काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान कर्नाटकात कोलार जिल्ह्यात एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. राहुल म्हणाले होते- " नीरव मोदी, ललित मोदी .. अच्छा .एक छोटासा सवाल आहे . या सर्व चोरांचे नाव मोदी कसे ?" यावरून सर्व मोदींचा अपमान केला म्हणून पूर्णेश मोदींनी खटला दाखल केला. माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारच्या खटल्यात संबंधित आरोपीला 'माझा उद्देश सगळ्या मोदींना चोर म्हणायचा नव्हता पण तसा अर्थ निघत असला तर त्याबद्दल माफी' असे म्हणून सोडून द्यायचा पर्याय देत असते. तो जर फिर्यादीने मानला तर खटला बंद होतो आणि पुढे काही होत नाही. अन्यथा खटला पुढे चालू राहतो आणि मग आरोपी नक्की काय म्हणाला आहे, त्यातून अर्थ काय निघतो हे बघितले जाते. या खटल्यातही तसेच झाले असायची शक्यता आहेच. पण 'मी माफी मागायला सावरकर आहे का' या नेहमीच्या खाक्याला अनुसरून राहुल गांधींनी तशी माफी मागायला नकार दिला असेल तर मग फिर्यादीने ती माफी मान्य करायचा किंवा नाकारायचा प्रश्नच येत नाही. अशाप्रकारच्या खटल्यात जास्तीत जास्त २ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होते. सुरतमधील संबंधित कोर्टाने जास्तीतजास्त शिक्षा राहुल गांधींना दिली असे दिसते. आता त्या कोर्टाने असे का केले असावे? तर त्याचे उत्तर दुसर्या एका खटल्यात लपले आहे.
त्याचे झाले असे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना उद्देशून राफेल विमानखरेदी प्रकरणात 'चौकीदार चोर है' ही घोषणा राहुल गांधींनी केली होती. या प्रकरणी चौकशी व्हावी म्हणून अरूण शोरी आणि यशवंत सिन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्या सुनावणीत राफेल व्यवहाराची सगळी कागदपत्रे बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाने मागितली तेव्हा (किंवा त्या सुनावणीदरम्यान कधीतरी) राहुल गांधींनी 'बघा सुप्रीम कोर्टाने सुध्दा चौकीदार चोर है' हे मान्य केले असे म्हटले असे विधान केले. त्याविरोधात भाजप नेत्या मिनाक्षी लेखींनी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचा अवमान केला अशी याचिका दाखल केली. त्याप्रकरणी परत कोर्टाने आम्ही कधीही चौकीदार चोर है असे म्हटलेले नाही हे स्पष्ट करत राहुल गांधींना माफी मागायचा पर्याय दिला. तो पर्याय स्विकारणे नाहीतर तुरूंगात जाणे हे दोनच मार्ग शिल्लक राहिल्यावर राहुल गांधींनी निमूटपणे कोर्टाची माफी मागितली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की यापुढे राहुल गांधींनी जाहीर वक्तव्ये करताना काळजी घ्यावी.
आता पूर्णेश मोदींनी दाखल केलेल्या खटल्यात राहुल गांधी संधी दिल्यावर माफीही मागत नाहीत आणि २०१८-१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने काळजी घ्या असे स्पष्टपणे सांगितलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करतात असे सुरतच्या कोर्टाला वाटले असायची शक्यता आहे. त्यामुळे त्या कोर्टाने राहुल गांधींना जास्तीतजास्त म्हणजे २ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली.
आता गुन्हा कितपत मोठा आहे आणि दोन वर्षे तुरूंगात धाडण्यायोग्य आहे का याविषयी बरेच लिहिले आणि म्हटले गेले आहे. पण त्यामागे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कानपिचक्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले हा पण महत्वाचा मुद्दा आहे हे पण महत्वाचे आहे. काहीही असले तरी कायद्याच्या आणि कोर्टाच्या दृष्टीकोनातून ती शिक्षा दिली गेली आहे. राहुल गांधींची आजी इंदिरा गांधींची लोकसभेवर झालेली निवडही अशा वरकरणी क्षुल्लक वाटणार्या कारणांमुळे कोर्टाने रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी देशात आणीबाणी लादली आणि तो निर्णय फिरवला. आता राहुल कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. एका अर्थी आजीचे पाप नातवाला भोगायला लागत आहे असे म्हणायचे का? आपल्याकडे ज्याला पितृदोष म्हणतात तो हाच का?
