✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपला तो संस्कार, त्यांचा तो उर्मटपणा!

आ
आपला अभिजित यांनी
Tue, 05/05/2009 - 00:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2454 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

हाहा

सुवर्णमयी
Tue, 05/05/2009 - 03:40 नवीन
अशा अनुभवाशी नक्कीच चांगली परिचित आहे. आमच्याकडे असे प्रयोग मराठी शिकण्याकरता होतात, अ आ पासून वृत्तपत्रातील काही ठळक शब्द वाचण्यापर्यंत गेलेली गाडी आता फक्त स्वतःचे नाव वाचता येते इथवर आहे.. दिलेला प्रत्येक उपदेश, प्रत्येक वाक्य अंगावर उलटे कसे येते याचा पदोपदी अनुभव ही एक मस्त गोष्ट असते. सगळ्यांसमोर फजिती झाली तरी सुद्धा.. असे आणखी अनुभव येऊ द्या. - सोनाली
  • Log in or register to post comments

सध्या मी त्याच

संदीप चित्रे
Tue, 05/05/2009 - 08:36 नवीन
अनुभवांतून जातोय रे... माझ्या लेकाची (वय जवळपास चार वर्षे) खेळण्यातली तलवार पाच-सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडून चुकून मोडली होती. आज काहीतरी बोलताना त्या तलवारीचा विषय निघाला.. लेक म्हणाला, "ती तलवार तर मोडली.... तुझ्याकडून !" त्याला म्हटलं, "अरे, चुकून मोडली ती... मी मुद्दाम मोडली नव्हती." तर हा मला शांतपणे म्हणाला, 'दॅट्स ओके बाबा... ऍक्सिडंट्स हॅपन !" :) (अवांतरः नंतर समजलं की हे मिकी माऊसने शिकवलंय !)
  • Log in or register to post comments

छान

प्रकाश घाटपांडे
Tue, 05/05/2009 - 10:23 नवीन
मुलांकडुन शिकण्यासारख खुप काही असत. आनंद घारे सर एके ठिकाणी म्हणतात "थट्टा, मस्करी, किडिंग वगैरे करणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. अगदी एक शब्द सुद्धा बोलू न शकणारे मूलसुद्धा आपल्याला खिजवते आणि आपण बुद्दू बनलेले पाहून मिश्किलपणाने हसते हे मी पाहिले आहे. मग आपण सुद्धा त्याला 'बदमाश', 'डँबिस', 'शैतान' वगैरे उपाध्या कौतुकाने देतो..." ते अगदी पटते. मुले त्यांना नको असलेली गोष्ट टाळण्यासाठी / हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी छान छान क्लुप्त्या करतात.गोड गोड बोलुन आपल्याला घोळवतात.भुभुच पिल्लु घरात आणण्यासाठी गोड बोलताना आर्जव, लाघवीपणा,मिष्किलपणा इत्यादी सर्व भावनिक प्यादी वापरुन बुद्धीबळ खेळतात.
कधीतरी हेच आम्ही तिला ऐकवलेलं असतं. एखाद्या कामात असताना गोष्ट सांगण्यासाठी किंवा खेळण्यासाठी ती हट्टाला पेटल्यावर आम्ही तिला हेच वाक्‍य सुनावलेलं असतं. ते बरोब्बर लक्षात ठेवून त्याची सव्याज परतफेड ती आम्हाला अशा प्रसंगी करते.
जीवनातही असे टोमणे /कुजकटपणा/ खिल्लि ऐकावे /द्यावे लागतात पण त्यातुन आपण शिकत असतो. आपले तेच खर, आपल तेच योग्य या विचारसरणीतुन बाहेर पडायला भाग पाडतात. आपली ती स्ट्रॅटीजी इतरांची ती लबाडी आपला तो बाब्या इतरांच ते कार्ट आपला तो सहभाग इतरांची ती लुडबुड आपली ती प्रकृती इतरांची ती विकृती अशा अनेक मालिकांचे विचार आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

.... अशा अनेक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/05/2009 - 10:30 नवीन
.... अशा अनेक मालिकांचे विचार आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडतात. घाटपांडे काकांचा प्रतिसाद आवडला. अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत. आरसा दिसला की त्रास होतो, किमान तो आपल्याच मुलांनी दाखवला आहे याचा आणि त्यांना तेवढं डोकं आहे याचा आनंद मानायचा! आमचा शेजारी, पुरता तीन वर्षांचा नाही, पण असाच वागून नाकी नऊ आणतो. मला तो महिन्यातून दोन-तीन दिवसांच्यावर भेटत नाही त्यामुळे सध्यातरी मी त्याच्या हुशारीचं त्याच्या तोंडावर आणि मागेही कौतुक करण्याची स्ट्रॅटेजी ठेवली आहे. त्यामुळे मी काही सांगितलं की तो ऐकतो आणि त्याच्या गळी काही उतरवायचं असेल की त्याचे पालक माझं नाव बिनदिक्कत वापरतात. सध्यातरी शिस्त लावायला फार त्रास होत नाही आहे. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

असेच म्हणतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/05/2009 - 10:51 नवीन
अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच

स्वाती दिनेश
Tue, 05/05/2009 - 10:41 नवीन
अभिजित, लेख आणि लेक भारीच आहेत. :) अदितीसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

या छोकरीला

श्रावण मोडक
Tue, 05/05/2009 - 12:55 नवीन
भेटायचंय एकदा. ग्राफिटी लिहून आम्हाला कोड्यात टाकणाऱ्या अभिजितला गप्प करते म्हणजे काय? बापसे बेटी सवाईच!!! छान लिहिलंस.
  • Log in or register to post comments

आवडले

ऋषिकेश
Tue, 05/05/2009 - 13:33 नवीन
लेख, लेक दोन्हि आवडले अदितीसारखेच म्हणतो ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अभिजितदाल

परिकथेतील राजकुमार
Tue, 05/05/2009 - 13:43 नवीन
अभिजितदाला त्याचे बालपण डोळ्यासमोर येत असेल ;) मस्त लेखन. संस्कारी उर्मट ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा