Skip to main content

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी सोमवार, 30/01/2023 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली. https://hindenburgresearch.com/adani/ Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती. The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies. एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते. मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया. निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!

वाचने 65319
प्रतिक्रिया 273

प्रतिक्रिया

हे कधी ना कधी घडणारच होते. भारत आहे शेवटी समाजवादी + साम्यवादी प्रकारचा देश जिथे सर्व शेंड्या शेवटी सरकारच्या आणि बाबू लोकांच्या हाती असतात. अंबानींना तोड म्हणून हिरेन जोशी आणि मोदी ह्यांनी अडाणी ह्यांना उभे केले. अडाणी अंबानी ह्यांच्या इतके चतुर नाहीत. आता हा सर्व डामडोल कोसळणार आहेच. हिडेनबर्ग फक्त निमित्त मात्र आहे. आता माझ्यावरील हल्ला हा देशावरील हल्ला म्हणून जो बचाव अडाणी ह्यांनी निर्माण केला आहे त्यावरूनच त्यांची नियत साफ दिसत आहे. भक्त आणि सतरंजी वाले आता "राष्ट्रप्रेमी लोकांनी किमान ५००० कारच करून अडाणी ह्यांचे समभाग विकत घेऊन राष्ट्रनिर्मितीस हातभार लावावा" असल्या बाता करतील. अडाणी हे रशियन तेल आणण्यास पोर्ट देतात म्हणून नाटो, झेलेन्स्की आणि बायडन ह्यांची हि अँटी विश्वगुरू चाल आहे अशीही घोषणा होईलच. अडाणी वर बोट उचलायची कुणाचीच हिम्मत नाही. अडाणी ह्यांच्यावर जास्त लिहीणार्या मंडळींना थेट हिरेन जोशी कडून फोन येतो आणि मग सर्व काही थंडावते. त्यामुळे आपले लोक हाताची घडी तोंडावर बोट घालून रामचरितमानस ह्याच विषयाचा किस पाडत राहतील.

अदानी एंटरप्रायजेस लि. च्या २७ ते ३१ जनेवारी पर्यंत सुरु असणार्या एफपीओत गुंतवणुक करण्याचा विचार आता रद्द केला आहे! अंबानींवर विश्वास आहे पण अदानींवर नाही!!

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचा PE रेशो १०० पेक्षा खूपच जास्त असल्याने ह्यात गुंतवणूक करणे धोकादायक वाटते. १) अदानी टोटल गॅस ७९१ २) अदानी ग्रीन एनर्जी ७५८ ३) अदानी ट्रान्समिशन ४५१ ४) अदानी इंटरप्राइस ४०४ ५) अदानी विल्मर ११४ कोणीतरी manipulation केल्याशिवाय इतका बाजारभाव वाढणे कठीण आहे.

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपले शेठ किंवा मोदी सरकार असे शीर्षक पाहिजे होते,असे वाटले. बाकी सविस्तर दळन सायंकाळी टाकतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अडाणीच्या कंपन्यत एलआयसी ची गुंतवणूक 2010 ची आहे. बँकांची गुंतवणूक ही वीस ते स्वतःच्या पूर्वीची असेल. मोदी शीट आल्यानंतर बँका मोठ्या कंपन्यात गुंतवणूक कमी करत आहेत. आरटीआय करून तथ्य पडताळून पाहू शकतात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अडाणीच्या कंपन्यत एलआयसी ची गुंतवणूक 2010 ची आहे. बँकांची गुंतवणूक ही वीस ते स्वतःच्या पूर्वीची असेल. मोदी शीट आल्यानंतर बँका मोठ्या कंपन्यात गुंतवणूक कमी करत आहेत. आरटीआय करून तथ्य पडताळून पाहू शकतात.

In reply to by विवेकपटाईत

लिहताना चूक झाली. वीज अचानक गेली. चूक दुरुस्त करण्याआधी.बँकांची गुंतवणूक २०१४ पूर्वीची. मोदी शेट असे वाचावे.

काही ठळक जाणवणाऱ्या गोष्टी अशा:
  • या प्रकाराला अजूनही कोणी भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही
  • २०१४ पूर्वी उठसूट कुठल्याही गोष्टीला काँग्रेसची नीती आणि भ्रष्टाचार कसा जबाबदार आहे हे सांगणारे सर्वजण व्यवस्थित मुग गिळून गप्प आहेत
सरते शेवटी, भाजपानंतर सत्ता पालट होईल तेव्हा मुस्लिमांना कसं ठेचलं या आनंदाखेरीज सामान्य माणसाच्या हाती काहीही लागलेलं नसणार.

या प्रकाराला अजूनही कोणी भ्रष्टाचार म्हणायला तयार नाही
इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे होईल! सत्य बाहेर यायला थोडी वाट पहावी लागेल!!

"इतक्यात निष्कर्षाप्रत येणे घाईचे होईल! " घाई? "Since Mr Modi came into office, Mr Adani’s net worth has increased by about 230 per cent to more than $26bn as he won government tenders and built infrastructure projects across the country." अडिच वर्षपुर्वी अदानींचा उल्लेख "मोदींचा रॉकफेलर' असा झाला होता. पंतप्रधान झाल्यावर मोदीना अहमदाबादहून दिल्लिला नेण्यासाठी खास विमान होते, ते अदानींचेच होते. अनेक देशांत असलेली शेल खाती, त्यातुन होणारे व्यवहार, ह्याची कल्पना पंतप्रधान,ई.डी.,अर्थखाते.. कोणालाच नव्हती असे मानणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे. अर्थात अदानींची फक्त मोदींशी जवळीक आहे असे नाही. काही महिन्यापुर्वी, रोहित(पार्थ) पवार गौतम अदानीना आणण्यासाठी विमानतळावर स्वतः गाडी चालवत गेले होते. १/२ काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांच्या मुला/मुलींच्या विवाह प्रसंगी गौतम अदानींनी हजेरीही लावली होती. मध्यंतरी शरद पवार ह्यांनी अहमदाबादमधील एका फार्म हाउसवर अदानी ह्यांची गुप्त भेट घेतली होती."शाहु फुले आंबेडकरांचे नाव घेउन पत्रकारिता करणार्या आपल्या मराठी पत्रकारांनी पवारांना ह्याबद्दल कधी विचारले की नाही? हे कळायला मार्ग नाही. adani https://www.ft.com/content/474706d6-1243-4f1e-b365-891d4c5d528b अदानी ग्रूपचा एकंदरित प्रभाव पाहता "व्यापक राष्ट्रहित लक्षात घेउन आम्ही मोदींच्या पाठीशी आहोत" असे विधान सर्व पक्षांच्या नेत्यानी केले तर आश्चर्य नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अदानी ग्रूपचा एकंदरित प्रभाव पाहता "व्यापक राष्ट्रहित लक्षात घेउन आम्ही मोदींच्या पाठीशी आहोत" असे विधान सर्व पक्षांच्या नेत्यानी केले तर आश्चर्य नाही.
सगळ्यात भारी. नंबर वन. -दिलीप बिरुटे

१. काही जण म्हणत आहेत की अदानी कधीतरी अडचणीत येणारच होते, त्यानी प्रचंड कर्जे घेतली आहेत, मुख्यतः एल आय सी आणि एस बी आय कडुन(कारण त्या सरकारी तिजोर्‍या आहेत, त्यामुळे सरकारच्या दबावाखाली पैसे गुंतवावे लागले). हिंडेन्बर्गचे केवळ निमित्त झाले. २. दुसरे मत असे की हिंडेनबर्ग ही याच कामासाठी प्रसिद्ध आहे, भरपूर माहिती गोळा करायची,मग त्या शेअर्स वर पैसे लावायचे, आणि मग असे अहवाल प्रसिद्ध करुन तो शेअर शॉर्ट करुन त्यतुन प्रचंड नफा कमवायचा. ३. काही जणांचे मत आहे की अदानीची परिस्थिती काही ईतकी वाईट नाही (डेत्/इक्विटी रेशो ०.८८ आहे, अर्निंग पर शेअर १० च्या आसपास). खालील दुवा बघा लेख शिवाय आज सकाळपासुन अदानी एंटरप्राईझ च्या शेअर्सने घसरण थांबवुन पुन्हा थोडी रिकवरी केली आहे. थोडक्यात वेट अँड वॉच. बाकी देशभक्ती वगैरे सब बकवास.

याच प्रकाराला का, 'एका' आततायी निर्णयाला विरोधकांनी केवळ तुघलकी म्हणून त्यातल्या भ्रष्टाचारातले गांभीर्यही घालवले आहे. तो निर्णय कोणता हेही जाणकारांनी ओळखावे काही फॅक्चुअल बिंदू मांडतो. ते बिंदू जोडून काही चित्र तयार होते का ते पाहायचे. अर्थात हे बिंदू सत्य आहेत. पण ते जोडून तयार होणारे चित्र सत्यच असेल असे नाही. किंबहुना ती जबाबदारी चित्र जोडणार्‍या माणसाची आहे. १. पूर्वाश्रमीचा एक स्टॉक ब्रोकर / ट्रेडर २. गृहमंत्री ३. केतन पारीख याचा वकील ४. अर्थमंत्री ५. या निर्णयाची माहिती असणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे लोक ६. शॉर्ट करणे विशेषतः फ्युचर्स ८. ज्या निर्णयाची माहिती अगदी मोजक्या लोकांनाच आहे तो घेतल्यानंतर/जाहीर केल्यानंतर प्रचंड कोसळलेले शेअर मार्केट

सरकारें ‘उद्योगस्नेही’ असतातच. पण माल्या काळात बराच (कु)प्रसिध्द झालेला तो जयसुखभाई (मोरबी पूल फ़ेम) अजून सापडलाय का? माध्यमे यावर आता काही बोला नाहीत. शेवटी आपण सामान्य माणसे कुणाच्या खिसगणतीसही नस्तों हेच खरे.

गौतम अदानी यांनी ज्या गरीबीतून हे सगळं उभं केलं त्याला तोड नाही. वय वर्ष वीस, वडीलांनी दिलेले शंभर रुपये आणि नातेवाईकांच्या पत्त्यावर मुंबैला पोहचलेले अदानी हीरे बाजारातून ब्रोकर झाले. गुजराती गोड बोलतात. आपण त्यांच्यावर भाळतो आणि मग आपण आता खपलो ही स्थिती यायला बराच वर्षाचा कालावधी लागतो. सुरुवात झाली आहे. ''गुजरात दंगलीनंतर गुजरात राज्यात काय देशातही नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल वातावरण नव्हतं. अशावेळी मोदींनी उद्योगधंद्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन 2002 मध्ये केलं तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचाच निर्णय घेतला होता. एक प्रकारेमोदी राजवटीला निषेध करण्याचा तो प्रकार होता. शिवाय नुकतीच दंगल उसळलेल्या भागात गुंतवणूक करणं किफायतशीर कसं ठरेल हा विचारही उद्योजकांच्या मनात असावा. पण, अशा प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी उद्योजकांच्या गटाला गुजरातमध्येच गुंतवणूक करण्यासाठी पटवलं. इथंही त्यांच्या वाटाघाटींचं वकुब कामी आलं. आणि अदानी उद्योग समुहाच्या वतीने स्वत:ही राज्यात भरीव गुंतवणूक केली. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच मुंद्रा बंदर चालवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं. आणि उर्जा क्षेत्रातही त्यांचा जम बसला. एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या औद्योगिक रणनितीवर अडाणी यांनी दाखवलेल्या विश्वासाचीच ही परतफेड होती. पुढे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नवी दिल्लीत गेल्यावर हे संबंध आणखी दृढ झाले हे वेगळं सांगायला नको. 2014 नंतर म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर अडाणी यांची संपत्ती अक्षरश: शतपटीने वाढली. 2008 मध्ये त्यांचं औद्योगिक साम्राज्य 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं, ते 2021 मध्ये 78 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचलंय. केवळ दहा वर्षांत आणि त्यातही शेवटच्या सहा वर्षांत गौतम अदानी यांनी मारलेली ही मोठी मजल म्हणूनच टीकेचं लक्ष्य ठरते आहे. सरकारशी असलेल्या जवळीकीचा उद्योगधंद्यांमध्ये वापर - 2018मध्ये केंद्रसरकारने 6 आंतरराष्ट्रीय विमानतळांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी निविदा सुद्धा काढल्या. पण, त्या काढताना पूर्वी असलेली अशा कामांचा पूर्वानुभव असण्याची अट यावेळी काढून टाकण्यात आली.जेव्हा कंत्राटाची घोषणा झाली तेव्हा अशा कामाचा कुठलाही अनुभव नसलेल्या अदानी उद्योग समुहाला त्रिवेंद्रम विमानतळाच्या देखभालीचं कंत्राट मिळालं. जी वर दिलेली अट शिथिल करण्यात आली होती, ती अदानींना फायदा मिळावा यासाठीच शिथिल झाली असा आरोप मीडियामध्ये झाला. त्रिवेंद्रममध्ये यावरून डाव्या पक्षांनी मोर्चेही काढले होते. फक्त त्रिवेंद्रमच नाही तर इतर पाच विमानतळांची कंत्राटही अदानी यांनाच मिळाली''. ( सर्व माहिती वृत बीबीसी न्यूजवरुन साभार ) आणि मग सर्व प्रवास पाहता अदानी जगातले तिस-या क्रमांकाचे श्रीमंत झाले आणि आता हिंडेनरिसर्चचा रिपोर्ट आला. मात्र हा भ्रष्टाचार कसा नाही, हे सांगायला मीडिया आणि अनुयायी कामाला लागले आहेत. आता दररोज आपल्या वाट्सॅपवर अदानी कसा देव माणूस आहे, आणि त्याला परदेशातील लोक कसे बदनाम करीत आहेत असे सुरु होईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदींनी उद्योगधंद्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन 2002 मध्ये केलं तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचाच निर्णय घेतला होता. एक प्रकारेमोदी राजवटीला निषेध करण्याचा तो प्रकार होता हे संशीधन आपण कुठल्या विद्यापीठातून मिळवलंय? VIBRANT GUJRAT हे दोन वर्षातून होणार मेळावा पहिल्यांदा २००३ साली झाला आणि त्यात फिक्की ने पाठ फिरवलेली नव्हती तर फिक्की हि संघटना आयोजनात अग्रेसर होती. Global Investors Summit (28 September to 2 October 2003) organized at the two major commercial cities of the State–Ahmedabad and Surat in association with the Government of India, United Nations Industrial Development Organization (UNIDO), Federation of Indian Chambers of Commerce & Industry (FICCI) & CII. https://en.wikipedia.org/wiki/Vibrant_Gujarat दुसरीकडचं इकडे ढकलण्या अगोदर थोडा मूलभूत शोध तरी घेत जा अशी विनंती आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समजून घेणे याचा दर्जा लैच खालावलाय बघा "बूंद से गयी वो हौद से नही आती" जाऊ द्या हो आपला अन्धद्वेष आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो म्हणून काळजी घ्या एवढाच सांगायचं आहे!