आता राहुल गांधींनी या शिक्षेविरोधात अपील केले आहे. ते कायद्याच्या प्रक्रीयेप्रमाणेच आहे. आता वरचे कोर्टही राहुल गांधींना माफी मागायचा पर्याय देईल. ते तो निमूटपणे स्विकारतात का हे बघायचे. पण दरम्यानच्या काळात परत एकदा 'माफी मागायला मी सावरकर थोडीच आहे' हे त्यांनी बोलून घेतलेले आहे. तेव्हा परत माफी मागणे प्रशस्त दिसणार नाही हे पण तितकेच खरे.
या प्रकरणी राहुल गांधींविरोधात खटला चालवून त्यांना शिक्षा करण्यापर्यंत आपला मुद्दा पूर्णेश मोदींनी सोडला नाही हे चांगले झाले. अन्यथा दुसर्या बाजूने वाटेल ते बोलायचे, तेवढ्यापुरता खटला दाखल करायचा पण तो पूर्णत्वाला न्यायचा नाही असे उजव्या गटाकडून अनेकदा झाले आहे. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लालकृष्ण अडवाणी कोईमतूरमध्ये भाषण करायला जाणार होते त्यापूर्वी तिथे बॉम्बस्फोट झाले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये रा.स्व.संघाचा हात आहे आणि त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे हे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी एकदा नाही तर दोनदा म्हणाले होते. संघाने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला पण तो असाच अर्ध्यात सोडला. केजरीवालांनाही अरूण जेटली आणि नितीन गडकरी या दोघांनीही असेच स्वस्तात सोडले. गांधीहत्येमध्ये रा.स्व.संघाचा हात होता असा आरोप राहुल गांधींनी भिवंडीच्या सभेत केला होता त्याविरोधातही तिथल्या कोणी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. त्याचे काय झाले माहित नाही. निदान एकदा तरी बेताल बडबडीबद्दल कोणालातरी असे अडचणीत पकडले हे चांगले झाले.
वाचने
13362
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म!!
२००० च्या वर यु पी आय ने
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
युपीआय
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
@ चंद्रसूर्यकुमार,
In reply to युपीआय by चंद्रसूर्यकुमार
आर्थिक संकट
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्रजी
In reply to हम्म!! by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद!!
In reply to राजेंद्रजी by अमर विश्वास
आता राहुल गांधींनी या
संघाने त्यांच्याविरोधात खटला
कोर्ट कचेऱ्या करायला कोट्यवधी
In reply to संघाने त्यांच्याविरोधात खटला by वामन देशमुख
कोर्ट कचेऱ्या करायला कोट्यवधी
In reply to कोर्ट कचेऱ्या करायला कोट्यवधी by विवेकपटाईत
संघाचाहिंदूंचा हाच प्रॉब्लेम आहे. ते त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार व कोर्टाच्या तोंडाकडे बघतात. हजार वर्षांपासून ते मुसलमानांकडून काही शिकले नाहीत हेच खरं. --- सदर प्रतिसाद या चर्चेत सहभागी झालेल्या किंवा न झालेल्या कुणाही विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याचे हेतूने लिहिलेला नाही.मुंबईतील 2008 साली झालेल्या
In reply to संघाने त्यांच्याविरोधात खटला by वामन देशमुख
मुंबईतील 2008 साली झालेल्या हल्ल्याचा खोटा, संघविरोधी, हिंदूविरोधी, देशविरोधी इतिहास सांगणारे हे पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे.या पुस्तक प्रकाशनावेळी व्यासपीठावर दिग्विजय सिंह आणि कृपाशंकर उपस्थित होते. कृपाशंकरना २ वर्षांपूर्वी पायघड्या घालून भाजपत आणले. पुढील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मुंबईतील एका मतदारसंघात कृपाशंकर भाजपचा उमेदवार असणार आहे.राहुल गांधी हे माफी वीर आहेत.
