दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका विशेष पथकाद्वारे आपल्या राजकीय विरोधकांवर पाळत/ हेरगिरी केली म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस नेते, माजी खासदार आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे चिरंजीव संदीप दिक्षित यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे केली आहे.
संदीप दिक्षितांच्या ट्विटर खात्याला निळ्या टिक्स नसल्याने ते खाते अधिकृत नाही असे वाटून अन्यत्र खात्री करून घेतली तर ए.एन.आय च्या ट्विटर खात्यावरही तेच सापडले.दिल्ली LG साहेब को आग्रह किया की @ArvindKejriwal और @msisodia पर FBU से जासूसी कराने के मामले में देशद्रोह का मुक़दमा चलना चाहिए pic.twitter.com/FbtemG6bXJ
— Sandeep Dikshit (@_SandeepDikshit) March 1, 2023
त्याचे झाले असे की २०१५ मध्ये पहिल्यांदा बहुमतातले सरकार स्थापन केल्यानंतर अरविंद केजरीवालांच्या सरकारने FBU (Feedback Unit) या विभागाची स्थापना केली. या विभागाचा उद्देश सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी वगैरे लाच मागत असतील किंवा अन्य प्रकारे कोणताही भ्रष्टाचार करत असतील तर त्यांच्याविरोधात टिकेल असा पुरावा गोळा करणे असेल असे सांगितले गेले होते. २०१६ मध्ये या विभागाने कामाला सुरवात केल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पुरावे गोळा करण्यापेक्षा आपच्या विरोधकांवर पाळत ठेवल्याचे काम जास्त केले असे नायब राज्यपालांनी याविषयी सी.बी.आय चौकशी करायची शिफारस करताना म्हटले होते -- "… seems to have been well-conceived attempt to establish extraneous and parallel covert agency with overarching powers of snooping and trespass… without any legislative, judicial or executive oversight whatsoever". सी.बी.आय ने म्हटले की या विभागाने हाताळलेल्या ७००+ केसेसपैकी ४०% अशा हेरगिरीशी संबंधित होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात यावा ही मागणी संदीप दिक्षित यांनी केली आहे. असे देशद्रोहाचे आरोप कोर्टात टिकत नसतात. तसेच या प्रकरणी अन्य कोणत्याही कायद्याअंतर्गत आरोप ठेवला तरी देशद्रोहाचा आरोप ठेवता येईल का याविषयी साशंक आहे. तेव्हा या मागणीला तसा फारसा अर्थ नाही असे वाटते. तरीही एक महत्वाची गोष्ट म्हणजे यातून एक गोष्ट समोर येत आहे की पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांची आघाडी होणे बर्यापैकी कठीण आहे. एक तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून मोठ्या राज्यांमध्ये मते फिरवू शकतील असे विरोधक- अखिलेश, चंद्रशेखर राव, केजरीवाल वगैरे दूर राहिले. कारण समजायला फार कठीण नाही. त्या यात्रेत सहभागी झाले असते तर राहुल गांधी हेच विरोधकांचे नेते असतील हे एका अर्थी मान्य करण्यासारखे झाले असते. नेमक्या त्याच गोष्टीला ते तयार नव्हते. आताही मनीष सिसोदियांना अटक केल्यानंतर काँग्रेसने फार जाहीर विरोध केला आहे असे दिसले नाही. त्याचे कारण काय असावे? तर त्यातून सिसोदिया आणि आपला उगीच महत्व काँग्रेसकडून दिले गेले असे चित्र उभे राहू नये असे त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत असावे असे दिसते. आता तर थेट केजरीवालांवर देशद्रोहाचा खटला भरावा अशी मागणी कॉंगेस नेत्याने केली आहे. एकेकाळी शीला दिक्षित स्वतःच्या नावावर दिल्लीत भरपूर मते फिरवू शकायच्या. आता त्या तर गेल्याच आणि संदीप दिक्षितही फार प्रभावशाली नेते राहिले आहेत असे वाटत नाही. पण प्रश्न कोण प्रभावशाली आहे आणि कोण नाही यापेक्षा काँग्रेसच्या नेत्याकडून असे आरोप होत आहेत यामुळे २०२४ मध्ये विरोधकांची एकत्र आघाडी व्हायच्या मार्गात अडचणी आहेत हेच चित्र लोकांपुढे उभे राहते. त्यातून काँग्रेसच्या वरीष्ठ नेतृत्वाकडून संदीप दिक्षित यांच्यावर कारवाई झाली नाही, किमान त्यांच्या मागणीला पक्षाचे समर्थन नाही अशा स्वरूपाचे काही वक्तव्य आले नाही तर हे चित्र अधिक स्पष्टपणे मतदारांपुढे उभे राहायला मदत होईल.Congress leader Sandeep Dikshit requested Delhi LG Vinai Saxena to prosecute Delhi CM Arvind Kejriwal and all other officials under Sedition Act in the alleged Feeback Unit (FBU) snooping case.
