं
In reply to +०१०७२०२३ by रंगीला रतन
आंद्रे वडापाव,
In reply to मी काय म्हणतो... हिंदुं by आंद्रे वडापाव
शक्य आहे..
In reply to आंद्रे वडापाव, by प्रसाद गोडबोले
पण, समाजामध्ये पावांची मालकी
In reply to शक्य आहे.. by आंद्रे वडापाव
तुम्हाला वाचता येत नाही का ?
In reply to शक्य आहे.. by आंद्रे वडापाव
अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.
आणि हो, पुढच्या वेळेस एका पावात २-४ वडे कोंबुन खाताना फोटो काढा आणि नक्की टाकात इथे प्रतिसादात !हेडिंग १ फॉर्मॅटिंग चालात नाहीये बोल्ड करुन लिहितो
In reply to तुम्हाला वाचता येत नाही का ? by प्रसाद गोडबोले
बहुतांशी सहमत
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
- https://www.deccanherald.com/metrolife/metrolife-your-bond-with-bengalu…
- https://bwlegalworld.businessworld.in/article/Surrogacy-Regulation-Act-…
- https://www.einnews.com/pr_news/640525172/navigating-the-changing-laws-…
- https://journalsofindia.com/triple-tests-for-altruistic-surrogacy/
- https://timesofindia.indiatimes.com/blogs/voices/commercialization-of-s…
---- सदर मनुष्याने मुस्लीम होऊन दुसरे लग्न करणे भारतीय घटनेने दिलेला मार्ग अनुसरणे योग्य राहील. ते अयोग्य वाटत असल्यास निर्भिडपणे बाहेर प्रेमपप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत.@TRUMP
In reply to बहुतांशी सहमत by Trump
तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही.
In reply to @TRUMP by सुबोध खरे
वीर्यपेढी / नियोग कशासाठी
In reply to तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही. by Trump
माझ्या माहितीने हा वीर्यपेढीचा पर्याय गोपनीय असतो
In reply to वीर्यपेढी / नियोग कशासाठी by गवि
वीर्यपेढी / नियोग कशासाठी
In reply to माझ्या माहितीने हा वीर्यपेढीचा पर्याय गोपनीय असतो by Trump
म्हणजे तुमच्या दृष्टीने
In reply to वीर्यपेढी / नियोग कशासाठी by सुबोध खरे
आपला मूळ प्रश्न काय आहे ?
In reply to म्हणजे तुमच्या दृष्टीने by Trump
यांनी सदर स्त्रीने नवर्याला दुसरे लग्न करायला
In reply to आपला मूळ प्रश्न काय आहे ? by सुबोध खरे
तिला कर्करोग निदान होऊन एक
In reply to यांनी सदर स्त्रीने नवर्याला दुसरे लग्न करायला by Trump
माझ्या मते त्या जोडप्याला संपुर्ण समोपदेशानाची गरज आहे.
In reply to तिला कर्करोग निदान होऊन एक by सुबोध खरे
तुम्ही ज्या पध्दतीने माहिती
In reply to माझ्या मते त्या जोडप्याला संपुर्ण समोपदेशानाची गरज आहे. by Trump
मला त्यांची संपूर्ण फाईल
In reply to तुम्ही ज्या पध्दतीने माहिती by सुबोध खरे
डॉक्टर साहेब थोडे अवांतर करतो
In reply to तुम्ही ज्या पध्दतीने माहिती by सुबोध खरे
पण हे संवाद एका चित्रपटात आले
In reply to डॉक्टर साहेब थोडे अवांतर करतो by कानडाऊ योगेशु
गांधीजींच्या अहिंसेचे भयानक
In reply to पण हे संवाद एका चित्रपटात आले by खटपट्या
कुजबूज
In reply to गांधीजींच्या अहिंसेचे भयानक by सुबोध खरे
गांधीजींनी सुद्धा भरपूर लटपट
In reply to कुजबूज by अभ्या..
वाहवा
In reply to गांधीजींनी सुद्धा भरपूर लटपट by सुबोध खरे
भगत सिंह यांनी दया याचिका
In reply to वाहवा by अभ्या..
मुद्दलांत चूक ?
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
अजुन एक भारतीय कायद्यातील रत्न सापडले.
In reply to मुद्दलांत चूक ? by प्रदीप
@Trump
In reply to अजुन एक भारतीय कायद्यातील रत्न सापडले. by Trump
@मा. ऑ.
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
इथे पती आपल्या हुशारीने
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
माझ्या दूरच्या ओळखीच्या एका
In reply to इथे पती आपल्या हुशारीने by साहना
@ मार्कस ऑरेलियस
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by प्रसाद गोडबोले
हिंदू धर्मात,
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
पुरुष जर नपुंसक असेल किंवा
In reply to @ मार्कस ऑरेलियस by सुबोध खरे
१. पतीच्या परवानगनीने ,
In reply to पुरुष जर नपुंसक असेल किंवा by प्रसाद गोडबोले
३. पती वरील पैकी कोणतीच
In reply to १. पतीच्या परवानगनीने , by सुबोध खरे
. पतीची परवानगी असेल तर दुसरे
In reply to पुरुष जर नपुंसक असेल किंवा by प्रसाद गोडबोले
याला कोणता कायदा परवानगी देतो
In reply to . पतीची परवानगी असेल तर दुसरे by सुबोध खरे
ह्यात मुल हवे म्हणुन घटस्फोट मिळत नाही.
In reply to याला कोणता कायदा परवानगी देतो by प्रसाद गोडबोले
अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ
In reply to याला कोणता कायदा परवानगी देतो by प्रसाद गोडबोले
काहीही करून नवऱ्याला मूल हवेच
In reply to अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ by सुबोध खरे
मी फक्त इतकेच म्हणत आहे की
In reply to काहीही करून नवऱ्याला मूल हवेच by प्रसाद गोडबोले
जाऊ द्या हो.
In reply to मी फक्त इतकेच म्हणत आहे की by रात्रीचे चांदणे
असे अजिबात नाही...
In reply to जाऊ द्या हो. by सुबोध खरे
त्यांची ठाम धारणा अशीच आहे कि
In reply to जाऊ द्या हो. by सुबोध खरे
बर त्या नवऱ्याने अत्ता
In reply to त्यांची ठाम धारणा अशीच आहे कि by प्रसाद गोडबोले
बर त्या नवऱ्याने अत्ता
In reply to बर त्या नवऱ्याने अत्ता by रात्रीचे चांदणे
आपल्या विचारा वरून तरी आपणच
In reply to बर त्या नवऱ्याने अत्ता by प्रसाद गोडबोले
संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल
In reply to आपल्या विचारा वरून तरी आपणच by रात्रीचे चांदणे
आपल्या विविक्षित
In reply to संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल by प्रसाद गोडबोले
संमतीने घटस्फोट घ्यायचा म्हणल
In reply to आपल्या विचारा वरून तरी आपणच by रात्रीचे चांदणे
निःशब्द.. कठीण आहे!
कठीण आहे.
वैद्यकीय सेवा ही दुकानदारी
In reply to कठीण आहे. by कंजूस
मी आता उघडपणे म्हणतो समाजाची
In reply to वैद्यकीय सेवा ही दुकानदारी by सुबोध खरे
सहमत
In reply to वैद्यकीय सेवा ही दुकानदारी by सुबोध खरे
प्रत्येक समाजात भलेबुरे लोक असतात.
In reply to वैद्यकीय सेवा ही दुकानदारी by सुबोध खरे
अरेरे
या बाई कोणत्या कारणाने या
नाही.
In reply to या बाई कोणत्या कारणाने या by गवि
अरेरे...