संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणुन म्हटले जरा लांबवर फिरायला जावे. कौतुकाने कोथरुडच्या वेताळ टेकडी/परमहंस्/ए आर ए आय टेकडीवर फिरायला गेलो. बरीच मंडळी वरच्या दिशेने चढत होती. चढावर तुरळक झाडी होती. पण म्हटले सध्या हिवाळा आहे, पावसाळ्यात पुन्हा हिरवेगार होईलच की. वर जाऊन भिंतीपलीकडे गेलो मात्र सगळी कडे धूर पसरलेला दिसत होता. कोथरुड कचरा डेपो एका बाजुला असल्याने पहीले वाटले त्याचा- धूर असावा. पण नाही, पुढे गेल्यावर लक्षात आले की काही हौशी थेरडे मुद्दाम थिकठिकाणी गवत एकत्र करुन जाळत होते. विचारले का? तर म्हणे आम्ही ईथे खूप झाडे लावली आहेत, ती जागा मोकळी व्हावी म्हणुन. पण आमचे "कंट्रोल्ड बर्निंग " असते म्हणे. म्हणाजे काय? त्यांनाच ठावे. त्या धगीपासुन कशीतरी सुटका मिळवुन पुढे गेलो तर जागोजागी हीच परिस्थिती.
गवताचे पट्टे च्या पट्टे जाळलेले, धुमसत असलेले. त्यात किती किडे ,मुंग्या, अळ्या मरुन गेले/गेल्या असतील पत्ताच नाही. अजुन पुढे जे सी बी ने काहीतरी खोदकाम चालु होते, त्याला विचारले हे काय काम बाबा? तर म्हणे ही पुर्वीची परदेशी झाडे खुप वाढलीत, ती उपटुन त्या जागी देशी झाडे लावायची आहेत.
या उद्योगात चांगली दम धरलेली झाडेही हाळ लागुन जळत आहेत.
एक बाजु मागच्या काही वर्षात मेट्रोच्या डेपोने खाल्लीच आहे, अक्षरशः त्या बाजुचा लचका तोडलाय. पावसाळ्यात लँड स्लाईड होण्याची दाट शक्यता.
दुसर्या बाजुने बंगल्यांची कुंपणे वरपर्यंत सरकत आली आहेत. थोडक्यात काय? टेकडी जणु काही अखेरच्या घटका मोजतेय. आपल्या मुलांसठी कदाचित तिचे फोटोच शिल्लक असतील, असा विचार करुन काही फोटो काढले आणि खिन्न मनाने खाली आलो. (समाप्त)
वाचने
3216
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसर्या बाजुने बंगल्यांची
खंत
तिथं स्थानिक नसलेल्या
कन्ट्रोल्ड बर्निंग
ती टेकडी बहुतेक हिंजवडी
In reply to कन्ट्रोल्ड बर्निंग by हणमंतअण्णा शंक…
पानगळ झालेल्या झाडांना सुकली