— ANI (@ANI) March 1, 2023
वाचने
13808
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
छत्तीसगड पोलिसांनी लोकांना
दुवा
In reply to छत्तीसगड पोलिसांनी लोकांना by निनाद
घरगुती गॅस दरवाढ.
चिंचवडमधे अश्विनी जगताप तर
आनंद
In reply to चिंचवडमधे अश्विनी जगताप तर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सहमत... कुठेतरी असा फटका
In reply to आनंद by चंद्रसूर्यकुमार
भाजपचा पराभव
फेब्रुवारी २०२३ च्या ताज्या
हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक
In reply to फेब्रुवारी २०२३ च्या ताज्या by श्रीगुरुजी
कसब्यात मुद्दाम अब्राह्मण
In reply to फेब्रुवारी २०२३ च्या ताज्या by श्रीगुरुजी
हे गणित काही कळले नाही
In reply to कसब्यात मुद्दाम अब्राह्मण by चौकस२१२
हे गणित काही कळले नाही कसब्यात जर फक्त ११ टक्के कि काहीसे ब्राहमण जातीचे मतदार असतील तर त्या सर्वांनी भाजपाला मत दिले नाही तरी इतर मतावर भाजप निडून येऊ शकतोजर उर्वरीत सर्व ८७% मतदार भाजपला मत देत असतील एकही ब्राह्मण मताची भाजपला गरज नाही. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कसब्यात मागील निवडणुकीपर्यंत भाजप उमेदवाराला ५०-५२ टक्के मते मिळायची ज्यात १३% ब्राह्मण मतातील बहुसंख्य मते असायची. म्हणजे विरोधात ४८-५० टक्के मते असायची जी २-३ उमेदवारात विभागली जायची. यावेळी विरोधात एकच उमेदवार होता. या १३% ब्राह्मण मतातील बहुसंख्य मते यावेळी भाजप उमेदवाराला मिळाली नाहीत. त्यातील काही जणांनी मत दिले नाही तर काही जणांनी धंगेकरला मत दिले. परीणामी पराभव झाला. जर या मतदारसंघात भाजपला सातत्याने किमान ६५% मते मिँत असती तर ब्राह्मण मतांची अजिबात गरज नाही. जी मते सातत्याने एकगठ्ठा मिळत होती, ती नको असतील तर त्या बदल्यात इतर नवीन मते मिळवायला हवी. पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरी २०१४ मध्ये २८.५% मते व १२२ आमदार अशी होती ज्यात ३-४% ब्राह्मण मतांचा समावेश होता. यातील निम्म्या ब्राह्मणांनी मत दिले नाही तर भाजपच्या किमान १०-१२ जागा कमी होतात. १४५ चा आकडा गाठायचा असेल तर आहेत ती सर्व २८.५% मते टिकवून नवीन ५-६% मते मिळवायला हवी. एकही नवे मत न मिळविता हातातील हक्काची ३-४% मते घालविणे हा मूर्खपणा आहे. २०१९ मध्ये अधिक मराठा मते मिळविण्यासाठी राखीव जागा देणे, सारथी संस्थेतून भरपूर मदत करणे, विरोधी पक्षातील अनेक मराठा नेते भाजपत आणणे, ब्राह्मण मतदारसंघात मराठा उमेदवार देणे, ब्राह्मणद्वेषी मराठा नेत्यांना पायघड्या घालून भाजपत आणणे असे निर्णय घेतले गेले. यातून आपल्याला जास्तीची मराठा मते मिळतील हे गणित होते. हे करताना उघड उघड ब्राह्मणांचे