टिकली
मंगळसूत्र
जोडवी
बाईचं बाईपण
घराला घरपण
रूढी परंपरा
संस्कृतीचा हाकारा
पोरीची जात
सातच्या आत घरात
दिवसाउजेडी बलात्कार
तुझ्याच छातीचे उभार
हसलीस, तर दुर्योधन चिडेल
फसलीस, तर रावण पळवेल
रेषेच्या आत
सगळं काही चालेल
रेषेच्या पलीकडे
अग्निपरिक्षा लागेल
तुझ्या नावानंच सगळे
देतील शिव्या
तुझ्या अंगी मात्र
सोशिकपणा हवा
आपले आदर्श महान
आपली संस्कृती महान
तुला दिलंय की आम्ही त्यात
महत्वाचे स्थान
तू देवीचे स्वरूप
शिवाय भारतमातेचं रूप
.
.
.
वगैरे वगैरे चं बोचकं
एकदा तुला दिलं
की आम्ही मोकळे
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2632
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म..
बरोबर आहे...
खरंय
छान लिहिलंय!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
अगदी अगदी
In reply to यत्र नार्यस्तु पूज्यन्ते by आंद्रे वडापाव
सहमत
In reply to अगदी अगदी by चलत मुसाफिर
अमेरीकेत किंवा विलायतेत असलं
समर्पक कविता