हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ
In reply to हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) by प्रसाद गोडबोले
In reply to तुमच्या शंकांचे समाधान खालील by चौथा कोनाडा
In reply to ४. सौ दीपा कुलकर्णी. by स्मिता श्रीपाद
In reply to तुमच्या शंकांचे समाधान खालील by चौथा कोनाडा
In reply to इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ by साहना
In reply to दोन्ही तांदूळ उत्तम प्रतीचे by सुखी
In reply to इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ by साहना
हातसडीचा तांदूळ म्हणजे हाताने सडलेला किंवा पॉलिश न केलेला तांदूळ. अशा तांदळामध्ये रिफाईंड न केल्यामुळे त्यावरील थर अथवा आवरण तसेच असते. तांदळावर ब्रान, जर्म आणि इंडोस्पर्म असे तीन थर असतात. तांदूळ पॉलिश करताना हे आवरण अथवा थर निघून जातात. तो तांदूळ पॉलिश केल्यावर ते घटक निघून जाऊन फक्त कार्बोदकेच मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतात. म्हणून पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत हातसडीचा तांदूळ आरोग्या साठी चांगला. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, त्यामुळे आपणास डॉक्टर सांगतात, की मुधुमेह असणाऱ्या लोकांनी भात खाऊ नये किंवा कमी खा. पण हातसडीचा भात खाण्यास काहीच हरकत नाही.
In reply to चर्चेतून चांगली माहिती मिळत आहे! by टर्मीनेटर
In reply to टर्मिनेटर भौ .... by आलो आलो
पुलाव किंवा बिर्याणी साठी मात्र लांब फुलणारे फॉर्च्युन चे तांदूळ भारी असतात असा अनुभव आहे.+१००० लांब फुलणारे फॉर्च्युन चे तांदूळ भारीच असतात! पण लॉकडाऊन काळात 'फॉर्च्युन' चा तुटवडा होता म्हणून 'दावत' ट्राय केला, आणि तो पण आवडल्याने आता त्यावर स्विच झालोय.
सेम स्वाद मला हैदराबाद ला 'बावर्ची' मध्ये चाखायला मिळालीमला पण 'पॅराडाईज' पेक्षा 'बावर्ची' ची बिर्याणी चांगली वाटते 👍 हैदराबादला समशाबाद एअरपोर्ट जवळच्या 'निम ट्री' हॉटेलमध्ये आमचा चार दिवस मुक्काम होता. तिथुन अगदी जवळ 'बावर्ची' ची एक शाखा आहे. तेव्हा रोज एकवेळच्या जेवणात तिथली बिर्याणी हादड्ली होती 😀
In reply to व्हय जी... आम्ही खुद्द सातारचं (शनिवार पेठ) by टर्मीनेटर
In reply to अहाहा, हैद्राबादी बिर्याणी! by वामन देशमुख
In reply to हैदराबादचा लुत्फ by हणमंतअण्णा शंक…
>>>>त्यांच्या आया आज्ज्यांनी रांधलेल्या बिर्याण्या झोडल्याशिवाय समजायचे नाही पंत!
१००% सहमत !
बाकी मित्रांचे आणि त्यांच्या घरचे जेवण म्हणाल तर राजेहो आयुष्यातील सुरुवातीची ६ वर्षे हॉस्टेल आणि रूम वर काढलीयेत त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास (अधिक उणे) सगळ्या जिल्ह्यात मित्र असल्याने त्या त्या ठिकाणी त्यांच्या घरच्या जेवणाची समृद्ध चव अजूनही जिभेवर आठवते.In reply to अहाहा, हैद्राबादी बिर्याणी! by वामन देशमुख
मयूर पान हाउस में मीनाक्षी पान खाना नक्को भूलो। समझें ,बड़े भाई?
वाह मियां क्या यादें निकाले तुम, मयूर पान हॉउस की ....
चौकशी करता समजले कि जवळपास ८० हुन अधिक प्रकारची रेंज आहे यांची यातील मी ट्राय केले ते
१) मीनाक्षी पान
२) नवरतन
३) मीठा लड्डू
४) चन्दन
आणि मागच्या धावत्या हैद्राबाद भेटीत मेंगो रोल घेतले ....वा वा वा ! सुप्पर एकदम फाकडू टेस्ट ! In reply to अहाहा, हैद्राबादी बिर्याणी! by वामन देशमुख
जुम्मेरात के दिन क्या बिरयानी की याद करे तुम बड़े भाई! अब्ब, कुच बी करके हफ्ते के दिन शाम कू जाना पड़ता अबिड्स कू। आरेंइ? आजाव।बातां तिन-चार साल पैलेकी रैती तो बिलकुल आतें मियाँ... परसों तक (बोलेंतो हैदराबादी मैं तिन-चार साल पैले 😀) अपने दो खासंखास यारां बंजारा हिलपे रैते मियाँ.. तबी बौत आना-जाना लगा रैता अपना हैदराबादा! बेंगळुरू (आताचे नाव) च्या एका कंपनीसाठी तेलंगणा मध्ये चंदनाच्या झाडांची लागवड केलेले प्लॉट्स विकणे हे त्यांचे काम होते. काही वर्षांनी (म्हणजे २० ते २५ वर्षांनी) आज केलेल्या ५ लाखांच्या गुंतवणुकीवर चाळीस-पन्नास लाख रुपये मिळतील अशा आश्वासनावर लोकं ते (ज्यावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम कधीच न करता येण्यासारखे) प्लॉट्स विकत घेत होते. प्रत्येक प्लॉट विक्रीतून ह्यांना लाखापेक्षा जास्त इंन्सेन्टिव्ह मिळायचा (पगार वेगळा). ज्या महिन्यात चार-पाच प्लॉट विकले गेले कि विमानाच्या जाण्या-येण्याच्या प्रवासाच्या तिकिटांसहित हैदराबादचे आमंत्रण असायचे. जाम मजा केली होती त्यावेळी तीन वर्षे हैदराबाद मध्ये, वर्षातून चार तरी फेऱ्या व्हायच्या 😀 दिवस भटकंतीत/खादाडीत जायचा तर रात्री उशिरापर्यंत आम्ही इनर रिंग रोड वरच्या 'हैदराबाद ब्लू' मध्ये पडीक असायचो... त्याच रोड वरचे 'काराचीवाला' ह्यांच्या फ्लॅट पासून अगदी जवळ त्यामुळे बेकरी आयटम्सचीही चंगळ होतीच. तिथून जवळंच (एक की दोन सिग्नल्स पार केल्यावर) 'ऍशले'ज (की स्टॅनले'ज) नावाचे एक मलबारी रेस्टोरंट होते, तिथे चिकन परोठा अप्रतिम मिळायचा. असो... हैदराबादच्या आठवणी खूप आहेत पण आलो आलोंच्या 'इंद्रायणी तांदुळावरच्या' धाग्याचे हैदराबाद (इतरवेळी धाग्याचे काश्मीर होते 😀) व्हायला नको म्हणून आवरते घेतो.
In reply to जुम्मेरात के दिन क्या बिरयानी की याद करे तुम बड़े भाई! by टर्मीनेटर
In reply to नॉस्टॅल्जिक हो गये क्या मियां by आलो आलो
नॉस्टॅल्जिक हो गये क्या मियांहाउ (yes)... 😀 धागाविषयाशी हे फारच अवांतर होईल पण राज्य सरकार पुरस्कृत एका महा भू-घोटाळ्याचा नमुना त्यावेळी जवळुन पहाता आला होता. अर्थात त्यात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाचे थेट आर्थिक नुकसान होणार नसल्याने तो पुढे-मागे उघडकीस येण्याची शक्यता जवळपास नाहीच! नव्याने स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झालेल्या राज्याची सत्ता मिळाल्यावर पुढील निवडणुका जिंकण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी नोटबंदीनंतर पैसा उभा करण्या बरोबरच भविष्यात विशिष्ट भूभागावरील आरक्षण उठवण्याची सोय म्हणून (दिखाव्यासाठी घात्लेल्या अटिंवर) कवडीमोल किमतीने खाजगी कंपनीला दिलेली जमीन, मग त्यावर वाढीसाठी प्रचंड वेळ लागणाऱ्या चंदनाच्या रोपांची लागवड करून तिची प्लॉट्स रूपाने केलेली विक्री, त्या प्लॉट्सच्या खरेदीसाठी आपल्याच पक्षातील धनाढ्य बगलबच्यांना आणि हितसंबंधीयांना ग्राहक म्हणून उभे करणे, त्यातली काही रक्कम ब्लॅक मध्ये तर काही व्हाईट मध्ये स्वीकारणे वगैरे वगैरे गोष्टी त्यावेळी कल्पने पलीकडील नसल्या तरी आचंबित करणाऱ्या नक्कीच वाटल्या होत्या! होता हैं... चलता हैं... दुनिया हैं 😀 नेते आणि त्यांचे पक्ष कसेही असले तरी त्यांच्या प्रत्येक भल्या-बुऱ्या कृती/निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करणारे त्या त्या पक्षाचे झेंडे हाती घेतलेले आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आहेत तो पर्यंत असल्या गोष्टी होतंच रहाणार... वरती झालेल्या अति अवांतरासाठी क्षमस्व 🙏
In reply to भातप्रेमी.... by कर्नलतपस्वी
In reply to कांडीतो ठोमरा माझेलागी by हणमंतअण्णा शंक…
तरीही खाजेपायी हिमालयातूनही वाइल्डराईस तांदूळ मिळवणेस माझी हरकत नाही.
फक्त शेवट मात्र जबरा केलात ! (नसता केलात तर अधिक छान वाटलं असत)
उत्तम राहणे
उत्तम खाणे
उत्तम वागणे
याबरहुकूम आमचे जीवन आहे आपण याला 'खाज' समजत असाल तर तुमची विचारसरणी तुम्हाला लखलाभ.
बाकी या कधी नगरला आलात तर ....मस्त बिर्याणी / पुलाव चा बेत करतो (पण ते तुमचं हिमालयाचं वाईल्ड राईस नसेल हो कारण आम्ही बासमती /आंबेमोहोर/इंद्रायणी वाले ----हातसडीचे शोधतोय अजून )
आपल्यासारखाच अति भातप्रेमी In reply to हणमंतअण्णा शंकर... by आलो आलो
In reply to हातसडीचे तांदूळ by कपिलमुनी
बादवे तांदळाची चर्चा आणि
>> रेठरा बासमती चे नाव आले नाही याचे आश्चर्य वाटले.
रेठऱ्यात राहिलाय का कोणी बासमतीच पीक घेणारं आता ?
साधारण ४-५ वर्षांपूर्वी तिकडील एक फौजी बंदा रेंट ने राहायला होता आमच्या सोसायटीमध्ये त्याच्या बायकोने आणून दिले होते एकदा रेठरा बासमती (विकत) ...छान चव होती पण परत काही मिळाला नाही तो वाण.
कृष्णेचं पाणी मानवत म्हणे बासमतीला .... थोडं विस्ताराने सांगितले तर ज्ञानात भर पडेल. In reply to तांदूळ कसा शिजवता? by कंजूस
In reply to लखनौ मधील....मोती बिर्याणी by कर्नलतपस्वी
In reply to तांदूळ कसा शिजवता? by कंजूस
हातसडीचा अस्सल (इंद्रायणी)