नुकत्याच एका धाग्यावर स्वाइन फ्लूची चर्चा चालू असताना एका मिपाकर बंधूंनी स्वाइन फ्लू सारख्या रोगावर उपयुक्त (हमखास असे बहुधा म्हटले नव्हते) असा एक मंत्र सांगितला होता. मी लगेचच तो मंत्रोपचार नक्की कसा वापरायचा या विषयी चौकशी केली. त्याचे 'समाधानकारक @) ' उत्तरही मिळाले.
त्यानिमित्ताने एका जुन्या शंकेचा किडा डोक्यात पुन्हा वळवळू लागला. त्या किड्याला मारण्यासाठी हा काथ्याकूट.
बहुतेक स्तोत्राचे किंवा मंत्रांचे दोन भाग असतात.
पहिल्या भागात मुख्य स्तोत्र आणि दुसर्या भागात त्याची फलश्रुती असते.
उदा. अथर्वशीर्षात - श्री वरदमूर्तये नमः पर्यंत स्तोत्र आणि त्यानंतर एतदथर्वशीर्षं यो ऽ धीते पासून अथर्वशीर्षाचे पठण करण्याने होणारे लाभ हे असतात.
गणपती स्तोत्रात प्रणम्य शिरसा देवं पासून द्वादशं तु विनायकम् पर्यंत स्तोत्र आणि द्वादशैतानि नामानि पासून त्या स्तोत्राचे फायदे असे असते.
माझी शंका अशी. स्तोत्र म्हणताना फलश्रुती म्हणावी की नाही. पूर्वी जेव्हा लिहिण्याची सोय नव्हती तेव्हा पुढील पिढ्यांकडे सर्वच्या सर्व संक्रमित होण्याच्या दृष्टीने सर्व पाठ करणे योग्य असले तरी आज स्तोत्र म्हणताना त्या स्तोत्राचे फायदे म्हणण्याची काय गरज.
की स्तोत्र आणि फलश्रुती असे दोन्ही म्हटले तरच लाभ होतो?
आज ही शंका येण्याचे कारण म्हणजे स्वाईन फ्लू वर गुणकारी खालील श्लोक व त्याचा अर्थ.
|| दद्रुस्फोटक कुष्ठादी, महामारी विषुचिका | नश्यन्त्यनेपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामी तं ||
संगजा देशकालोत्था, अपिसांक्रमिका गदा: | शाम्यन्ति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामी तं ||
अंगावर उठणारे फोड, चट्टे, त्वचारोग हे दत्तस्मरणाने दुर होतात, त्याचप्रमाणे परस्पर संपर्काने, इतर देशातुन येणारे व साथिचे विकारही दत्ताचे नामस्मरण केल्याने दुर होतात असा मंत्राचा अर्थ आहे.
या मंत्रात सगळा भाग फलश्रुतीच आहे म्हणजे कोणत्या मंत्राच्या (१०८ वेळा) पठणाने स्वाइन फ्लू बरा होईल ते कळलेच नाही.
म्हणजे 'दत्तात्रेयं नमामि तम्' एवढाच मंत्र म्हणावा की सगळा श्लोक म्हणावा?
ज्यांनी हा मंत्र मिपाकरांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिला त्यांनी तसेच इतर जाणकारानीसुद्धा खुलासा करावा. म्हणजे मिपावरील सर्वांनाच या गोष्टीची माहिती होईल.
सूचना: हा काथ्याकूट या विशिष्ट मंत्राविषयी नसून फलश्रूती म्हणावी की नाही या विषयी आहे.
(मी एरवी मंत्र तंत्रादि प्रकारांची टवाळी करीत असलो तरी ही शंका मी गंभीरपणे विचारीत आहे) :|
वाचने
8054
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवग्रह a~
धन्यवाद.
In reply to अवग्रह a~ by घाटावरचे भट
सहस्त्रावर्तन
तसही बर्याच मंत्रात
फलशृती
बापु
In reply to फलशृती by केदार
माझ्या मते
श्लोकाला
In reply to माझ्या मते by प्राजु
बोगस क्लेम???
????????
ह्म्म..
शुद्ध बंडलबाजी
मंत्र.
सूचना: हा
कुठला मंत्र कोणत्या कारणासाठी आहे ह्याचे उत्तर