पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2970
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
"कुच कुच होता है" एवढे समजले.
हा हा.
In reply to "कुच कुच होता है" एवढे समजले. by चित्रगुप्त
कुच कुच होता है
In reply to "कुच कुच होता है" एवढे समजले. by चित्रगुप्त
छान.
मस्त दिपक भौ,
मनःपूर्वक धन्यवाद.