Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 03/20/2023 - 15:50
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
भाग-१ विकांताला मस्त ट्रेक झाला होता. दमलो होतो आणि घरी जायची ओढ लागली होती. पळस्पे फाट्यावर एस टी बसची वाट बघत उभा होतो. हा शेवटचा टप्पा नेहमीच कंटाळवाणा असतो. तेव्हढ्यात एक आजीबाई बोरे टोपलीत घेऊन विकताना दिसली. तोंडाला चाळा म्हणून तिच्याकडून थोडी बोरे विकत घेतली आणि वीसची नोट आजीबाईला दिली.तेव्हढ्यात माझी बस येताना दिसली म्हणून सॅक सावरत पळालो. आजीबाई पाठीमागे ओरडत होती, "बाळा ,सुट्टे पैसे घे रे" पण बसमध्ये जागा पकडायच्या नादात ५ रुपयाचा विचार कोण करतो? खिडकीत बसायला जागा मिळाली. बस सुरु झाली आणि खिडकीतून सहज मागे वळून पाहिले. झाडाखाली आजीबाई डोळयांवर हात धरून दूर जाणाऱ्या बसकडे हताशपणे बघत उभी होती. ========================= भाग-२ काही दिवसांनी पुन्हा पळस्पे फाट्यावर बसची वाट बघत उभा होतो, तोच आजीबाईने मला हुडकले आणि ५ रुपये दिले "बाळा , किती शोधला रे तुला?हे ५ रुपये राहिले होते बघ त्यादिशी माझ्याकडे " मी अवाक "आजीबाई, आग राहिले तर राहू दे, ५ रुपयेच तर आहेत." आजीबाई म्हणे "अरे, हिशोब चोख पायजे. त्या ५ रुपयांसाठी कुठे पुन्हा जल्म घेऊ आणि तुलाही घ्यायला लावू?" तरीही मी चिकाटीने "आजीबाई, एखाद्या भिकाऱ्याला द्यायचे मग, तो ही खुश आणि तुलाही पुण्य मिळाले असते?" आजीबाई माझ्या वरताण"आरं, तुझ्या पैक्यावर मी पुण्य कमावू म्हंतोस?" मग ३ लोकांना जल्म घ्यावा लागला असता, तुला मला नी त्या भिकाऱ्याला." न बोलता आजीबाईच्या पाया पडलो.
  • Log in or register to post comments
  • 3125 views

प्रतिक्रिया

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 03/20/2023 - 15:52

Permalink

शीर्षक-दोन शशक-शबरीची बोरे असे वाचावे

शीर्षक-दोन शशक-शबरीची बोरे असे वाचावे. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/20/2023 - 15:54

Permalink

वा !

छान आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 03/20/2023 - 16:45

Permalink

पुनर्जन्म नक्कीच मुलीचा ....

असे म्हणतात या जन्मीचे देणे याच जन्मी फेडावे. ज्याची उधारी राहील तो, म्हणजे घेणेकरी देणाऱ्याच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल. आजीबाई जुन्या विचाराच्या,वृद्धपणी पैलतीर दिसू लागले म्हणून, जन्ममरण नको आता, नको येरझार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार चराचरा पार न्या हो जाहला उशीर ‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला पुंडलिका.......
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 03/20/2023 - 17:54

Permalink

मस्त एकदम.

मस्त एकदम. पळस्पे फाटा म्हणजे प्रबळगडाला जवळ ना?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 03/21/2023 - 10:43

Permalink

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

@प्रचेतस-- नाही, तो शेडुंग फाटा कथा काल्पनिक आहे. पळस्पे फाटा प्रबळ अणि इर्शाळ दोन्हीपासुन लांब आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Tue, 03/21/2023 - 13:10

Permalink

वाह!छान,

वाह!छान, शशक निरागसपणे आयुष्याचे गुढ सांगतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Wed, 03/22/2023 - 01:28

Permalink

दोन्ही शशक आवडल्या..

मस्त आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on गुरुवार, 03/23/2023 - 10:28

Permalink

मस्त आहेत दोन्ही शशक

मस्त आहेत दोन्ही शशक
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 03/23/2023 - 10:37

Permalink

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

सर्व वाचकांचे धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by nutanm on Sat, 03/25/2023 - 05:25

Permalink

कर्नलतपस्वी यांनी लिहिल्या

कर्नलतपस्वी यांनी लिहिल्या प्रमाणे घेणेकरी देणार्याच्या पोटी जन्माला येतो , त्यावरूनच आठवले माझी आई लहानपणी काही म्हणी आम्हाला मुलींना उद्देशून वापरत असे त्यातली घेणेकर्यावरून आठवली ती म्हण म्हणजे "दिले दान घेतले दान, पुढचया जन्मी मुससमान. मला इथे कुठलेही जाती धर्मवाचक काहीच म्हणायचे नाही फक्त अस्सल पुणेरी ब्राम्हणी घरात, पेशव्यांच्या काळाचा पगडा असलेल्या घरात वाढलेल्या माझ्या आईच्या तोंडच्या अश्या म्हणींबद्दल सांगायचे आहे .
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com