दोन महिन्यांपूर्वीच्या बुलेट्प्रूफ कॉफी या माझ्या पाककृतीत म्हटल्याप्रमाणे आहारातून कार्ब्स कमी केले. त्यामुळे वजन कमी झाले ते अद्यापही ६० किलोच आहे.
आता कार्ब्स कमी करायचे तर माझा आवडता पाव हा पदार्थ खाता येत नाही. म्हणून कार्ब्स विरहीत पावाच्या शोध घेत असता नारळी पावाची कृती सापडली आणि त्वरीत अमलातही आणली.
अत्यंत सोपी आणि झटपट होणारी हे आहे नारळी पावाची पाककृती -
साहित्य -
कोकोनट पावडर - १०० ग्रॅम्
अंडी - २
बटर - ४-५ चमचे
बेकींग पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
वरील सर्व पदार्थ एकत्र करा. ओवन १८० डिग्रीवर गरम करून घ्या. ज्या भांड्यात बेक करणार त्या भांड्याला आतून बटरचा हलका हात फिरवून घ्या. मिश्रण भांड्यात ठेवून १८० तापमानाला ३० मिनिटे बेक करून घ्या.
छायाचित्रे -
https://drive.google.com/drive/folders/1jn7GbXwpPvsYQ_amA34uOIjrv3onHq4…
वाचने
5174
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटले याच्यात पदार्थ
धन्यवाद
In reply to मला वाटले याच्यात पदार्थ by nutanm
चांगली पाककृती,नारळाचा वापर
धन्यवाद
In reply to चांगली पाककृती,नारळाचा वापर by Bhakti