In reply to by सुबोध खरे

आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो म्हणून काळजी घ्या एवढाच सांगायचं आहे!
त्यांची विश्वासार्हता? खो खो खो. आता मिपावर संपादक नसताना उपसरमिपाचालकांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करून स्वतःच्या मतापेक्षा वेगळी मते असलेले प्रतिसाद परस्पर काढणार्‍या व्यक्तींची विश्वासार्हता? वाचूनच हसायला आले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

>>>>>मिपावर संपादक नसताना उपसरमिपाचालकांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करून... काहीही बरळु नका हो... असा कोणाचाही आयडी द्यायला मिपामालक आणि उपसरमिपाचालक रिकामे नाही. आवरा इतकेच म्हणेन...! -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

आपला अन्धद्वेष आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो म्हणून काळजी घ्या एवढाच सांगायचं आहे!
खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते. आणि अजुनही पडत नाही. श्री बिरुटेसरांचे हल्लीचे लेखन त्यांचा दर्जा आणि व्यक्तिमत्वशी सुसंगत नाही. त्यांची क्षमता, भुक आणि वाचन भरपुर आहे. जर त्यांनी वस्तुनिष्ठ लेखन केले तर सर्वांसाठी चांगले होईल. हा सरांना दिलेला टोला नाही. फक्त काळजी वाटते.

In reply to by Trump

खरे तर ह्या मारामारीत पडायचे नव्हते. पडु पण नका :=) तुमच्या आनि माझ्या वकुबाबाहेरचा विषय आहे :=):=):=)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> FICCI ने पाठ २००२ मधे पाठ फिरवली होती त्याबद्दल दुवा किंवा त्यांच्या साईटवर कोणती माहिती सापडत नाही. म्हणजे आधी तुम्ही धडधडीत खोटं बोललाय.

In reply to by mayu4u

@संपादक मंडळ, मालक, चालक आणि जे असतील ते पदाधिकारी... बिरुटेंचे हे असले पेड प्रचारकी थाटाचे खोटारडे लेखन उघडे पडून तीन चार दिवस उलटून गेले आहेत. बिरुटे इथे उत्तर देण्याकड़े सोयिस्कर दुर्लक्ष करून दुसरीकडे प्रचारकी लिखाण करण्यात व्यग्र आहेत.. यातून चुकीचा पायंडा पडतो आहे. उद्या याच प्रतिसादांचे रेफरन्स घेऊन / अशाच प्रकारचे लिखाण बघून सदस्यांनी एकमेकांवर खोटे वैयक्तिक आरोप केले तर मूळ जखमेवर मलमपट्टी न करता तेवढ्यापुरती कारवाई करणार का? की परत "मिपा खाजगी संस्थळ आहे" वगैरे नेहमीचे युक्तिवाद वाचायला मिळणार?

In reply to by मोदक

अर्रर्र.... सदरील माहिती बीबीसी न्यूज मराठीवरुन असे स्पष्ट सांगूनही आपलं काही समाधान झालेले दिसत नाही. पण, आपली कळकळ बघून आपल्यासाठी बीबीसी न्यूज मराठीचा दुवा देत आहे. मुद्दा क्रमांक तीन वर पहिल्या तीन ओळीत त्याबाबत उल्लेख केला आहे. आता ते चूक की बरोबर बीबीसी न्यूजला विचारले पाहिजे असे वाटते. बाकी कुठे उत्तर द्यावेत कुठे देऊ नयेत याचे मिपावर काही नियम आहेत असे आठवत नाहीत. पायंडे वगैरे असतील तर नक्की कळवावे. कोणी कुठे उत्तर द्यावीत यास कोणी बांधील नसतो असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा. म्हणजे हा दोष BBC चा आहे तर. ते खोटारडे लोकं आहेतच, तुम्ही स्वतः इतरत्र वाचू शकता ना? स्वतःची बुद्धी वापरून सारासार विचार करणेही फार अवघड नाहीये. तुम्ही येथे लिहिलेले खोटं आहे हे उघडकीस आल्यावर मूळ प्रतिसाद मागे घेणे, संपादक मंडळाला सांगून प्रतिक्रिया उडवणे काहीही करता आले असते.. हे न करण्यामागे काय मजबुरी होती? बाकी "कोणी कुठे उत्तर द्यावीत यास कोणी बांधील नसतो" हा युक्तिवाद फारच विनोदी आहे. अंधद्वेषाचा चष्मा डोळ्यावर चढवला की असे चार लोकांत हसे होते. तुमच्यावर उद्या कोणी वैयक्तिक आरोप केले आणि जबाबदारी अशीच झटकली तर काय करणार? हाच युक्तिवाद चालवून घेणार का?

In reply to by मोदक

>>> ते खोटारडे लोकं आहेतच, खरं बोलणारे फक्त या देशात भक्त उरले आहेत. >>> तुम्ही येथे लिहिलेले खोटं आहे हे उघडकीस आल्यावर मूळ प्रतिसाद मागे घेणे, संपादक मंडळाला सांगून प्रतिक्रिया उडवणे काहीही करता आले असते.. हे न करण्यामागे काय मजबुरी होती? काहीही. मोदी अदानीच्या संबंध सिद्ध होत नसले तरी, जगजाहीर आहेत. फिक्कीने पाठ फिरवली हे वृत्तपत्रातलीच बातमी होती. >>>कोणी कुठे उत्तर द्यावीत यास कोणी बांधील नसतो कोणी कुठे उत्तरं द्यावीत आणि देऊ नयेत यासाठी कोणी बांधील नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका नावाजलेल्या जागतिक बातम्या देणाऱ्या संस्थेचा हवाला देऊन लिहिलं तर तुमची काय चूक? बातम्यांचं पोस्टमार्टेम,खरं खोटं तपासणारे लोक त्या बातमीतील भोंगळपणा उघड करतीलच. शिवाय बातम्या देणारे अर्धसत्य सांगतात किंवा त्याची एक बाजूच मांडतात. दुसरी बाजू ही दुसरं कुणीतरी देत असते. चालायचेच.

In reply to by कंजूस

कंजूसकाका, सध्या लिहिणे राहणे किती आवश्यक आहे ते लक्षात येते. पाठराखणीबद्दल तहेदिलसे शुक्रिया...! -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

एका नावाजलेल्या जागतिक बातम्या देणाऱ्या संस्थेचा हवाला देऊन लिहिलं तर तुमची काय चूक?
सहमत बीबीसी किवा इतर कोणत्याही देशी /विदेशी नावाजलेल्या वृत्तसंस्थेच्या वृत्तांचे संदर्भ मिपावरील चर्चेत देण्यास हरकत नसावी. संदर्भ देण्यापुर्वी सदर वृत्तांची शहानिशा करायला हवी अशी ही अपेक्षा अनाठायी आहे

In reply to by मोदक

फिफा नाही हो. फिक्की. प्राध्यापक आणि पोस्टमन या दोन कामांमध्ये जितका फरक आहे त्याहून जास्त फरक या दोन संस्थांमध्ये आहे.
त्याच न्यायाने मी तर म्हणतो ज्याने हिटलरला जर्मनीचा चॅन्सेलर नियुक्त केले त्याच्या रिपोर्टवर का विश्वास ठेवायचा?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या वृत्तपत्रातली? त्याची लिंक मिळेल का? FICCI ने पाठ २००२ मधे पाठ फिरवली होती त्याबद्दल दुवा किंवा त्यांच्या (बीबीसी) साईटवर कोणती माहिती सापडत नाही असं तुम्हीच म्हणालात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र.... सदरील माहिती बीबीसी न्यूज मराठीवरुन असे स्पष्ट सांगूनही आपलं काही समाधान झालेले दिसत नाही. पण, आपली कळकळ बघून आपल्यासाठी बीबीसी न्यूज मराठीचा दुवा देत आहे.
सर, तुम्ही तुमच्यावरच्या आरोपांच्या विरोधात अचूक दुवा दिलात हे छान केलंत. त्यात स्पष्ट शब्दांतच म्हंटलंय "अशावेळी मोदींनी उद्योगधंद्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन 2002 मध्ये केलं तेव्हा फिक्की या उद्योजकांच्या संघटनेनंही त्याकडे पाठ फिरवण्याचाच निर्णय घेतला होता." त्यामुळे खरंतर इतरांचं समाधान व्हायला हवं...
आता ते चूक की बरोबर बीबीसी न्यूजला विचारले पाहिजे असे वाटते.
अगदी सहमत...बीबीसीच्या (किंवा कोणत्याही वृत्तसंस्थेच्या) वृत्ताचा संदर्भ देण्यापुर्वी मिपाकरांनी इथे स्वतः शोधपत्रकारिता करायला हवी अशी अपेक्षा असू नये.. पण इतर कुणाला अशी शोधपत्रकारिता करायची असल्यास ते नक्कीच करु शकतात...

In reply to by सुबोध खरे

दुसरीकडचं इकडे ढकलण्या अगोदर थोडा मूलभूत शोध तरी घेत जा अशी विनंती आहे.
एकीकडे मोदी उद्योजक धार्जिणे आहेत, सूट बूट की सरकार वगैरे बोलायचे आणि दुसरीकडे परत उद्योजक मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यापासून फटकून वागायचे असेही बोलायचे. या दोन गोष्टींमध्ये विसंगती आहे याचाही पत्ता नाही. बादवे, जर मोदी मुख्यमंत्री असताना उद्योजक त्यांच्याशी फटकून वागायचे तर मग तिथपासून उद्योजकधार्जिणे मोदी हा बदल नक्की कोणत्या तारखेपासून सुरू झाला असावा? समजत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

