Skip to main content

क्षुल्लक

लेखक जागु यांनी मंगळवार, 05/05/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या सामर्थी थेंबा-थेंबाची उसळण, थेंबाच्या बळावर महासागराचे विशालपण ! घराच्या बळकटपणी पायाचं खोल रुतणं, सजिव, निर्जिव भार पेलत घराचं छप्परही सजलेलं चंदनाचे महानपणी सहाणेचं झिजणं, उगाळताना खड्डा सोसून चंदनाचे गुणं टिकवलेलं ! क्षुल्लक गोष्टीतही विसावलं थोरपण, थोरपण जपण्यासाठी जपाव जाणिवेचं उदारपण !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1434
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

किती सहजपणे किती मोठं तत्वज्ञान सांगून जातेस जागु! खूप सुन्दर आहे कविता. क्षुल्लक गोष्टीतही विसावलं थोरपण, थोरपण जपण्यासाठी जपाव जाणिवेचं उदारपण ! या ओळी अगदी सही! क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com