३००० वर्षांचा विरह
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे.
जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले. जिन्न शबदाची नक्की व्युत्पत्ती ठाऊक नाही पण जिनी शब्द मात्र लॅटिन genius पासून आला आहे (ह्याचा अर्थ जागेचा रक्षक आत्मा, कोंकणात ज्याला देवचार किंवा राखणो म्हणतात तो).
ह्या चित्रपटाच्या मध्यभागी सुद्धा एक जिन्न आहे. अलिथिया नावाच्या विदुषीला अचानक भास होऊ लागतात. इसंबूल मध्ये भाषण देण्यास ती आलेली असते पण तिला होणाऱ्या भासांनी ती घाबरलेली असते. अलिथिया ची भूमिका सुप्रसिद्ध आणि हरहुन्नरी अभिनेत्री टिल्डा स्वसोन ने अत्यंत सुरेख पणे उठवली आहे. इस्तंबूल मध्ये ती अत्तराची एक बाटली विकत घेते आणि हॉटेल वर येऊन उघडते तर त्यातून एक भला मोठा जिन्न बाहेर येतो. काळेभोर जिन्न ची भूमिका इद्रिस अल्बा ह्या कृष्णवर्णीय अभिनेत्याने समर्थ पणे निभावली आहे.
जिन्न अलिथिया ला तीन वर देतो पण अट अशी असते कि ती जे काही मागेल ते तिच्या हृदयातून आले पाहिजे. पण अलिथिया अतिशय संतुष्ट प्रकारची विदुषी असते, आपल्याकडे सर्व काही आहे. मागण्यासारखे काहीही नाही हेच तिचे मत असते. जिन्न ह्यामुळे खिन्न होतो कारण ह्या बंदीतून सुटका मिळवून पुंन्हा जिन्न लोकांत जाण्यासाठी त्याला त्याची बाटली मिळवणाऱ्या व्यक्तीला ३ वरदान देणे आवश्यक असते.
आता ह्यावरून अलिथिया आणि जिन्न दोघांची शाब्दिक चकमक उडते. आणि ह्याच दरम्यान जिन्न तिला आपला ३००० वर्षांचा इतिहास सांगतो नि आपण बाटलीत कसा पोचलो ह्याची कथा. खरेतर जिन्न राणी शिबा च्या काळांत पूर्णपणे मुक्त असतो. शिबा त्यांची दूरची बहीण पण जिन्न तिच्या प्रेमात पडतो आणि तिची लैगिक भूक भागवण्याचे साधन बनून राहतो. राणी शिबा हे एक ऐतिहासिक पात्र आहे ज्याची विशेष माहिती आम्हा भारतीय लोकांना नाही. हिब्रू बायबल मधील शिबा हे एक पात्र आहे. बायबल मधील कथानकानुसार इथिओपिया/येमेन भागातील हि राणी आपल्या महाप्रचंड लाजवम्या शकत किंग सॉलोमन ह्या इस्रायली राजाला भेटायला आली. सॉलोमन म्हणजे कुराण मधील सुलेमान इब्न दाऊद, म्हणजे डेविड चा मुलगा सॉलोमन. डेविड म्हणजे डेव्हिड आणि गोलियाथ युद्धातील डेव्हिड.
पण जिन्न सांगतो ती प्रत्यक्षांत सॉलोमन हा शिबा ला भेटण्यासाठी आला होता. तिच्यासोबाचे शय्यासोबत करणे हा त्याचा हेतू होता. शिबा हि अर्धी जिन्न असल्याने तिला काबीज करणे सोपे नव्हते. जिन्न मात्र मत्सराने पेटून उठतो. तो शिबा चे कान भरतो. शिबा सुद्धा त्याचे ऐकून सॉलोमन पुढे ३ अशक्य अशी कामे ठेवतो पण सॉलोमन अत्यंत सोपेपणी ती सर्व कामे करतो.