2014 नंतर म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर अडाणी यांची संपत्ती अक्षरश: शतपटीने वाढली. 2008 मध्ये त्यांचं औद्योगिक साम्राज्य 8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं, ते 2021 मध्ये 78 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचलंय हायला बिरुटे सर तुम्हाला साधं चौथीचं गणित येईना झालंय काय? ८ अब्जांचे (२००८) १३ वर्षात ६८ अब्ज (२०२१) झाले हे फक्त साडे आठ पट आहे. (का तुमच्या उच्च मराठीत साडे आठ पट आणि शतपटीने एकच गणतात) म्हणजेच २०१४ नंतर तर अजूनच कमी वाढ आहे मग अक्षरशः शतपटीने कसं आणि कोणत्या आधारावर म्हणताय? बाकी गुंतागुंतीचं गणित म्हणायचं तर CAGR Compound Annual Growth Rate (CAGR) तर हि वाढ १८ टक्क्यापेक्षा कमी आहे. पण ते तुम्हाला झेपणार नाही असं वाटतंय. कारण जोवर तुम्ही द्वेषाचा चष्मा काढत नाही तोवर सारासार विचार आणि हिशेबात चुका या होणारच आहेत. नाही म्हणजे आमच्या समजून घेण्याच्याच दर्जा बद्दल आपण प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून हा उहापोह पहा पटतंय का?

रोचक धागा, स्फोटक विषय. याला कित्येक थर असणार ... थोडेफार उलगडतील बाकीचे गुप्त राहतील. सामान्य माणसांचे नुकसान झाले तरी त्यांना हात चोळत बसण्या शिवाय पर्याय नसणार. हे प्रकरण आणि आगामी निवडणुका विद्यमान सरकार आणि पंप्र चे भवितव्य बदलू शकतात. भारत जोडो मध्ये रागांचे थोडेफार हसू झाले तरी विरोधी एकजूट झाली तर रागांचे भविष्य उजळू शकते.

In reply to by चौथा कोनाडा

हे प्रकरण काही दिवसांतच थंड होईल. संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, देशाच्या शत्रूंशी जवळीक, जनतेवर अत्याचार, देशाच्या संरक्षणात ढिलाई, हिंदूंवर अन्याय अशी प्रकरणे जनतेला भावतात व विरोधी पक्षांनी ही प्रकरणे उचलून पेटवत ठेवली तर जनतेचे मत बदलून सरकार बदलते. अदानी प्रकरणात यापैकी काहीही झालेले दिसत नाही. उद्योगपती व सरकारचे साटंलोटं असतं हे जनतेला फार पूर्वीपासून माहिती आहे व त्यामुळे जनतेच्या मतात फरक पडत नाही. तस्मात् हे प्रकरण विद्यमान सरकारचे व पंतप्रधानाचे भवितव्य बदलण्याची सुतराम शक्यता नाही.

हे इतिहासात पाहिल्यास लक्षात येईल की पडेल ( डाऊन) परिस्थितीत हे घुसतात. नंतर विश्वास दाखवलेल्याची परतफेड आणि संबंध घट्ट करणे. यात जळण्यासारखे काय आहे? उद्योगांची समीक्षा करणाऱ्यांकडे आकडेमोड , मागील घटना यांची चिरफाड करणाऱ्या पुस्तकीपंडितांची फौज असते. पण त्यांच्या पद्धतीत विश्वास मोजायची काही सोय नसते.

In reply to by कंजूस

जळण्याचा प्रश्न नाही.गम्मत वाटते ती अर्थतज्ञ्/बुद्धिमंत/संपादकवर्गाची. एरवी एम बी ए/बी ई. झालेल्या मुलाना हे तज्ञ धडे देत असतात. 'वाचन वाढ्वा, स्टार्ट-अप प्रवर्तकांची भाषणे ऐका" असे सल्ले दिले जातात. मात्र पोकळ(शेल) खाते मॉरिशसमध्ये उघडुन कसा फायदा करुन घायचा हे आय आय एम च्या अभ्यासक्रमात शिकवले जाते का? कारण हेच अदानी व तत्सम आय आय एम्समध्ये भाषणे देण्यासाठी येतात. व देणग्याही देतात. तीन डझनाहुन अधिक पुस्तके लिहिणारे एक मराठी आय टी तज्ञ आहेत. अर्थशास्त्रातील त्यांचे ज्ञान कौतुकास्पद आहे. पण अदानी किंवा स्टार्ट-अपचे प्रवर्तक जुगाड कसा करतात ते मात्र कधी हे तज्ञ सांगत नाहीत. म्हणजे ह्या स्टार्ट-अपकडे कोणी गिर्हाईक नसते पण प्रवर्तकांची संपत्ती मात्र वाढत जात असते. अजुन तरी हे अर्थतज्ञ्/अर्थविश्लेषक हिंडेनबर्ग वरील अहवाल अभ्यासत असावेत. काही दिवस वाट पाहु आणि मग बघुया काय म्हणतात ते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

१) येथे कार्यालय स्थापा हा सल्ला उद्योजकांना द्यावा लागत नाही. २) आय आय एम च्या अभ्यासक्रमात शिकवले जाते ते धोरण राबवण्याऱ्या एमबीए लोकांसाठी असते. उद्योजकांसाठी नसते. अंबानीने पहिली गिरणी उघडताना जागेची चाचपणी केली महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये. महाराष्ट्र सरकारने फारशी उत्सुकता दाखवली नाही. तर गुजरात सरकारने वीज पाणी करबचतीची हमी दिली होती. मग नरोडा येथे सुरुवातीच्या दोन लाख भांडवलात रिलायन्स गिरणी सुरू झाली. (गुजरातमध्ये नवीन उद्योग जात आहेत ही ओरड आताच का होतेय?) याच वेळी बिरलाने एक असलेली गिरणी तीस लाखांचा घेतली. ३) उद्योजकांच्या धोरणांची चर्चा /समीक्षा दुसऱ्या उद्योजकाकडूनच झाली तर तथ्य विचारात घ्यायला पाहिजे. अर्थतज्ज्ञ हे झालेल्या घटनांवर गुऱ्हाळ सुरू करतात पण गुंतवणूकदार तिकडे दुर्लक्ष करतात कारण ते चिंटुकले उद्योजकच असतात.

