गंधीत आठवणी
साधारण एप्रिल-मे महीन्यात परीक्षा आटोपत्या आलेल्या आणि सुटीची आतुरता लागलेली असायची. उन्हाळ्याच्या उकाड्यासोबतच सगळीकसे हवा कशी मोकळी वहात असे. अधुन मधुन घामाळलेल्या अंगावरुन एखादी हवेची झुळूक गेली की काय तो आनंद व्हायचा. पडवीत असलेले कडुलिंबाचे झाड उन्हाची दाहकता बर्याच अंशी कमी करायचे. आम्ही गल्लीतील सगळी मुले ह्या झाडाखालीच खेळायचो. उन्हाळ्याच्या त्या दिवसांचा गावाकडचा विशिष्ट असा गंध आजही माझ्या लक्षात आहे. उन्हाळा आला कि आजही मला तो गंध सुटीची आतुरता देऊन जातो. सुटीमधे चाखायला मिळणारे आंबे, कैरी यांचेही विशिष्ट वास मनात घर करुन आहेत.
आमच्या शेजारी सुतारकाम चालायचे आणि ते मी बर्याच वेळा न्याहळत रहायचो. मला त्या कामाचं खुप आकर्षण होतं. प्रत्येक लाकडाचा विशिष्ट असा वास. त्यात लाकुड ओले असेल तर वेगळा आणि कोरडे असेल तर वेगळा वास. आजही कधी मी लाकडाच्या वखारीकडुन किंवा सुतारकाम चालु असेल तेथुन गेलो तर मला तो जुना काळ आठवतो. आमच्या शेतात गायींचा गोठा होता, त्या गोठ्याचाही विशिष्ट असा वास माझ्या लक्षात आहे.
आपल्या आठवणींची जी टाईमलाईन असेल त्या टाईमलाईनवर दृश्य आठवणींसोबत ह्या गंधीत आठवणीही कोरल्या जातात हे नक्की. तुम्हाच्याकडेही अशा विशिष्ट गंधीत आठवणी असतील तर जरुर सांगा. तुम्हालाही विशिष्ट गंधासोबत विशिष्ट असा काळ आठवतो किंवा त्या काळात गेल्याचा भास होतो का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला!!
अगदी शंभर टक्के..
आठवणींना आपण समजतो तेवढे
अत्तर
हां तर एकदा ह्या अत्तराच्या
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plusहरीशृंगार म्हणजेच पारिजातक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||लहानपणी रेल्वे प्रवासाचे आणि
https://www.misalpav.com/node
पिवळ्या साबणाचा वास
मोती साबण आणि दिवाळी
गंध या विषयावरील हा लेख