✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मनात माझ्या

क — किरण कुमार, Wed, 01/11/2023 - 18:24
तुझ्या बटांतून अवखळ वारा छेदित जातो सळसळ पाने मनात माझ्या तुझ्या ओठीचे अल्लड आणिक अचपळ गाणे नदी वळावी कटी पाहूनी ओठांवरती लाली नभाची मनात माझ्या कवेत घ्यावी मोहक मूर्ती तुझ्या तनाची फिकेच पडती सागर येथे इतुके चंचल नयनी पाणी मनात माझ्या खोल आतवर तुझ्या प्रीतीची अबोल वाणी सुरेख बांधा घट्ट कंचुकी पदर जरीचा त्यावर तारे मनात माझ्या चुंबून घ्यावे पाठीवरचे कोंदण प्यारे लाखेचे ते चढवूनी कांकण साद कशाला नुपूर पदांना मनात माझ्या इथे टिपावे तुझ्या खोडकर खेच अदांना घरा घरातून दर्प सुटावा देह तुझा की आहे अत्तर मनात माझ्या प्रश्न कितीसे तूच त्यावरी होशी उत्तर गाभाऱ्यातील देव मनाचे तुझ्या कांतीने उजळून जावे मनात माझ्या जगता जगता काव्य तुझ्यावर लिहून जावे - किरण कुमार

प्रतिक्रिया द्या
2176 वाचन

💬 प्रतिसाद (7)

होनाजी बाळा आठवले ....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 01/12/2023 - 09:59 नवीन
कांती नवनवतीची कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी जाईची रे वेल कवळी जाईची रे वेल कवळी दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी जशी चवळीची शेंग कवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात चालणं ग मोठ्या नखर्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं कविता भारीच शंकाच नाही.
  • Log in or register to post comments

छान आहे.

हेमंतकुमार
Fri, 01/27/2023 - 09:29 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

पद्मविभूषण

हेमंतकुमार
Fri, 01/27/2023 - 09:31 नवीन
डॉ. दिलीप महालनबीस यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.
  • Log in or register to post comments

क्षमस्व

हेमंतकुमार
Fri, 01/27/2023 - 09:31 नवीन
जागा चुकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वाह!

प्राची अश्विनी
Sun, 01/29/2023 - 11:20 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रांनो

किरण कुमार
Mon, 01/30/2023 - 14:17 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

काव्य आवडले.

कानडाऊ योगेशु
Tue, 01/31/2023 - 08:57 नवीन
काव्य आवडले. फक्त एक सुचवावेसे वाटते.
घरा घरातून दर्प सुटावा
च्या ऐवजी
घरा घरातून गंध सुटावा
असा बदल केला तर योग्य होईल असे वाटते. कारण दर्प हा शब्द उग्र वास ह्या साठी वापरला जातो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा