Skip to main content

सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

लेखक मदनबाण यांनी रविवार, 31/07/2022 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो. आज जरा डोळ्याची सूज कमी झाली आणि मघाशी मुविंचा प्रतिसाद वाचला त्यांनी माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना फाॅरेस्ट गम्पचा उल्लेख केला आहे.कराचीवुड मधील खानावळीतील एक असलेला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे हे जेव्हा मला समजले होते तेव्हाच फाॅरेस्ट गम्प बद्धल देखील अर्थातच कळले होते,पण तो मी वेळ मिळेल तेव्हा पाहु किंवा आरामात पाहु असा विचार करुन ठेवला होता. मधल्या काळात काही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहिल्या आहेत पण फाॅरेस्ट गम्पचा पाहण्याचा मुहुर्त मुविंच्या प्रतिसादामुळे निघालाच शेवटी ! हा चित्रपट अतिशय सुंदर आहे... ६ अ‍ॅकॅडमी / ऑस्कर पुरसकार मिळालेला हा चित्रपट काळजात उतरणारा आणि मनाला भिडणारा असुन हा चित्रपट पाहणे हा एक उत्तम अनुभुती आहे असे म्हणायला हवे. या चित्रपटातील ३ संवाद मला फार आवडले.खरं तर हे निवडणे देखील कठीण, पण माझ्या मनाला विशेष आवडले म्हणुन ते इथे देत आहे. "Well, I happen to believe you make your own destiny. You have to do the best with what god gave you." " Life is a box of chocolates,Forrest. You never know what you're gonna get.'" "My Mama always said, you got to put the past behind you before you can move on." या चित्रपटाच्या ट्रेलर मधुनच या चित्रपटा बद्धलची कल्पना येते. मी यावर अधिक काही लिहणार नसुन इतकेच सांगेन बर्‍याच काळाने मला एक उत्तम अमेरिकन चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले आहे. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23706
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नृत्य आणि शेती यांत कार्यरत चतुरस्त्र !

गेल्या रविवारी परेश मोकाशी यांचा मराठी चित्रपट 'वाळवी' पाहिला आणि अपेक्षेप्रमाणे धमाल होता, फक्त २ तासाचा आहे WFM आहे.

हलकं फुलकं, नवे चेहरे. एकंदरीत मला आवडले.

दत्तक मूल या विषयाची सुरेख हाताळणी

नेटफ्लिक्स वर " वध ", संजय मिश्रा आणि नीना गुप्ता ... "आंखो देखी" मधला परस्थितीने वैतागलेला मध्यमवर्गीय बाप किंवा मिर्झापूर मधील गावातील सरळ आयुष्य जगणारा वकील पांडे ... यांची आठवण झाली .. नीना गुप्ता यानं त्यांच्या वयाला आणि आवाज / देहयष्टी ला शोभनार्या अशा छान भूमिका मिळत आहेत , पंचायत मधील मंजुदेवी , किंवा "बधाई हो" मधील आई ...

2019 चा डोंबिवली रिटर्न (प्रमुख भूमिका संदीप कुलकर्णी) हा पाहिला. पूर्वार्ध ठीक आहे; उत्तरार्ध भरकटलेला. मुळात पूर्वीच्या डोंबिवली फास्टशी याचा काही संबंध नाही. पूर्ण वेगळ्या धर्तीवरची कथा आहे. एक पापभीरु मध्यमवर्गीय, भाई- दादा आणि राजकारणी यांच्या नादी लागून भराभर श्रीमंत होत जातो आणि अखेरीस त्याचे पूर्ण पतन होते हा सारांश. हॉटस्टारवर आहे