वामन देशमुख
गेल्या राम नवमीला पतंजली
ओपेक प्लस देशांनी तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला
अडचणी
In reply to ओपेक प्लस देशांनी तेलाचे उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला by राजेंद्र मेहेंदळे
किती प्रदेश जिंकला यावर
In reply to अडचणी by चंद्रसूर्यकुमार
पेट्रोडॉलरचा मुद्दा मी पाठीमागेच अधोरेखीत केला होता.
In reply to अडचणी by चंद्रसूर्यकुमार
ब्रिक्सचे चलन
In reply to पेट्रोडॉलरचा मुद्दा मी पाठीमागेच अधोरेखीत केला होता. by Trump
युरोप
In reply to अडचणी by चंद्रसूर्यकुमार
वेगळा विषय
Twitter चा पक्षी गेला.
तो कुत्रा म्हणजे शिबा इनू
In reply to Twitter चा पक्षी गेला. by कंजूस
अरे वा!!
In reply to तो कुत्रा म्हणजे शिबा इनू by गवि
मारली होती ऑलरेडी.
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
रघुराम राजन उवाच
अमर्त्य सेन ते रघुराम राजन हे
In reply to रघुराम राजन उवाच by चंद्रसूर्यकुमार
मोठ्या संस्थांमधून शिकलेले लोक
In reply to अमर्त्य सेन ते रघुराम राजन हे by विवेकपटाईत
या मागे चीनची आर्थिक घौडदौड आहे.
रॅपर ला अटक
BBC च्या documentry नंतर आयकर
In reply to रॅपर ला अटक by कपिलमुनी
BBC ला Prasad मिळायलाच हवा
In reply to BBC च्या documentry नंतर आयकर by रात्रीचे चांदणे
केतकी चितळे, समीत ठक्कर, मदन
In reply to BBC च्या documentry नंतर आयकर by रात्रीचे चांदणे
उत्तम गाणे...
In reply to रॅपर ला अटक by कपिलमुनी
या तथाकथित 'गाण्या'तले शब्दप्रयोग मिपावर लिहीले तर चालेल का?
In reply to रॅपर ला अटक by कपिलमुनी
ढसाळ
In reply to या तथाकथित 'गाण्या'तले शब्दप्रयोग मिपावर लिहीले तर चालेल का? by चित्रगुप्त
चैला
In reply to या तथाकथित 'गाण्या'तले शब्दप्रयोग मिपावर लिहीले तर चालेल का? by चित्रगुप्त
"गांड मारा आमची आता, येवढंच बाकी आहे" - हे ऐकलं नाही का?.
In reply to चैला by सुरिया
अरे देवा !
In reply to "गांड मारा आमची आता, येवढंच बाकी आहे" - हे ऐकलं नाही का?. by चित्रगुप्त
सहमत
In reply to अरे देवा ! by कपिलमुनी
या गाण्यात फारसे आक्षेपार्ह
In reply to रॅपर ला अटक by कपिलमुनी
हे खरे साजूक अस्सल तूप बोलले.
In reply to या गाण्यात फारसे आक्षेपार्ह by आनन्दा
आयला हे बरंय
In reply to हे खरे साजूक अस्सल तूप बोलले. by सुरिया
https://youtu.be/KyebGc3n8Kk
In reply to हे खरे साजूक अस्सल तूप बोलले. by सुरिया
विनोदी
In reply to https://youtu.be/KyebGc3n8Kk by आनन्दा
एकूण विरोधी वातावरण तापत आहे.
दोन महिन्यात पुढील निवडणूक?
In reply to एकूण विरोधी वातावरण तापत आहे. by कंजूस
जणू काही दोन महिन्यांत निवडणूका होणार
In reply to दोन महिन्यात पुढील निवडणूक? by श्रीगुरुजी
उच्च शिक्षित आप नेत्यांची
सचिन पायलट
मुंबई
मराठी माणसांची बाजु घेणारा कोणता पक्ष आहे?
In reply to मुंबई by कपिलमुनी
दिल्लीचे मूल निवासी जाट,
In reply to मराठी माणसांची बाजु घेणारा कोणता पक्ष आहे? by Trump
तरीही किती दिल्लीकर मुंबईला येतात आणि किती मुंबईकर दिल्लीला जाता
In reply to दिल्लीचे मूल निवासी जाट, by विवेकपटाईत
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
कंपनीच्या व्यवहारात नक्की कोण दोषी?