नमस्कार मंडळी
कर्नलकाकांनी विनंती केल्यावरुन हा आजच्या कट्ट्याचा छोटासा वृत्तांत
एक सदस्य अमेरिकेतुन आल्याने कट्टा करावा असे ठरत होते, त्यामुळे ८-१० जणांचा कायप्पा ग्रुप तयार करुन चर्चा सुरु झाली आणि हो-ना करता करता डेक्कन,संभाजी पार्क ला भेटु असे ठरले. मी थोडासा उशिरा १०.४० पर्यंत पोचलो तोवर कर्नल तपस्वी,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा असे आले होते.
पावसाळी वातावरण असल्याने उन्हाचा त्रास नव्हता. श्री गणेशा हे हैद्राबादहुन आले होते त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. गप्पा मिपावरुन चालु होउन छंद्,नोकरी, तांदुळ्,टेक्नॉलॉजी अशा वाट्टेल त्या विषयांवरुन धावत होत्या. श्री गणेशा हे "माझा गणेशा झालाय" वाले नव्हेत हे समजल्याने आनंद झाला.
डावीकडून -रामचंद्र ,कर्नल तपस्वी ,राजेंद्र मेहेंदळे ,प्रचेतस, श्री गणेशा आणि त्यांचा भाचा
थोडा वेळ गप्पा झाल्यावर बागेत फेरी मारु असे म्हणेस्तोवर बाग बंद झाली. मग मोर्चा समोरच्या शिवसागर कडे वळला. तेथे चहा, नाश्ता, गप्पा वगैरे चालु होत्याच तोवर अजुन एक सदस्य रामचंद्र आले.
ग्राहक वाढायला लागल्याने मालकाने हाकलायच्या आत बाहेर आलो, आणि गप्पांचा फड चालु ठेवला.
वाचलेली चांगली पुस्तके, आलेले अनुभव, ईतिहास्,भूगोल्,नागरीक शास्त्र एक ना दोन विषय. असे एकातुन दुसरे विषय उलगडत जात होते. शेवटी वेळेचे भान ठेवुन गप्पा आवरत्या घेतल्या. अखेर प्रचेतस यांना वन डे गायडेड टूर काढण्याची विनंती करुन आणि तूनळी चॅनल सुरु करायचा आग्रह करुन कट्टा समाप्त झाला.
कळावे लोभ असावा.
वाचने
6516
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद राजेंद्र...
श्री गणेशा हे "माझा गणेशा
टांग दिलेलीऐनवेळी येणे रद्द केलेले दिसते.छान.
लोणावळा/खंडाळा
In reply to छान. by कंजूस
माझ्यासाठी हा पहिलाच कट्टा!
खुप मस्त फोटो व कट्टा वर्णन
वा, मस्त !
कट्ट्याने होत आहे रे..
निशेध... निशेध
In reply to कट्ट्याने होत आहे रे.. by तुषार काळभोर
कट्टा एकदम मस्त झाला. सर्वात
बेस्ट!
अरे वाह! कट्टा एकदम मस्त झालेला दिसतोय.
छान कट्टा
नदीच्या अल्याड
In reply to छान कट्टा by चांदणे संदीप
मुळेच्या अल्याड
In reply to नदीच्या अल्याड by तुषार काळभोर
व्वा, झकास कट्टा अन फर्मास
@प्रचेतस यांना वन डे गायडेड
@अतृप्त आत्मा...
In reply to @प्रचेतस यांना वन डे गायडेड by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to @अतृप्त आत्मा... by कर्नलतपस्वी
वन डे टुअरपेक्षा सोपं म्हणजे voice over देणे.
In reply to @प्रचेतस यांना वन डे गायडेड by अत्रुप्त आत्मा
खुप छान सुचवणी !
In reply to वन डे टुअरपेक्षा सोपं म्हणजे voice over देणे. by कंजूस
प्रचेतस यांना -
मी...
In reply to प्रचेतस यांना - by अत्रुप्त आत्मा
सगळे दुष्ट दुष्ट !
In reply to मी... by कर्नलतपस्वी
कट्ट्याचा वृत्तांत आवडला.
क्षणभर हिन्दी चित्रपटात जसे दोन तस्कर एकमेकांना जसे संशयीत नजरेने भेटतात व ओळख पटताच देवाण घेवाण सुरू होते त्या प्रसांगाची आठवण झाली.😂 😂छान वृत्तांत
मुद्दा मान्य आहे
In reply to छान वृत्तांत by प्रदीप
कट्टा होणार आहे हे माहित
पुढचा कट्टा पावसाळ्यात खंडाळा घाट
मिसळउकडलेले मक्याचे दाणे. कुठेही एकच चव.