Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/23/2023 - 09:52
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या

Submitted by गवि on Fri, 06/23/2023 - 10:04

Permalink

वाह सर. क्या बात है.

वाह सर. क्या बात है.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/23/2023 - 17:52

In reply to वाह सर. क्या बात है. by गवि

Permalink

धन्यवाद.

आपल्या 'वाट्यां'मुळे 'पाट्या' फूटल्या. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Fri, 06/23/2023 - 10:40

Permalink

आवडलीच!

आवडलीच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/23/2023 - 11:52

Permalink

डिप्रेसलेली कविता.

डिप्रेसलेली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Fri, 06/23/2023 - 12:01

Permalink

छान लिहीले आहे सर. मी शक्यतो

छान लिहीले आहे सर. मी शक्यतो कविता वाचत नाही. तुमचे नाव बघुन धाग उघडला.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Fri, 06/23/2023 - 12:02

Permalink

अरे वा!!

गविंच्या वाट्यांनी बराच धुरळा उडवलाय वाटते!! अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या दंडवत!!
  • Log in or register to post comments

Submitted by पंचक on Fri, 06/23/2023 - 12:08

Permalink

पहिल्या ओळीनंतर लेखकाला

पहिल्या ओळीनंतर लेखकाला मिलाक्राने ग्रासले असावे अशी शक्यता वाटली. थोडं पुढे जाऊन तो स्मरणरंजनात रमलेला दिसतो. तर शेवटी मित्रही पांगल्यावर(का ते लेखकच जाणो.) एकटाच 'बसून' आत्मपरिक्षण करीत असावा की काय अशी भोळी आशा वाटली. (मात्र खरंच तसं असेल तर मात्र तहे दिलसे शुभेच्छा)
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Fri, 06/23/2023 - 12:51

Permalink

ङबल बॅरल

फार दिवसांनी जोरात वाजली.
  • Log in or register to post comments
Profile picture for user इपित्तर इतिहासकार

Submitted by इपित्तर इतिहासकार on Fri, 06/23/2023 - 13:01

Permalink

अहाहा

पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 06/23/2023 - 17:31

Permalink

वाचतोय.

पाट्या मंतरलेल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 06/23/2023 - 17:56

Permalink

आभार.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया लिहिणा-यांच्या उत्साह वाढविणा-या आहेत. मूळ कवी, सर्व वाचक, प्रतिसादकर्ते, मनापासून आभार. -दिलीप बिरुटे (पाट्यावाला)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sun, 06/25/2023 - 21:50

Permalink

:):):)

:):):)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 11/17/2023 - 17:30

Permalink

व्वा, सुंदर सुरेख ..... !

व्वा, सुंदर सुरेख ..... !
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
किती चित्रदर्शी !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3685 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com