Skip to main content

(कालवून टाक भात) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

लेखक चहाबाज यांनी सोमवार, 27/02/2023 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... सुप्रसिद्ध मराठी गीत - "मालवून टाक दीप... चेतवून अंग अंग" (कालवून टाक भात) कालवून टाक भात चिरडून कर भंग ! राक्षसा, किती भातात कोंबला तू हात थंड ! त्या तिथे उभ्या पिंपात घातले तू दोन्ही हस्त हाय तू मागू नकोस एवढ्यात पिण्या भांग ! गार गार या दह्यात घालुनी बोटे सुखात चाटुनी करून टाक पात्र सर्व शुभ्ररंग ! भुर्र भुर्र आवाजात ढोसला सांबार मस्त सावकाश घे गिळून एक दोन तीन वांगं ! हे तुला कधी कळेल ? कोण उपाशी मरेल ? थांब, का चालू असेच माकडा तुझे हे छंद ? काय हा तुझाच त्रास ? मरगळे, इथे उपवास ! उठ रे हळू, फाटेल तंग विजारीचा बंध !
विशेष

वाचने 3750
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

😀 😀 😀 असले खादाड लोक पाहिले असल्याने विडंबन पटले 😂

मजा आली हे विडंबन वाचून! सं - दी - प