एका सासूबाईची करुण कहाणी.
लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
सारखी किच कीच चाललेली. पदर सांभाळ. केस किती आखूड कापलेस? आता वेणी कशी घालणार? खुर्चीवर सावरून बसावे स्त्रियांच्या जातीने. कुंकू लावलेस का? मला मेलीला आताशा दिसत नाही म्हणून विचारले हो.
चाहत साखर कमी पडलीय. साखर संपली असेल तर नवऱ्याला सांगायचे. तो काय तुझ्या मुठीतच(मिठीत?).मला अजून डायबेटीस नाही हो.
पोळ्या किती जाड लाटल्या आहेस? मुद्दामहून ना? का नाजूक हात दुखताहेत. आमच्या काळी मी एकटी दहा जणांच्या पोळ्या... आता काय राजा राणीचा संसार. इन मीन तीन.
भाजीत किती मीठ पडलय.
अजून बरच काही. कधी म्हणून कधी समाधान नाही.
एकदा मात्र कहर झाला.
“सुनबाई साधी मेथीची भाजी करता येत नाही. तुझ्या आईने माहेरी काय शिकवले?”
“अहो सासूबाई, ते माझे माहेर होते. केटरिंग कॉलेज नव्हते.”
मग एके दिवशी दारात टॅक्सी उभी राहिली.
सुनेने साबा आणि साबू च्या दोन बॅगा भरल्या, टॅक्सीत नेऊन ठेवल्या.
“सुनबाई कुठे बाहेर जायची तयारी आहे का?”
“हो तुम्हा दोघांची व्यवस्था त्या नदी काठच्या वृद्धाश्रमात केली आहे. तिथ खरपूस भाजलेल्या पातळ पोळ्या, घट्ट वरण, शिजलेला भात, दोन वेळ चवदार चहा मिळेल. तिकडे देऊळ आहे. तिथं भजन प्रवचन कीर्तन चालते. टीवी आहे. आस्था चानल बघायाल मिळेल. जय मा देवी असे पिक्चर बघायला मिळतील.”
सगळ्यात म्हणजे इतर सास्वान्च्या जोडीने सुनांच्या नावाने बोटं मोडायला मिळेल.
आमच्या बाब्या म्हणजे सुनेच्या ओंजळीने पाणी पिणारा. शामळू. ऑफिसमध्ये काय रुबाब. घरात मात्र कबाब. गोगल गाय.
पैशाची काळजी करू नका. आल एक्सपेन्सेस प्रिपेड!
आम्ही दोघ येऊ मधुन मधून भेटायला.
टॅक्सी सुरु झाली आणि भुर्कन निघून गेली.
व्हाट ए मेसी एंड!
याद्या
5403
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
आसपासचे नमुने...
नारायण ठोसर हे महान सद्पुरुश
प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम' नेमके कसे असावे ?
वनप्रस्थाश्रमाचे रिग्वेदिक
In reply to प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम' नेमके कसे असावे ? by चित्रगुप्त
अवांतर
In reply to प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम' नेमके कसे असावे ? by चित्रगुप्त
तारुण्यात आणि उतार वयात...
In reply to अवांतर by राजेंद्र मेहेंदळे
प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम
In reply to प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम' नेमके कसे असावे ? by चित्रगुप्त
प्रचेतस
In reply to प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम by प्रचेतस
वाह! नशीबवान आहेत पूर्वीचे
In reply to प्राचीन काळचे 'वानप्रस्थाश्रम by प्रचेतस
मुळात आपण कमावलेल्या घरात आपण
सर
In reply to मुळात आपण कमावलेल्या घरात आपण by सुबोध खरे
मस्त प्रतिसाद डॉ. साहेब.
In reply to मुळात आपण कमावलेल्या घरात आपण by सुबोध खरे
जुने जाऊ द्या.
अच्छी लाइन है लिखके रखता हूं
In reply to जुने जाऊ द्या. by कंजूस
पन्नाशीनंतर कान आणि साठीनंतर
In reply to जुने जाऊ द्या. by कंजूस
खरी समस्या सासरेबुवांची असते हो.
In reply to जुने जाऊ द्या. by कंजूस
हाहाहा!!
In reply to खरी समस्या सासरेबुवांची असते हो. by चित्रगुप्त
सर्व प्रतिसादाकांचे आभार.
आईवडीलांनी मुलाचे लग्न
मराठी मालिका बंद पडतील ना
मराठी मालिका बंद पडतील ना
व्यवहारी जग...