ह्या चित्रपटांत हि कथा विशेष महत्वाची नाही पण ह्याचे चित्रीकरण अत्यंत नेत्रदीपक आहे. काळीभोर शिबा, तिचा वाळवंटातील तो किल्ला, सॉलोमन ची जादुई वीणा त्याचे ते संगीत हे सर्व काही खरोखर अत्यंत सुरेख पणे दाखवले आहे. जगातील मिथकांतील हे मिथक आम्हा भारतीयांना ठाऊकच नसल्याने ह्या सर्वांचे मनोरंजन मूल्य द्विगुणित होते.
https://www.youtube.com/watch?v=dBF7flL06L4
सॉलोमन प्रत्यक्षांत उच्चकोटीचा जादूगार असतो आणि तोच जिन्न ला बाटलींत टाकून समुद्रांत फेकून देतो.
त्यानंतर दोन वेळा जिन्न बाहेर येतो आणि पुंन्हा बाटलींत अडकतो आणि तिसऱ्या वेळी अलिथिया त्याला बाहेर काढते. आता संपूर्ण कथानक सांगितले तर रसभंग होईल. त्यामुळे इथे सांगत नाही.
शेवटी अलिथिया कुठल्या ३ इच्छा मागते ? अलिथिया आणि जिन्न च्या इतिहासाचा काही संबंध आहे का ? जिन्न च्या कथेचे तात्पर्य काय होते ? ते अनेक प्रश्न चित्रपट उभे करतो. शेवटी चाणाक्ष प्रेक्षक "जिन्न खरोखर होता ?" कि तो अलिथिया च्या मेंदूतून निर्माण झालेले एक पात्र होते हा प्रश्न सुद्धा विचारतील (शटर आयलंड, इन्सेप्शन इत्यादी प्रमाणे).
का ठाऊक नाही पण हा चित्रपट आणि त्यातील नेपथ्य माझ्या मनावर कोरले गेले.
चित्रपट हा एक लोकप्रिय पुस्तकावर आधारित आहे. The Djinn in the Nightingale's Eye हे ब्रिटिश महिला लेखिका बायट ह्यांचे पुस्तक किंवा एक लघुकथा आहे.
वाचने
5942
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
चित्रपट-परिचय उत्तम.
कुठे उपलब्ध आहे?
छान परिचय. नक्की बघणार
चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा परिचय
In reply to चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा परिचय by टर्मीनेटर
पहिला अवांतर परिच्छेद
In reply to पहिला अवांतर परिच्छेद by तुषार काळभोर
अरे वाह! मग वयाच्या ८४ व्या वर्षी
In reply to अरे वाह! मग वयाच्या ८४ व्या वर्षी by टर्मीनेटर
> अति अवांतरासाठी क्षमस्व!
In reply to > अति अवांतरासाठी क्षमस्व! by साहना
टारझन पुस्तकाबद्दल प्रतिसाद .... कोणता ?
In reply to टारझन पुस्तकाबद्दल प्रतिसाद .... कोणता ? by चित्रगुप्त
तो प्रतिसाद बहुतेक करून आपलाच
In reply to तो प्रतिसाद बहुतेक करून आपलाच by साहना
हा प्रतिसाद म्हणता का?
In reply to हा प्रतिसाद म्हणता का? by गवि
होय
In reply to हा प्रतिसाद म्हणता का? by गवि
@गवि : नेमका प्रतिसाद कसा हुडकला बुवा ? काही टारझन चित्रे
In reply to @गवि : नेमका प्रतिसाद कसा हुडकला बुवा ? काही टारझन चित्रे by चित्रगुप्त
गूगल सर्च मध्ये योग्य शब्द
In reply to गूगल सर्च मध्ये योग्य शब्द by गवि
सहज गवि आणि मिसळपाव सर्चमध्ये
In reply to @गवि : नेमका प्रतिसाद कसा हुडकला बुवा ? काही टारझन चित्रे by चित्रगुप्त
@चित्रगुप्त
In reply to @चित्रगुप्त by कॉमी
@ कॉमी: पेपरबॅक्स फ्रॉम हेल
In reply to @गवि : नेमका प्रतिसाद कसा हुडकला बुवा ? काही टारझन चित्रे by चित्रगुप्त
तुम्हाला हे मूळ खंड पाहिजे
In reply to तुम्हाला हे मूळ खंड पाहिजे by साहना
टारझनचे मूळ खंड घ्यायला मला नक्कीच आवडेल.
In reply to टारझनचे मूळ खंड घ्यायला मला नक्कीच आवडेल. by चित्रगुप्त
इबे वर उपलब्ध आहेत ;
चांगला चित्रपट आहे
छान