नुकसान झाले परंतु त्याकडे दुर्लक्ष केले कारण (१) आपल्याशिवाय ब्राह्मण मते कोणाकडेही जाणार नाहीत हे चुकीचे गृहीतक आणि (२) गेलेल्या ३-४% ब्राह्मण मतांची भरपाई ८-१०% अधिकची मराठा मते मिळून होईल हे अजून एक चुकीचे गृहीतक. प्रत्यक्षात ही दोन्ही गृहीतके खोटी ठरली. राखीव जागा व सवलतींचा वर्षाव करूनही भाजपला अधिकची मराठा मते मिळाली नाहीत (कारण उघड आहे) आणि काही ब्राह्मण तसेच इतर मागासवर्गीय मते मिळाली नाहीत. त्यामुळे भाजपला २०१४ च्या तुलनेत २.७५% मते कमी मिळून १९ जागा कमी झाल्या. परीणामी सत्ता गेली. शिवसेनेशी युती नसती तर भाजप ६० च्या पुढे जाऊ शकला नसता. जो विद्यार्थी सातत्याने ९०+ गुण मिळवितो त्याने प्रश्नपत्रिकेतील २-३ प्रश्न सोडून देणे समजू शकतो. परंतु जो सातत्याने ग्रेस गुण घेऊन पास होतो, त्याला येत असलेले २-३ प्रश्न सोडून देण्याची चैन परवडत नाही.जातीचे राजकारण करण्यापासून दूर जाण्यासाठी जर भाजप प्रयतन करीत असेल तर त्याचे स्वागत नको का करायला ?भाजप याउलट करतोय. इतर पक्षही हेच करतात. एका विशिष्ट जातीच्या मतांसाठी त्या जातीवर सवलतींचा वर्षाव करून सातत्याने मते देणाऱ्या दुसऱ्या जातीवर भाजप अन्याय करतोय. महाराष्ट्रात २८८ पैकी ४८ मतदारसंघ काही जातींसाठी राखीव आहेत. उर्वरीत २४० अराखीव मतदारसंघातून जवळपास १८० म्हणजे ७५% मतदारसंघात मराठा आमदार आहेत. इतर मागासवर्गीय, मुस्लिम वगैरे आमदार आहेतच. मग २-३ आमदार ब्राह्मण असावे ही मागणी चुकीची आहे का? हे २-३ मतदारसंघ सुद्धा ब्राह्मणांना न देणे व आम्ही जातीचे राजकारण करीत नाही असा दावा करणे हा ढोंगीपणा आहे व कसब्यातील ब्राह्मणांनी शेवटी धडा शिकविला आहे.महाराष्ट्रात शरिया कायदा लागू?
मेघालय, नागालॅण्ड आणि त्रिपुरा येथील विधानसभा निवडणुकींचे निकालः
पाकिस्तान आणि बांग्लादेशानंतर आता हिंदूस्थान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Upadhyay said "Hindus have been reduced to minority in 200 of the 700-odd districts. "साहित्य संपादक किंवा
In reply to पाकिस्तान आणि बांग्लादेशानंतर आता हिंदूस्थान ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Upadhyay said "Hindus have been reduced to minority in 200 of the 700-odd districts. "+१
In reply to पाकिस्तान आणि बांग्लादेशानंतर आता हिंदूस्थान ! by मदनबाण
घरातुन फरवटवत घेऊन गेलेल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटोअमेरिकेचा चीनला इशारा
नितीशकुमार-भाजप पुन्हा एकत्र
विरोधी पक्षांचे पत्र
महापालिका आयुक्तांना मारहाण
खासदारकी
In reply to महापालिका आयुक्तांना मारहाण by श्रीगुरुजी
इम्युनिटी योग्य वेळी काढतील.
