Skip to main content

शशक- खड्डे

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 28/02/2023 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का? डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे. नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली. डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे. नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत? डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल. नर्स- बापरे. आणि सहावा खड्डा कधी भरणार? डॉक्टर- तो खड्डा मुद्दामच रिकामा ठेवलाय अजून. तुझ्यासाठी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1618
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

बाप रे.... वाईची ती भयानक घटना आठवली. नर्स पण दुर्दैवी बिचारी !

बापरे.... डॉक्टरला जेल झाली की मग पुढची शशक डॉक्टरीण बाईवर का?