हिंडेनबर्ग च्या रिपोर्टमधे नवीन काही नाही. जी जोखीम लोकांना माहित होती ती आकड्यात मांडली. शेअर बाजारात गुंतवणुक करणाऱ्यांना अदाणी मधे गुंतवणुक करणे जोखीमीचे आहे हे माहित होते. वर आग्या१९९० यांनी P/E विषयी लिहिले आहे, ते बघितले तरी गुंतवणुक करताना धडकी भरेल. (अवाांतर २०२० मधे Tesla चा P/E १००० च्या वर होता. ) असे असूनही लोक गुंतवणुक करत होते, काहींना जोखीम आवडते पण कधी फसते सुद्धा. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यात लोक जोखीम म्हणून पैसे गुंतवतात . Float ५ ते १० टक्केच्या च्या आसपास आहे. गुंतवणुक करणाऱ्या FII ची वेबसाईट पण नाही याविषयी मागे ट्विट आले होते. बहुतेक गुंतवणुकदार पैसे गुंतवुन आता बाहेर पडले असतील. LIC ने गुंतवणुक का केली हा प्रश्न आहे. व्यवसाय म्हणून विचार केला तर अदाणी पोर्टचा व्यवसाय आजही चांगला आहे पुढेही कदाचित राहिल. सध्या Valuation खूप जास्त वाटते. Total ने अदाणी गॅसमधे गुंतवणुक केली तरी मला त्यात शंका आहे कितपत पुढे जाईल. परत तेच Valuation जास्त. भारतात पाइप गॅसचे जाळे वाढणार आहे हे मात्र खरे आहे. बाकी व्यवसाय मला कधी कळले नाही. हिंडेनबर्गने अदाणी FPO च्या आधीच हा रिपोर्ट का दिला हा प्रश्न देखील आहेच. तसे ते कधीही देऊ शकतात पण आताच का. आज परत शेअर वर गेले.

अदानी धुतल्या तांदुळासारखे नाहीत हे स्पष्टच आहे परंतु बरोबर एफ पी ओ च्या जरासा अगोदरच हिंडेनबर्गचा अहवाल आला यात नक्कीच काळंबेरं आहे यात पण शंका नाही. बाकी डाव्या लोकांना उद्योजकांबद्दल मत्सर वाटतो हि जगजाहीर गोष्ट आहे. पूर्वी टाटा बिर्ला होते आता अदानी अंबानी आहेत. त्यांची मूळ वृत्तीच खेकडयाची आहे. जगात कुणीच श्रीमंत होऊ नये सर्वानी गरीब राहावे अशीच दळभद्री मनोवृत्ती डाव्या लोकांची असते. अदानी समूहाची नेत्रदीपक प्रगती बऱ्याच लोकांच्या डोळ्यात खुपते आहे. यात १) काही लोकांनी अदानी समूहाचे समभाग वेळेत घेतले नाहीत आणि आता उशीर झाला आहे यामुळे मत्सर वाटतो आहे २) काही लोकाना केवळ अदानी श्रीमंत होत आहेत म्हणून जळजळ होते आहे. ३) काही लोकाना केवळ अदानी गुजराती आहेत (आणि श्री मोदी गुजराती आहेत) म्हणून मत्सर वाटतो आहे. पण सरदार पटेल आणि महात्मा गांधी हे सुद्धा गुजरातीच होते ४) उद्योजकांचा मत्सर करणे हे तर डाव्या आणि कम्युनिस्ट लोकांचे तत्त्वज्ञानच आहे. सत्य काय ते बाहेर येईल (कदाचित नाही सुद्धा). पण तोवर लोकांची आंतरिक विचारसरणी मात्र उघडी पडते आहे हे पाहून करमणूक होते आहे. ता क :- माझ्याकडे अदानी किंवा अंबानी यांच्या कोणत्याही कंपनीचे कोणतेही समभाग नाहीत. मी ते न घेण्याचे कारण they are highly leveraged. त्यामुळे मला अदानी अंबानी बद्दल प्रेम नाही कि मत्सरही नाही.

In reply to by सुबोध खरे

अदानीचा घोटाळा उघडकीस आणणारे हिंडेनबर्ग हा डावा नाही. रिलायन्स ही highly leveraged कंपनी नसून अदानीच्या जवळजवळ सगळ्याच कंपन्या highly leveraged आहेत. १९९३ पासून मी रिलायन्स मध्ये गुंतवणूक करत आहे, आजही माझी ५० % पेक्षा अधिक गुंतवणूक रिलायन्समध्ये आहे. ज्या दिवशी रिलायन्समध्ये काही मोठा घोटाळा आढळेल त्या दिवशी स्टॉक एक्सचेंजला लोअर सर्किट लागेल. अदानी कंपनीचा एकही शेअर कधी विकत घेतला नाही. कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले.

In reply to by आग्या१९९०

कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले. हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले?

In reply to by सुबोध खरे

हिंडेनबर्गचे नक्की आक्षेप काय आहेत हे मी वाचलेले नाही आणि वाचून, समजून घेऊन त्यावर काही लिहावे इतका उत्साह आता तरी माझ्याकडे नाही. तरीही बातम्यांमध्ये आले आहे ते वाचल्यावर एक गोष्ट समजली नाही. हिंडेनबर्गचे आक्षेप खरे असतील किंवा नसतील किंवा प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा ते आक्षेप बरेच वाढवून सांगितले असतील या सगळ्या शक्यता आहेत. पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची कार्यपध्दती हीच असते. असा एखादा मुद्दा मिळाला (किंवा खरोखरचा मुद्दा नसला तरी काढून) की त्यावर धुराळा उडवायचा आणि शॉर्ट करून पैसे छापायचे. हिंडेनबर्गच्या आक्षेपांवर अडानी ग्रुपने ४१३ की कितीतरी पानांचे उत्तर दिले आहे अशी बातमी आली. तसेच अडानी ग्रुपवरील आक्षेप म्हणजे देशावरील हल्ला असेही त्यांनी म्हटले. त्यावर हिंडेनबर्गने अडानी ग्रुपवर (मराठी चॅनेल्सच्या भाषेत) पलटवार करताना म्हटले- "Draped In Indian Flag While Systematically Looting Indians" हे वक्तव्य प्रोफेशनल शॉर्ट्स करणार्‍यांचे नक्कीच वाटत नाही. असे लोक एखाद्या ग्रुप/कंपनीची अशी काहीतरी (खरी किंवा काल्पनिक) भानगड काढून धुराळा उडवतात आणि शॉर्ट पोझिशनवरून पैसे छापतात आणि चालू पडतात. असे आरोप केलेला कोणताही ग्रुप/कंपनी काहीतरी उत्तर देतेच/देणारच. असे लोक त्यावरही काहीही बोलत नाहीत कारण त्यांचा रस केवळ आणि केवळ पैसे छापण्यात असतो. अडानी काहीही बोलले अगदी देशावरील हल्ला आहे असे काही बोलले तरी प्रोफेशनल शॉर्टरना त्याचे घेणेदेणे असायचा खरं तर संबंध नसतो. त्याउपर "Draped In Indian Flag While Systematically Looting Indians" असे वक्तव्य त्यांनी द्यावे याची संगती कशी लावायची? म्हणजे स्वतः पैसे छापण्याबरोबरच आणखी कोणता अजेंडा यामागे आहे का? अन्यथा अडानी काहीही बोलले तरी भारतीय झेंडा आणि भारतीय जनतेची लूट वगैरे प्रोफेशनल शॉर्टवाल्यांचा अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी त्यांनी का बोलल्या असाव्यात? त्यातूनही कोणा भारतीयाने असे बोलणे समजू शकतो पण हिंडेनबर्गच्या तोंडी ही भाषा कशाकरता?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची कार्यपध्दती हीच असते. असा एखादा मुद्दा मिळाला (किंवा खरोखरचा मुद्दा नसला तरी काढून) की त्यावर धुराळा उडवायचा आणि शॉर्ट करून पैसे छापायचे. खरोखरच मुद्दा असूही शकतो ... आणि तो उगडकिला असताना शॉर्ट सेलर नि जर पैसे कमावले तर बिघडला ते काय ? त्यांच्यावर एक्सचेंज चे बारीक लक्ष असते

