बालपण आणि भीती
मिपाकर मंडळी , आपण सगळे ज्याकडे डोळे लावून बसलोत तो दिवाळी अंक काही अजून अवतरला नाही. तोवर काही हलकेफुलके टीपी करावे म्हटले.
प्रत्येकाच्या बालपणात कसली ना कसली भीतीची आठवण असते. आमच्या बालपणी आजूबाजूला परिसरात झाडझाडोरा भरपूर असे. गल्ली ओलांडली की झाडी, नदीकाठ, दलदल, गवत, चिखल , पायवाटा यांची रेलचेल. एकटेदुकटे मूल त्यातून जायची पाळी आली तर दबकूनच असे. रात्री चंद्राच्या छायाप्रकाशाबरोबर भुताखेतांच्या गोष्टी रंगत. त्या सगळ्या झाडांमधून जाताना आठवत आणि हलणाऱ्या प्रत्येक झाडावर मुंजा, खविस, झोटिंग, हडळ इ. भुतावळ दबा धरून बसली आहे, असे वाटत राही.
आठवीत होते मी. शाळेच्या रस्त्यावर बक्कळ झाडी. त्यात एक पिंपळाचे भले थोरले झाड होते. त्यावर मुंजा नावाचे नामांकित भूत राहते असे एका भाबड्या शाळूसोबत्याने एकदा सांगितलेले. तेव्हा पासून मी शक्यतो एकटी शाळेचा रस्ता तुडवणे लागू नये असे कटाक्षाने बघत असे.
एकदा मात्र अगदी नाईलाज झाला. दोघीही मैत्रिणी सुट्टीवर. शनिवार म्हणून सकाळची शाळा साडेअकरा सुटलेली. भर बाराच्या सुमारास मी एकटीच घरचा रस्ता तुडवू लागले. रस्त्यावर चिटपाखरूही नाही. ऊन मी म्हणत असलेले. मनात मुंजा. ही भुतावळ शनिवारी आणि रात्री किंवा दिवसा बारा वाजता भलती अॅक्टिव्ह होत असते, असे कुणीतरी केव्हातरी सांगितलेले. रामरक्षा म्हणत म्हणत मी रस्ता कापत होते. पिंपळ जवळ आला. सळसळ आवाज ऐकत मी पिंपळाकडे न बघता खाली मान घालून पुढे सरकले. इतक्यात मागून धप्पकन आवाज आला. मी दचकून भराभरा चालू लागले. तर मागून 'अगं, थांब थांब...मी येणार आहे...'
झालं. मी दप्तर गळ्यात मारले आणि जी धावत सुटले ती थेट कॉलनीच्या गेट पाशीच येऊन थांबले. जोरजोरात श्वास घेत कट्ट्यावर बसले. तर माझ्या मागून धावणारा प्राणी थेट माझ्या शेजारीच येऊन बसला !
अरे हा तर कुलकर्ण्यांचा समीर !
' अगं ताई, किती वेगात पळतेस ! जरा थांबशील की नाही माझ्यासाठी ? मला त्या पिंपळावरच्या मुंजाची भीती वाटते, म्हणून तुझ्याबरोबर यायला निघालो तर तू पुढेच ! दमलो ना तुझ्याबरोबर धावून.' समीर लालेलाल चेहरा आणि पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला.
मी कपाळावर हात मारला आणि सगळं सांगितल्यावर दोघेही हसत सुटलो !!
तुमच्याही बालपणीच्या भीतीची गोष्ट ईथे शेअर करा !
प्रतिक्रिया
भारी किस्सा आहे ...
भुतांची नाही पण
एक नंबर किस्सा :D
सापांना घाबरू नका ...
बाप रे! मण्यार अंगावर पडणे
मी जितका अचंबीत झालो होतो...
आधी भीती वाटायची सापांची.
उन्हात सळसळ करतात तेव्हा बघून मंत्रमुग्ध व्हायला होतं.
लहानपणी दूरदर्शनवर तहकिकात नावाची मालिका लागायची
+१ मी सुद्धा खूप घाबरले होते
मला लहानपणी अंधाराची भीती
लहानपणी गावात विज नाही
सांगा की आठवतील ते किस्से
सस्नेह एक सत्य घटना....
भारी किस्सा आहे
म्हणजे बालपणीपासूनच मिलिटरी
स्नेहाताई म्हणायला आनंदच होईल
:)
घोरपड
भुताखेतांची भिती वाटत नाही पण..
>>>पण एकदा मी उशिरा बाहेरुन
चोर आहेत हे तुम्हाला कसे
झाले असे
बापरे ! जिवावरचेच की संकट .
भिती..
वास्तुशास्त्र आणि राज हे