पेन्शनचा फक्त वयाशी संबंध असावा नोकरीच्या प्रकाराशी नव्हे...
आता महाराष्ट्रात सरकारी नोकरांना जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोर धरतेय. मतांच्या राजकारणापायी ती मंजूरही नक्कीच होईल कारण राज्याच्या आर्थिक परिस्थितीशी सरकारी नोकरांना काही घेणेदेणे नाही. आज सरकारी व खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्तांच्या पेन्शनमधली तफावत पाहीली तर धक्कादायक परिस्थिती आढळते. वर्षाला २०० ते २२५ दिवस , दररोज ५ तास शिकवण्याचे काम केलेले प्राध्यापक सव्वा ते दिड लाख मासिक पेन्शन घेऊन मस्त युरोप टूरची मजा लुटत आहेत तर बिचारे खाजगी क्षेत्रातले कर्मचारी १२००/१३०० रूपये मासिक पेन्शनवर कसेबसे म्हातारपणाचे दिवस ढकलत आहेत.
सरकारने सर्व रिटायर्ड लोकांना (सरकारी नोकरीतील असो वा खाजगी ) त्यांच्या वयाचे ५-५ वर्षांचे टप्पे करुन त्या टप्यानुसार वाढती पेन्शन द्यावी. उदा.५८ ते ६३ वय असल्यास २०००० रु.,६३ ते ६८ वयासाठी २५००० रु. असे वाढते पेन्शन सर्वांना द्यावे.
असंघटीत व खाजगी क्षेत्रातील रिटायर्ड लोकांनीही जे राजकीय पक्ष जुनी पेन्शनला केवळ मतांसाठी पाठींबा देतील त्या पक्षांना मतदान करणार नाही हे ठणकावून सांगितले पाहीजे.
लोकसंख्येच्या प्रमाणात १०% पेक्षा ही कमी प्रमाण असलेल्या सेवानिवृत्त व सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जर राजकीय पक्ष केवळ मते मिळवण्यासाठी अनुनय करत असतील तर त्या प्रमाणात कैक पटीने असलेल्या खाजगी व असंघटित क्षेत्रातील कामगारांनीही आपल्या मतांची ताकद दाखवून दिलीच पाहिजे.
वर्गीकरण
वाचने
4942
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अगदी सहमत.
In reply to अगदी सहमत. by चौथा कोनाडा
सगळे पक्ष पाठिंबा देणार आणि टॅक्स भरणाऱ्यांना ओरबाडणार...
In reply to अगदी सहमत. by चौथा कोनाडा
@ चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||Rajasthan spends Rs 23,000
In reply to Rajasthan spends Rs 23,000 by सुबोध खरे
३ पिढ्यान्चे कल्याण होते...
In reply to Rajasthan spends Rs 23,000 by सुबोध खरे
३ पिढ्यान्चे कल्याण होते...
मुळात सरकारने खाजगी
सरकारी व खाजगी....नोकरी व पेन्शन
मुळात खाजागे क्षेत्रातील
In reply to मुळात खाजागे क्षेत्रातील by अमर विश्वास
हो ना...
In reply to हो ना... by dadabhau
आपल्या पगारातून सरकार जे 12.5
In reply to मुळात खाजागे क्षेत्रातील by अमर विश्वास
सर्वांनां नियम सारखा
आपण खाजगी नोकरांकडून
In reply to आपण खाजगी नोकरांकडून by सुबोध खरे
सरकारी नोकरांना नंतर आयुष्यभर
अमेरिकेत पेन्शन नाही असे ऐकले आहे.