In reply to खासदारकी by कपिलमुनी
सध्या त्यांचा भाजप प्रणित
In reply to खासदारकी by कपिलमुनी
वैयक्तीक प्रतिसाद टाळा
In reply to सध्या त्यांचा भाजप प्रणित by सुबोध खरे
नाशिकच्या जिल्हा न्यायालयात
In reply to वैयक्तीक प्रतिसाद टाळा by कपिलमुनी
का?
In reply to वैयक्तीक प्रतिसाद टाळा by कपिलमुनी
बच्चु कडूंवर वैयक्तिक टीका ?
In reply to का? by प्रसाद गोडबोले
गेल्या वर्षी, जेंव्हा मोदीजी
In reply to बच्चु कडूंवर वैयक्तिक टीका ? by कपिलमुनी
टॉप फॅन
In reply to गेल्या वर्षी, जेंव्हा मोदीजी by श्री
जळ्जळ पोहोचली
In reply to टॉप फॅन by कपिलमुनी
बच्चु कडूंवर कोणती वैयक्तिक
In reply to बच्चु कडूंवर वैयक्तिक टीका ? by कपिलमुनी
कानून के हाथ लंबे होते हैं |
पूर्वी मिपा वर खूप सारे
याच न्यासावर मोदिरुग्णानी
Bullet Train म्हणजे नाहक खर्च
मिशेल ओबामा
रडण्याचे काय एव्हडे ...
In reply to मिशेल ओबामा by चंद्रसूर्यकुमार
भारतरत्न
In reply to रडण्याचे काय एव्हडे ... by अमर विश्वास
गोळी आपोआप सुटली!
भाजपाला असल्या गोष्टींचे
खरं तर महाराष्ट्रात पुढील १०
In reply to भाजपाला असल्या गोष्टींचे by रात्रीचे चांदणे
धुतलेले तांदूळ शोधावे लागतील.
अमेरिकेत दोन बँक बुडल्या.
काय खरे काय खोटे कुणास ठाऊक.
In reply to अमेरिकेत दोन बँक बुडल्या. by विवेकपटाईत
भारतीय रेल्वे १०० टक्के विद्युतीकरणाच्या दिशेने
आज (18-19 मार्च, 20230
हिंदू धर्म
In reply to आज (18-19 मार्च, 20230 by विवेकपटाईत
राम कथा करणे म्हणजे ढोंग हे
In reply to हिंदू धर्म by कपिलमुनी
का जातात?
In reply to हिंदू धर्म by कपिलमुनी
इंडोनेशिया व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर बंद करेल.
भारताचीपण 'रूपे' ही पेमेंट सिस्टिम आहे ना ?
In reply to इंडोनेशिया व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर बंद करेल. by निनाद
इंडोनेशिया ही एक मोठी आणि वाढणारी बाजारपेठ आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
बच्चू कडू
बच्चू कडू याना दोन वेगवेगळ्या
In reply to बच्चू कडू by कपिलमुनी
Following the verdict, a
In reply to बच्चू कडू याना दोन वेगवेगळ्या by सुबोध खरे
=))))
In reply to बच्चू कडू by कपिलमुनी
ज्या प्रमाणे आधीच्या तीन
पण माफी मागितली असती तर बहुतेक त्यांना दंड झाला नसता
In reply to ज्या प्रमाणे आधीच्या तीन by विवेकपटाईत
खासदार गिरीश बापट यांचे निधन
खासदारकी
कोर्टाने या तत्परतेबद्दल निवडणूक आयोगाला फटकारलं.
In reply to खासदारकी by कपिलमुनी
Blue tick Twitter
पकिस्तान रमजानमध्ये मौलवीचे मुलावर लैंगिक अत्याचार
रामनवमीच्या दिवशी दंगली!
या निमित्ताने. . .
In reply to रामनवमीच्या दिवशी दंगली! by निनाद
महागाई
हायला
In reply to महागाई by कपिलमुनी
पगारवाढ
In reply to हायला by सुबोध खरे