✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(का या गळ्याच्या तळाशी...)

क — कर्नलतपस्वी, Tue, 02/21/2023 - 09:44
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते. सांप्रत कवितेत मला आजच्या बेरोजगारीची हमी व अर्थिक नियोजनाशी झगडणारी तरूणाई दिसली. नियोजन फसले तर काय होते ते आपण सर्व बघतच आहोत. अशात एखाद्याला अचानक एक्झीट घ्यावी लागते तेव्हां मागे राहाणाऱ्या चे काय हाल होतात ते बघवत नाही. शब्द जर काळजाला भिडले तर भावनांची सरिता दुथडी वाहू लागते.विडंबन असले तरी त्याला दुःखाची झालर दिसेल. असो, त्यांची रचना आमची प्रेरणा. &#128526 माफी आगोदरच मागीतली आहे.&#129315 सर्व स्त्रि सदश्यां समोर पाढंरे निशाण...... (का या गळ्याच्या तळाशी...) - का या गळ्याच्या तळाशी बांधशी दोर तू का सखी,सारखी डोक्यात जातीस तू. - अगणीत मागणे ते, "कधी संपायचे " काय करू?कार्ड सारखे सारखे का मागशी तू? - नुरले खात्या (Bank) मधे काही, ऐकताना का गं आता? थोबाड वेगांडशी तू. - एवढी कशी अशी खर्चाळू कैदाशीण, खर्चले सारे, तरी माझ्याशी भांडशी तू. - साठवू मी किती तुला? म्हणतेस आणिक मी जाता,चांदण्या मोजीत जगशील तू.

प्रतिक्रिया द्या
1934 वाचन

💬 प्रतिसाद (3)

मस्त मस्त.

चित्रगुप्त
Tue, 02/21/2023 - 23:33 नवीन
ये चीज बडी है मस्त मस्त.
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Wed, 02/22/2023 - 06:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments

:) :)

Bhakti
Wed, 02/22/2023 - 06:46 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा