आपल्या देशात जो आकाश कंदील लागतो तो चीनमधून येतो. ते चीनमधे एवढा स्वस्तात बनवतात कि इथे भारतात बनवलेल्या आकाशकंदीलापेक्षाही स्वस्तात देऊ शकतात.आपण भारतात बनवलेला आकाश कंदील जीएसटी वगैरे सगळे टॅक्स भरून ३०० रुपयात जो आकाशकंदील बनवतो तोच आकाशकंदील चायनामधून इथपर्यंत ट्रांसपोर्टेशन करूनसुद्धा तीनशेला बाजारात आणू शकतात. भारतात मॅन्युफॅक्चरिंग करुन विकायला आपल्याला साडेचारशे पाचशे रुपयांशिवाय पर्याय नसतो. भारतात बनवलेली वस्तू भारतातच विकायला साडे चारशे पाचशे रुपये खर्च येतो. चीनने मॅन्युफॅक्चरिंगवर वर्किंग केलं आणि आज जगामध्ये सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग चायना मध्ये होतं त्या खालोखाल लोकसंख्या आपल्या भारताची आहे पण आपण मॅन्युफॅक्चरिंग मधे जागतिक स्तरावर नाही. आपल्या देशात अजूनही राजकारण्यांच्याच हाणामार्या सुरु आहेत.
- संतोष पंडीत
वैचारिक किडा या चॅनलवरच्या एका चर्चेतल्या छोट्या भागाचा हा सारांश. मॅन्युफॅक्चरिंगवर चीनने काम केलं म्हणजे नक्की काय केलं? चीन वस्तू इतक्या स्वस्तात कसं बनवू शकतं? चिनी कामगारांना तिथले उद्योजक पगार देतात की नाही अशी शंका यावी इतक्या कमी किंमतीला चिनी वस्तू मिळतायत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तू फारच स्वस्तात उपलब्ध होतात ते चीनमुळेच! नॉन ब्रँडेडच नव्हे तर सोनी , सॅमसंग , अॅपल अशा टॉपच्या कंपन्याही त्यांचं बरचसं मॅन्युफॅक्चरिंग हे चीनमधून करुन घेतात.चिनी सरकारने नक्की अशी काय करामत केली हे एवढ्या स्वस्तात मिळू शकतं? यामुळे भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग उद्योगावर परिणाम होतो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ब्रँडचे मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प भारतात येत आहेत. यामुळे बदल घडेल का? इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग भारतात वाढेल का? चर्चा व्हावी.
वर्गीकरण
वाचने
2912
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
[[ चीन वस्तू इतक्या स्वस्तात
खरंच
In reply to [[ चीन वस्तू इतक्या स्वस्तात by चौथा कोनाडा
आठवड्यातील ६ दिवस रोज १२ तास
भारतातही काही वेगळी परिस्थीती
In reply to आठवड्यातील ६ दिवस रोज १२ तास by श्रीगुरुजी
चीन बदलला आहे.
बरोबर.
In reply to चीन बदलला आहे. by कंजूस
भारत आणि चीन सारखे बहुसंख्य
धन्यवाद
In reply to भारत आणि चीन सारखे बहुसंख्य by साहना
समाजवादाला भारतातली दोन राज्ये अजूनही चिकटून आहेत.
कामगारांचं भलं तरी झालं का ?
In reply to समाजवादाला भारतातली दोन राज्ये अजूनही चिकटून आहेत. by कंजूस