In reply to by चौकस२१२

खरोखरच मुद्दा असूही शकतो ... आणि तो उगडकिला असताना शॉर्ट सेलर नि जर पैसे कमावले तर बिघडला ते काय ?
मी कधी म्हटलं शॉर्टसेलर्सनी पैसे कमावले तर बिघडले? माझा मुद्दा आहे की ज्या कंपनीविरूध्द्/ग्रुपविरूध्द आक्षेप आणले आहेत त्या कंपनी/ग्रुपने उत्तर दिले तरी त्याची दखलही ते लोक घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचा उद्देश कंपनीशी तू तू मै मै करायचा नसतोच तर पैसे छापायचा असतो. पण या भानगडीत हिंडेनबर्गवाल्यांनी अडानीच्या उत्तराला नुसते प्रत्युत्तरच दिले असे नाही तर भारताचा झेंडा, भारतीय जनतेला लुटणे वगैरे प्रोफेशनल शॉर्टर कधीही न वापरणारी भाषा वापरत आहेत. हे नेहमीच्या प्रोफेशनल शॉर्टरपेक्षा वेगळे आहे. अमेरिकेत अ‍ॅन्ड्र्यू लेफ्ट (लेफ्ट हे त्याचे अडनाव आहे) हा असा मोठा प्रोफेशनल शॉर्टर आहे. हिंडेनबर्गने अडानीबरोबर जो प्रकार केला आहे तसा त्याने अमेरिकेत अनेक कंपन्यांबरोबर केला आहे. इतरही काही प्रोफेशनल शॉर्टर्स आहेत. त्यापैकी कोणी अशा कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणावर 'पलटवार' केला आहे असे मी तरी कधी बघितलेले नाही. दोन वर्षांपूर्वी गेमस्टॉपच्या शेअरमध्ये शॉर्ट सेलिंग करताना नंतर शॉर्ट स्क्विझ झाले आणि अ‍ॅन्ड्र्यू लेफ्टसह सगळ्या शॉर्टर्सची वाईट वाट लागली होती. त्या शॉर्ट सेलिंगची सुरवातही अ‍ॅन्ड्र्यू लेफ्टच्या कंपनीने लिहिलेल्या अशाच एका रिपोर्टमुळे झाली होती.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शॉर्टसेलर्स खोट्या बातम्या पिकवतात आणि स्वतः फायदा करून घेतात" असं त्यांच्यावर आरोप नेहमी केला जातो .... त्यातील फायदा करून घेतात हे बरोबर पण : खोट्या बातम्या" वैगरे जर केले तर त्यांना एक्सहचेन्ज आणि रेग्युलेटर कडून एक प्रकारच्या मार्केट मनुपुलेशन च्या आरोपांना सामोरे जावे लागते ... हे हि विसरू नका एवढेच माझे म्हणणे , म्हणजे तेवढे सोपे नाही आणि त्यानं प्रचंड धोका हि पत्करावा लागतो ... ( गेम्सटोप चे उद्धरण आपण दिले आहेतच ) खुल्या मार्केट मध्ये जसे एखाद्याला बुल बनण्याचा अधिकार आहे तसेच एखाद्याला बेअर बनण्याचा हि अधिकार आहेच कि जर नुसते मार्केट चढवले ( खोट्या बातम्या पसरून ) आणि पुढे नुसतीच हवा असेल तरी सुद्धा शेवटी विकत घेणाऱ्यांचे पुढे नुकसान होतेच कि ! अर्थात हे हि मान्य कि एक उद्योजक म्हणून अदानींना सर्व प्रकारे आपला उद्योग वाढवायचा हक्क आहे . असो अडानिंच्या बाबतीत अर्थात ते एक यशस्वी उद्योगपती असल्यामुळे त्यांचे वर जळणारे ( भारतात आणि बाहेर ) खूप आहेत .. मग त्यात कम्युनिष्टांपासून ते ऑस्ट्रेलयातील हिरवे ( अडाणी ऑस्ट्रेल्या खाणीला विरोध ) त्यामुळे साहजिकचाच या हिंडनबर्ग प्रकरणामुळे त्यांना आनंदाचं उकळ्या फुटत असतील ... त्यात " काहीच्या मते " सेठ बरोअबर ची मैत्री वैगरे नेहमीचे रडगाणे आहेच ( येथे सुबोब्ध खरे यांचं प्रतिसादाशी मी सहमत आहे ) जणूकाही आपले राष्ट्रपिता महान आत्मा गांधीजी यांनी कधीही श्रीमंत सेठ लोकांशी मैत्री केलीच नवहती? ( बिर्ला समूह ) दावे आणि अति दावे यांचा अश्या कोणत्याही उद्योगाला विरोध असतो याचे एक किळसवाणे उदाहरण मी बाहीतलेले म्हणजे अडानिंच्या खाण उद्योगाला ऑस्ट्रेल्यात बराच विरोध झाला त्यातील एक चीड आणणारे दृश्य म्हजे मागील वर्षी ऑस्ट्रेलयातील काही शहरातील नगरपालिकेने पुरस्कृत केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे सह पुरस्कृत अडानि होते तर त्यावेळी " थथाकथित शेतकरी आंदोलन ( छुपे डावे ) तिथे विरोधाचं घोषणा देत होते विशेषश करून जेव्हा अडानि ऑस्ट्रेल्या चे अधिकारी भाषनाला उभे राहिले तेव्हा ...

In reply to by सुबोध खरे

माझ्याकडे अदानी किंवा अंबानी यांच्या कोणत्याही कंपनीचे कोणतेही समभाग नाहीत. मी ते न घेण्याचे कारण they are highly leveraged. अदानीच्या कंपन्या आहेतच highly leveraged पण अम अंबानींच्या कंपन्या सुध्दा highly leveraged आहे ह्याला काही आधार?

In reply to by आग्या१९९०

धाकट्या अंबानींच्या नुसत्याच लिव्हरेज जास्त असलेल्या नव्हेत तर बुडीत सुद्धा आहेत.

ज ने यु किंवा चे गव्हेरा विद्यापीठातून कॉंगो मधील गोरिलांचे समाजजीवन यावर पी एच डी केलेले विचारजंत अगदी ताबडतोब या हिंडेनबर्ग चा अहवाल घेऊन अदानी वर तुटून पडले यात काय ते समजा. शेवटी भाग्य या गोष्टीचे अस्तित्व मान्य करणे का आवश्यक आहे कारण आपल्या नावडत्या माणसाला त्याच्या उत्कर्षाचें श्रेय देणे कसे शक्य आहे? why do you need to define luck? otherwise how can you justify success of a person you hate

बाकी अदानी यांच्या कंपन्यात गडबड झालेली नाही असा माझा कोणताही दावा नाही. किंवा हिंडेनबर्ग भारताच्या प्रगतीत खीळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या जागतिक कार्टेल/ षडयंत्राचा एक भाग आहे असे माझे मत अजिबात नाही. सरकारमधील लोकांच्या जवळीकीचा फायदा सर्वच उद्योजक घेत असतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. धीरूभाई अंबानी यांनी याचा भरपूर उपयोग करून घेतला आहे अर्थात त्या वेळेस काँग्रेसचेच सरकार होते. पण त्याबद्दल डाव्य लोकांना विविक्षित विस्मरण ( selective amnesia) होते अदानी हे त्याला अपवाद असतील असेही मला वाटत नाही. फक्त आता सरकार श्री मोदींचे आहे त्यामुळे या डाव्या लोकांना श्री मोदी याना दूषणे देण्यासाठी एक मुद्दा मिळाला (पुरावा नाही) आहे.

डाव्या विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणार हे उघड होते. अदानी ह्यांचे कष्ट्/उद्योगातील चतुराई हे कौतुकास्पद आहेच पण गेल्या काही वर्षात अनेक सरकारी कंत्राटे ही अदानी हे मोदी/शहा ह्यांच्या जवळचे आहेत म्हणूनच मिळाली हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात सरकारी मोठी कंत्राटे ही अशा पद्धतीनेच मिळतात हे सत्य आहे. मात्र हे होत असताना अदानी उद्योगसमूहाची विश्वासार्हता खूपच कमी झाली हेही नाकारता येत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब सरकारमधील लागे बांधे हे व्यवसाय वाढवण्यासाठी वापरले जातात हे जगभरातील सत्य आहे. त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. पण आता "आपले" सरकार नाही "त्यांचे" आहे म्हणून डाव्यांना उकळ्या फुटल्या आहेत. नऊ वर्षे झाली आहेत परंतु श्री मोदी यांच्या सरकारातील एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधकांना स्पष्टपणे बाहेर काढता आलेले नाही. राफेल बद्दल बराच भूभू: कार करून शेवटी श्री राहुल गांधी तोंडघशी पडले. मुळात न्यायालयात च नाही तर जनतेच्या न्यायालयात सुद्धा श्री मोदी याना व्यक्तिशः एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांना चिकटवता आलेला नाही हि त्यांची खरी पोटदुखी आहे. आणि पुढच्या निवडणुकीला जेमतेम १ वर्ष बाकी आहे. जी एस टी असो कि राफेल असो कि निश्चलनीकरण असो आणि त्यावरून कितीही रान उठवले तरी आजमितीला सामान्य माणूस श्री मोदी भ्रष्ट आहेत यावर विश्वास ठेवायला अजिबात तयार नाही. भले या गोष्टी त्यांना पटल्या नसतील

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>>गेल्या काही वर्षात अनेक सरकारी कंत्राटे ही अदानी हे मोदी/शहा ह्यांच्या जवळचे आहेत म्हणूनच मिळाली हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात सरकारी मोठी कंत्राटे ही अशा पद्धतीनेच मिळतात हे सत्य आहे. फक्त त्यांच्या व्यवहारांना भ्रष्टाचार म्हणायचा नाही. नियम शिथिल करुन कंत्राटे देणे, किंवा त्यांनाच देणे यात सरकारचा हेतु शुद्ध आणि केवळ सबका साथ सबका विकास इतकाच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२०१९ ला UAE च्या Seclink Technology Corporation (STC) ने धारावी पुनर्विकास प्रकल्प रू.२८५०० ची बोली लावून जिंकला होता. STC रेल्वेच्या अतिरिक्त जमिनीचाही विकास अधिक पैसे मोजून करायला तयार होती, तरीही त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने ते कंत्राट रद्द केले. २०२२ मध्ये STC ला ह्या प्रकल्पात भाग घेता येऊ नये अशा अटी सध्याच्या सरकारने टाकल्याने ५ हजार ६९ कोटी रुपयांची बोली लावून अदानी समुहाने हा प्रकल्प मिळवला. कुठे २८५०० कोटी आणि कुठे ५०६९ कोटी. असो चालायचेच.

In reply to by आग्या१९९०

कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले. हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले? उत्तराची अजून वाट पाहतो आहे

In reply to by सुबोध खरे

ह्याच धाग्यावरील सगळे प्रतिसाद नीट वाचा, सापडेल तुम्हाला उत्तर. चिकाटी सोडू नका उत्तर सापडेपर्यंत.